महत्वाच्या बातम्या
-
आधीचं स्वावलंबी भारताचं २० लाख कोटींचं पॅकेज संशोधनाचा विषय | आता १ लाख १० हजार कोटींचं पॅकेज जाहीर
कोरोना संकटादरम्यान मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १३ मे २०२० रोजी देशाला संबोधित केलं होतं. या संबोधनात त्यांनी देशासाठी २० लाख कोटींचं पॅकेज जाहीर केलं होतं. हे पॅकेज ‘स्वावलंबी भारता’चं उद्दीष्ट डोळ्यासमोर ठेवून जाहीर केल्याचं त्यांनी सांगितलं होतं. उल्लेखनीय म्हणजे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घोषित केलेलं २० लाख कोटी रुपयांचं पॅकेज देशाच्या आजवरच्या इतिहासातील सर्वात मोठं आर्थिक पॅकेज ठरलं होतं. विशेष आर्थिक पॅकेज स्वावलंबी भारत अभियानासाठी महत्त्वाचं ठरेल. स्वावलंबी भारताला एक नवी गती देणारं हे पॅकेज भारताच्या जीडीपीच्या जवळपास १० टक्के आहे, असंही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलं होतं.
4 वर्षांपूर्वी -
सामान्य गुंतवणुकदारांची चिंता वाढणार | केंद्र अल्पबचत योजनांचा व्याजदर घटवणार?
मोदी सरकारचे अनेक निर्णय यापूर्वी सामान्य लोकांसाठी आर्थिक नुकसानीचे ठरले आहेत. त्यात महिन्यांपूर्वी देशातील ५ राज्यांच्या विधानसभा निवडणुकीमुळे लांबवणीवर पडलेल्या अल्पबचत योजनांवरील व्याजदर कपातीच्या निर्णयाची आता मोदी सरकारकडून अंमलबजावणी होण्याची दाट शक्यता वर्तविण्यात आली आहे. एप्रिल महिन्यातच केंद्रीय अर्थखात्याने याविषयी अधिकृत घोषणा केली होती. परंतु, ५ राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर या निर्णयामुळे भारतीय जनता पक्षावर प्रचंड टीका झाली होती.
4 वर्षांपूर्वी -
यशस्वी माणसं या '10' गोष्टी करण्यात घालवत नाहीत वेळ वाया - नक्की वाचा
यश हे एका दिवसात अथवा एका रात्रीत मिळत नाही. यश ही एक प्रक्रिया आहे. यासाठीच ‘success is a process not an event’ असं इंग्रजीत म्हटलं जातं. यश मिळवण्यासाठी निरंतर प्रयत्न करावे लागतात. जगातल्या प्रत्येक व्यक्तीला मग तो श्रीमंत असो वा गरिब, लहान असो वा मोठा दिवसाचे चोविस तासच मिळत असतात. मात्र जी माणसं आयुष्यात यशस्वी होतात ती या चोविस तासांचा वेळ सत्कारणी लावतात. प्रत्येक क्षणी समोर येणाऱ्या संधीचं सोनं करतात. यासाठी यश मिळवण्याच्या या प्रक्रियेत कोणत्या गोष्टी करणं जाणिवपूर्वक टाळावं हे जरूर जाणून घ्या. ज्यामुळे तुमच्या यशाचा मार्ग आपोआप मोकळा होईल.
4 वर्षांपूर्वी -
प्रॉपर्टीचा ताबा मिळण्यास उशीर झाल्यास खरेदीदारांसाठी कायदेशीर उपाय - नक्की वाचा
एक प्रॉपर्टी खरेदीदार, आपल्या कष्टाच्या पैशाने घर खरेदी करण्यासाठी गुंतवणूक करतो आणि ज्यावेळी त्याला वेळेवर ताबा मिळत नाही, त्यावेळी त्याला त्याचे हक्काचे छप्पर मिळत तर नाहीच वरुन त्याचा पैसाही तो गमावून बसतो. गृहकर्जाचे हप्ते (EMI) आणि भाड्याने घेतलेल्या घरसाठीचे भाडे भरण्याशिवाय त्याच्यासमोर पर्याय राहत नाही. शिवाय खरेदीदारला न्याय मिळण्यासाठी दीर्घ आणि कठोर कायदेशीर लढाईही लढावी लागते.
4 वर्षांपूर्वी -
RBI'कडून राजकारण्यांना मोठा झटका | बँका ताब्यात ठेवणाऱ्यांसाठी घेतला ‘हा’ मोठा निर्णय
देशात आजपर्यंत ज्याच्याकडे पैसा आहे त्याच्या हातात सत्ता असते असं म्हटलं जात. मग त्यासाठी काही लोक बँक साखर कारखाने किंवा पतपेढी आपल्या नावावर करू राजकारणात आपला दबदबा निर्माण करण्यासाठी प्रयत्न करतात. मात्र या वृत्तीला आता खुद्द आरबीआय अर्थात रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने अतिशय महत्वाचा निर्णय दिला आहे.
