महत्वाच्या बातम्या
-
पेट्रोल-डिझेल दरवाढ | 7 राज्यांमध्ये पेट्रोल 100 च्या पुढे | या ठिकाणी 107.53 रुपये लीटर
देशामध्ये महागाई सर्व रेकॉर्ड तोडत आहे. गेल्या 25 दिवसांत पेट्रोल आणि डिझेल प्रति लिटर 6 रुपयांपेक्षा जास्त महाग झाले आहेत. गेल्या 42 दिवसात 24 वेळेस पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढले आहेत. तेलाच्या महागाईमुळे सामान्य माणूस त्रस्त आहे. यावर पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान तेलाच्या वाढत्या दराबाबत म्हणाले की, “मी हे मान्य करतो की आजच्या किंमतीमुळे नागरिक आणि ग्राहकांना समस्या निर्माण होत आहेत, यात काही शंका नाही.’ सरकारने हे मान्य केले आहे परंतु त्यांच्याकडे महागाईवर इलाज नाही.”
4 वर्षांपूर्वी -
अदानी ग्रुपमधील ४३५०० कोटींची गुंतवणूक रडारवर | 'NSDL'ने ३ परदेशी गुंतवणूकदारांची खाती गोठवली
मालकी हक्क आणि लाभार्थ्यांबाबत माहिती दडवल्याचा ठपका ठेवत नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (NSDL) तीन बड्या संस्थात्मक गुंतवणूकदारांची खाती गोठवली आहेत. अब्दुला इन्व्हेस्टमेंट फंड, क्रेस्टा फंड आणि एपीएमएस इन्व्हेस्टमेंट फंड या तीन परदेशी फंडांची खाती गोठवण्यात आली आहेत. या तिन्ही कंपन्यांनी अदानी समूहात तब्बल ४३५०० कोटीची गुंतवणूक केली आहे. ‘एनएसडीएल’ने केलेल्या या कारवाईने या कंपन्यांना तूर्त अदानी समूहाच्या शेअरची खरेदी किंवा विक्री करता येणार नाही.
4 वर्षांपूर्वी -
हर्षद मेहताचा घोटाळा उघड करणाऱ्या सुचेता दलाल यांचं एक ट्विट | आणि शेअर बाजार कोसळला
शेअर बाजारात आणखी एक घोटाळा होत असल्याचं सूचक ट्विट हर्षद मेहताचा घोटाळा उघडकीस आणणाऱ्या पत्रकार सुचेता दलाल यांनी शनिवारी केलं. त्याचा परिणाम आता बाजारात दिसून येत आहे. मुंबई शेअर बाजार कोसळला आहे. अनेक शेअर्सच्या किमतीत घसरण झाली आहे. सुचेता दलाल यांनी त्यांच्या ट्विटमध्ये एक समूह असा उल्लेख केला होता. परंतु, त्यांनी ट्विटमध्ये समूहाचं नाव स्पष्ट केलं नव्हतं.
4 वर्षांपूर्वी -
शेती विषय | मोठ्या कमाईसाठी सरकारी रोपवाटिका योजना २०२१ | ऑफलाईन व ऑनलाईन अर्ज
रोपवाटिका योजना २०२१ संदर्भातील माहिती. पंचायत समिती कृषी विभाग योजना सतत चालू असतात, परंतु बऱ्याच शेतकरी बांधवांना या योजनांची माहिती नसण्याची शक्यता असते. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर भाजीपाला रोपवाटिका योजनेसाठी ऑफलाईन अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आलेले आहे आणि या संदर्भातील बातमी दिनांक ९ जून २०२१ च्या दैनिक पुण्यनगरी वर्तमान पत्रामध्ये प्रकाशित करण्यात आलेली आहे. अहिल्यादेवी रोपवाटिका योजनेसाठी लागणारा अर्ज या लेखाच्या सर्वात शेवटी दिलेला आहे पेजला खाली स्क्रोल करून तो pdf अर्ज डाउनलोड करून घ्या.
4 वर्षांपूर्वी -
खुशखबर | सोलर पावर प्लांट उभारायचा आहे? | तालुका तपासा आणि असा करा अर्ज
शेतकरी बंधुंनो आजच्या लेखामध्ये सोलर पावर प्लांट संबधी माहिती जाणून घेवूयात. महाराष्ट्रामध्ये विविध जिल्ह्यातील विविध तालुक्यामध्ये एनटीपीसी विद्युत व्यापार निगम लिमिटेडच्या वतीने सोलर पावर प्लांट प्रोजेक्ट उभारण्यासंदर्भात अर्ज मागविण्यात आले आहेत. दैनिक लोकमतमध्ये या संदर्भातील जाहिरात देण्यात आलेली आहे ती जाहिरात डाउनलोड करण्याची लिंक या लेखाच्या सर्वात खाली देण्यात आलेली आहे. अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख १७ जून २०२१ आहे. तुमच्या तालुक्यामध्ये कोणत्या ठिकाणी हे सोलर पावर प्लांट प्रोजेक्ट उभारले जाणार आहेत त्याची देखील तुम्ही माहिती घेऊ शकता त्या संदर्भातील माहिती (PDF File) सुद्धा या ठिकाणी दिलेली आहे ती तुम्ही डाउनलोड करून शकता.