4 वर्षांपूर्वी -
..त्यापेक्षा गाड्या OLX वर विका हा एकमेव पर्याय लोकांकडे असेल? | पेट्रोल-डिझेल ऐतिहासिक दरांकडे
देशात सध्या पेट्रोल-डिझेलचे दर ऐतिहासिक दरांकडे झेप घेत आहेत. त्यात मोदी सरकारला त्याच्याशी काहीच देणं घेणं नसल्याचं देखील पाहायला मिळतंय. ज्या मुद्यांना पुढे करत मोदी २०१४ मध्ये सत्तेत विराजमान झाले ते मुद्दे आज त्यांच्या चर्चतच नसतात. तसेच याच विषयामुळे महागाई प्रचंड वाढलेली असताना मोदी सरकारमध्ये यावरून काहीच हालचाल होताना दिसत नाही आणि परिणामी सामान्य माणूस होरपळून निघत आहे. त्यात सध्या तज्ज्ञांनी पेट्रोल-डिझेल संदर्भात व्यक्त केलेल्या अंदाजानुसार तसं झाल्यास स्वतःची वाहन OLX वर विक्री करण्याशिवाय सामान्य लोकांकडे दुसरा पर्याय नसेल असंच दिसू लागलंय.
4 वर्षांपूर्वी -
दिवाळीपर्यंत मोफत अन्नधान्य योजनेवर केंद्राकडून शिक्कामोर्तब | कसा घ्याल योजनेचा लाभ? - वाचा
कोरोनाचे संकट अद्याप कायम असल्याने दिवाळीपर्यंत मोफत अन्नधान्याचे योजना राबवली जाईल अशी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अलीकडेच केली होती. या योजनेवर केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बुधवारी झालेल्या बैठकीत शिक्कामोर्तब करण्यात आले. पंतप्रधान गरीब कल्याण योजना अंतर्गत पुढील नोव्हेंबर महिन्यापर्यंत मोफत अन्नधान्य देण्याची योजना राबविण्यात येणार आहे. मोफत अन्नधान्य वाटपाच्या योजनेचा देशभरातील 81 कोटी 35 लाख लोकांना लाभ होणार आहे. दरमहा प्रति व्यक्ती पाच किलो धान्य योजनेअंतर्गत दिले जाईल. राष्ट्रीय खाद्य सुरक्षा योजनेसाठी पात्र असलेल्या लोकांना योजनेनुसार पुढील पाच महिने मोफत धान्य मिळणार आहे.
4 वर्षांपूर्वी -
शेतकऱ्यांसाठी खुशखबर | राष्ट्रीय पशुधन अभियान अंतर्गत मिळणार अनुदानावर मशीन - वाचा सविस्तर
शेतकरी बंधुंनो राष्ट्रीय पशुधन अभियान अंतर्गत शेतकऱ्यांना गवत कापण्यासाठी ५० टक्के अनुदानावर मशीन मिळणार आहे. या योजना संदर्भात अधिक माहिती जाणून घेवूयात. महाराष्ट्र शासन कृषी पशुसंवर्धन दुग्धव्यवसाय विकास, मत्स्यव्यवसाय विभागाच्या वतीने केंद्र सहाय्यित राष्ट्रीय पशुधन अभियान अंतर्गत वैरण व पशुखाद्य या उप अभियानांतर्गत गवताचे गठ्ठे तयार करण्याच्या मशीनचे ५० टक्के अनुदानावर वितरण. म्हणजेच ( जनजाती क्षेत्र उप योजना ) या योजनेसाठी नवीन लेखशीर्षास मान्यता प्रदान करण्यात आली आहे. राष्ट्रीय पशुधन अभियानांतर्गत या योजनेसाठी ५० टक्के अनुदान हे केंद्र शासनाकडून मिळणार आहे. या संदर्भातील शासन निर्णय दिनांक २३ जून २०२१ रोजी महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध आहे.
4 वर्षांपूर्वी -
रिलायन्स AGM | ऊर्जा क्षेत्रात 75 हजार कोटींची गुंतवणूक करणार | Jio 5G स्मार्टफोन लाँच
आशियातील सर्वात श्रीमंत उद्योगपती आणि देशातील सर्वात मोठी कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी 44 वी वार्षिक सर्वसाधारण सभा (AGM)ची सुरुवात केली आहे. बाजार भांडवलाच्या बाबतीत रिलायन्स इंडस्ट्रीज ही देशातील सर्वात मोठी कंपनी आहे. मुकेश अंबानी यांचे भाषण सुरू होण्यापूर्वी कंपनीच्या शेअर्समध्ये सुमारे 2 टक्के घट दिसून येत आहे. या बैठकीत कंपनीचे सर्व 12 संचालक उपस्थित आहेत. बैठकीच्या सुरूवातीस, कंपनीने कोविड -19 मुळे देशातील जीव गमावणाऱ्या सर्व लोकांना श्रद्धांजली अर्पण केली.
4 वर्षांपूर्वी -
महाराष्ट्र सरकारकडून महिला बचत गटांना मिळणार २ लाख रुपये कर्ज | असा करा अर्ज
केंद्र सरकार व राज्य सरकार शेतकरी व महिला बचत गटांसाठी विविध कार्यक्रम आयोजित करत असते, यासाठी अनेक योजना ही राबवत असते, महिला सक्षमीकरण करणे हे त्यामागचे उद्दिष्ट आहे. मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळामार्फत राज्यातील अल्पसंख्याक समाजातील महिला बचतगटांना व्यवसायासाठी २ लाख रुपयांपर्यंत कर्ज देण्यात येणार आहे.
4 वर्षांपूर्वी -
विजय मल्या, नीरव मोदी आणि मेहूल चौक्सीला ED चा जबर दणका | 9371 कोटींची संपत्ती जप्त
भारतात बँकिंग घोटाळ्याच्या घटनांमध्ये सरकारी कारवाईचे परिणाम दिसून येत आहेत. अंमलबजावणी संचालनालयने बँकिंग घोटाळ्याचे फरार आरोपी विजय मल्या, मेहूल चौक्सी आणि नीरव मोदीची एकून 9371 कोटींची संपत्ती सरकारी बँका आणि केंद्र सरकारकडे ट्रान्सफर करण्यात आली आहे. ईडीने ही माहिती दिली आहे.
4 वर्षांपूर्वी -
अविनाश भोसलेंवरील ED कारवाई हा अजित पवारांवर दबाव | ED भाजपला सत्ता मिळवून देण्यासाठी हे करतय - अंजली दमानिया
अविनाश भोसले अजित पवारांचे निकटवर्तीय आहेत हे सर्वांनाच माहिती आहे. अविनाश भोसले यांची संपत्ती जप्त करत केलेल्या कारवाईवरुन भाजपा किंवा केंद्राकडून आदेश मिळाल्यानंतर ईडी कारवाई करतं हे स्पष्ट दिसत आहे. सीबीआय आणि ईडी या दोन्ही यंत्रणांचा वापर सतत होताना दिसत आहे,” अशी टीका अंजली दमानिया यांनी व्हिडीओच्या माध्यमातून केली आहे.
4 वर्षांपूर्वी -
कर्जदाराचा मृत्यू झाल्यास कर्जाचा बोजा कुटुंबियांवर पडतो का? | काय होतं पुढे? - वाचा सविस्तर
आपण आपल्या परिवाराच्या आनंदासाठी काय नाही करत. होम लोन घेऊन घर खरेदी करतो. ऑटो लोन घेऊन कार किंवा इतर वाहनं घेतो. छोटे मोठे लोन घेऊन आपण परिवाराच्या सुखासाठी सर्व प्रयत्न करतो. कोरोना काळात अनेकांचे मृत्यू झाले आहेत. परंतु अशा लोकांवर कर्ज असतील तर ते नंतर वसूल कोणाकडून होते? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. त्यासाठी पुढे वाचा
4 वर्षांपूर्वी -
व्यवसाय कर्ज योजना उद्योग उभारणीसाठी १० लाखापर्यंत अनुदान | वाचा आणि शेअर करा
आजच्या या लेखामध्ये सुशिक्षित बेरोजगार तरुणांसाठी व्यवसाय कर्ज योजना कोणत्या आहेत आणि त्या योजनांचा लाभ कसा घ्यावा या संदर्भात माहिती जाणून घेणार आहोत. महाराष्ट्रासह संपूर्ण भारतात मोठ्या प्रमाणात बेरोजगारांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. ज्या व्यक्ती खाजगी नोकरीमध्ये होते लॉकडाऊनमुळे त्यांची ती नोकरी सुद्धा गेल्यामुळे बेरोजगारीमध्ये आणखीच भर पडली आहे. अशा सुशिक्षित बेरोजगार तरुणांना या योजना माहित असाव्यात जेणे करून ते या योजनांचा लाभ घेऊ शकतील.
4 वर्षांपूर्वी -
कायद्यांत बदल | कर्मचाऱ्यांनी शिफ्टनंतर १५ मिनिटांपेक्षा अधिक काम केल्यास ओव्हरटाईम मिळणार - वाचा
पुढील काही महिन्यांत कामगार कायद्यांत काही बदल होणार आहेत. लवकरच नव्या नियमांची अंमलबजावणी सुरू होईल. नवे नियम लागू झाल्यानंतर अनेक गोष्टी बदलणार आहेत. कर्मचाऱ्यांना मिळणारा ओव्हरटाईम, त्यांना मिळणारी इन हँड सॅलरी यामध्ये लवकरच बदल होणार आहेत. नव्या नियमांनुसार सर्वाधिक परिणाम ओव्हरटाईमवर होईल.
4 वर्षांपूर्वी -
शेतकऱ्यांसाठी खुशखबर | केंद्र सरकार बँक खात्यातर 4000 रुपये ट्रान्सफर करणार - करा ऑनलाईन नोंदणी
केंद्र सरकार जून महिन्यात देशभरातील शेतकऱ्यांच्या खात्यात 4000 रुपये पाठवण्याची शक्यता आहे. पंतप्रधान कृषी सन्मान योजनेतंर्गत नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांना या मदतीचा लाभ मिळणार आहे. काही दिवसांपूर्वीच केंद्र सरकारने या योजनेचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पाठवला होता. त्यावेळी शेतकऱ्यांना 2000 रुपये देण्यात आले होते. आतापर्यंत 9 कोटी शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी नोंदवले आहे.
4 वर्षांपूर्वी -
जनधन खाते आधार कार्डशी लिंक करा | मिळवा ५,००० रुपये - वाचा सविस्तर
पंतप्रधान मोदींनी २८ ऑगस्ट २०१४ रोजी केली होती. याद्वारे अल्पवयीन मुलेही आपल्या गार्डियनसह आपले खाते उघडू शकतात. या खात्याचे अनेक फायदे आहेत. सरकारी योजनांपासून मिळणारे लाभ थेट लाभार्थींच्या खात्या जातात. उदाहरणार्थ, कोरोनाच्या संकटादरम्यान सरकारने महिलांच्या बँक खात्यांमध्ये तीन महिन्यांपर्यंत पाचशे रुपये घातले होते. उज्ज्वला योजनेचे फायदेही थेट जनधन खात्यात पाठवले जातात. याचे इतरही अनेक फायदे आहेत. गरज पडल्यास यातून ५,००० रुपयांपर्यंतची मदत मिळू शकते.
4 वर्षांपूर्वी -
लघु उद्योगात येणार्या उद्योगांची संपूर्ण यादी | उद्योगांसाठी कर्जांच्या सरकारी योजना कोणत्या आहेत? - वाचा सविस्तर
देशाच्या संपूर्ण अर्थव्यवस्थेत लघु उद्योगांची महत्त्वपूर्ण भूमिका आहे. असा अंदाज आहे की भारताच्या एकूण निर्यातीत लघु उद्योगांचे 33% पेक्षा जास्त योगदान आहे. लघु उद्योगासाठी अतिशय कमी भांडवल आणि मनुष्यबळ लागते . यामुळेच भारतामध्ये लघु उद्योगांचे प्रमाण अधिक आढळते .
4 वर्षांपूर्वी -
मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजना | कसं मिळवाल व्यावसायिक कर्ज ? - वाचा सविस्तर
राज्यातील शहरी व ग्रामीण क्षेत्रातील सुशिक्षित युवक-युवतींची वाढती संख्या व उद्योग, व्यवसाय क्षेत्रात राज्यात निरनिराळ्या क्षेत्रात उपलब्ध होत असलेल्या स्वयंरोजगार व रोजगाराच्या नवीन संधी विचारात घेऊन उद्योजकतेला चालना देण्यासाठी केंद्र सरकारच्या मार्गदर्शनाखाली राज्य सरकारांनी CMEGP या योजनेची सुरवात गेली.
4 वर्षांपूर्वी -
Sarkari Naukri | बँक ऑफ इंडियामध्ये विविध पदांसाठी भरती | कमी शिकलेल्यांना मोठी संधी
बँकेत नोकरीचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी चांगली संधी आहे. भारतातील आघाडीची एक बँक म्हणजेच बँक ऑफ इंडियामध्ये असिस्टेंट, अटेंडर, चौकीदार आणि माळी या पदांसाठी बंपर भरती करण्यात येणार आहे. बँक ऑफ इंडियाच्या अधिकृत bankofindia.co.in वेबसाईटवर जाऊन इच्छुक उमेदवार अर्ज करु शकतात.
4 वर्षांपूर्वी