4 वर्षांपूर्वी -
जुन्या नाण्यांचे कलेक्शन आहे? | मग तुम्ही कमाऊ शकता लाखो रुपये - सविस्तर वृत्त
वस्तू जसजश्या जुन्या होत जातात तसतसा आपण त्याचा वापर थांबवत जातो. सर्वसाधारणपणे वस्तू जुन्या झाल्या की त्याचे मूल्य संपते किंवा कमी होत जाते. मात्र काही वस्तू जितक्या जुन्या होत जातात तितके त्यांचे मूल्य वाढत जाते. कारण या वस्तू दुर्मिळ वस्तू किंवा अॅंटिक वस्तूंच्या श्रेणीत येतात. अशा वस्तूंना जगभरातून मोठी मागणी असते. या वस्तूंसाठी दर्दी लोक वाटेल ती किंमत मोजायला तयार असतात. तुमच्याकडे जर जुन्या नाण्यांचे कलेक्शन असेल तर तुम्हाला लाखो रुपये कमावण्याची संधी आहे. या जुन्या वस्तूंची काही निश्चित किंमत नसते.
4 वर्षांपूर्वी -
मोदींच्या राज्यात पेट्रोल-डिझेल किमतीच्या भडक्याने लोकांच्या खिशाला आग | अजून विक्रमी दरांकडे कूच
देशभरात पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत पुन्हा एकदा वाढ झाली आहे. आज पेट्रोलचा दर 27 पैशांनी तर डिझेलचा दर हा 23 पैशांनी वाढला आहे. मुंबईत आज पेट्रोलची किंमत 102.30 रुपये असून डिझेलची किंमत ही 94.39 रुपये इतकी आहे. देशातील एकूण सहा राज्यांत पेट्रोलचे दर हे शंभरीपार झाले असून डिझेलचा प्रवासही शंभरीकडे सुरु आहे.
4 वर्षांपूर्वी -
युवासेनेकडून डोंबिवलीत केवळ १ रुपयात १ लीटर पेट्रोल | 'या' निमित्ताने केंद्रालाही चपराक
देशभरात पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत पुन्हा एकदा वाढ झाली आहे. आज पेट्रोलचा दर 27 पैशांनी तर डिझेलचा दर हा 23 पैशांनी वाढला आहे. मुंबईत आज पेट्रोलची किंमत 102.30 रुपये असून डिझेलची किंमत ही 94.39 रुपये इतकी आहे. देशातील एकूण सहा राज्यांत पेट्रोलचे दर हे शंभरीपार झाले असून डिझेलचा प्रवासही शंभरीकडे सुरु आहे.
4 वर्षांपूर्वी -
महत्वाचं | हॉलमार्किंग १६ जूनपासून सक्ती | तुमच्याकडील सोन्याच्या दागिन्यांचे काय?
द्र सरकारने सोन्याचे दागिणे आणि कलाकृतींवरील हॉलमार्किंग १६ जूनपासून सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. ही व्यवस्था अनिवार्य करण्यासाठी पूर्वी १५ जानेवारीचा मुहूर्त निघाला होता. मात्र आता एक दिवस आणखी वाढवला आहे. याचाच अर्थ आता दागिण्यांच्या व्यापाऱ्यांना १५ जूननंतर १४, १८ आणि २२ कॅरेट सोन्याचे दागिणेच विकण्याची परवानगी असेल. बीआयएस एप्रिल २००० पासून सोन्याच्या दागिण्यांसाठी हॉलमार्किंगची योजना राबवत आहे. सध्या जवळपास ४० टक्के दागिण्यांचे हॉलमार्किंग होत आहे.
4 वर्षांपूर्वी -
ATM सेवाकर अजून वाढला | तो काळ दूर नाही जेव्हा मोदी सरकार पैशांना स्पर्श अन बघण्यासाठी सुद्धा कर आकारेल - सचिन सावंत
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 8 नोव्हेंबर 2016 रोजी देशाला संबोधित करताना त्यावेळी चलनात असणाऱ्या 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा बंद केल्या होत्या. मोदी सरकारद्वारे त्यावेळी देशातील भ्रष्टाचार, दहशतवाद, काळा पैसा जमा करणाऱ्यांच्या विरोधात हे पाऊल उचलण्यात आलं होतं. नोटा रद्द केल्यानंतर विहित मुदतीत त्या बँकांकडे जमा करण्यास सांगण्यात आलं होतं.
4 वर्षांपूर्वी -
या योजनानेत मिळेल दरमहा १४,००० पर्यत पेन्शन | जाणून घ्या गुंतवणुक विषयी
निवृत्तीनंतर नियमित पेन्शन आणि आर्थिक सुरक्षितता ही प्रत्येकच नागरिकाची अपेक्षा असते. असा गुंतवणूक प्रकार ज्यामध्ये पैसेही सुरक्षित राहतील आणि चांगला परतावादेखील मिळेल तुम्हाला हवा असेल तर तुमच्यासाठी भारतीय आयुर्विमा महामंडळाची म्हणजेच एलआयसीची जीवन अक्षय पॉलिसी हा एक चांगला पर्याय आहे. या पॉलिसीत तुम्हाला एक निश्चित पेन्शन मिळते. या योजनेचे वैशिष्ट्ये म्हणजे तुम्हाला फक्त एकदाच प्रिमियम भरावा लागेल. या पॉलिसीत तुम्हाला एकूण १० पर्याय उपलब्ध आहेत.
4 वर्षांपूर्वी -
नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 3 लाखापर्यंत बिनव्याजी कर्ज मिळणार - राज्य सरकार
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातील शेतकऱ्यांना ३ लाखांपर्यंतचे पिककर्ज बिनव्याजी उपलब्ध करण्याची घोषणा यंदाच्या अर्थसंकल्पात केली होती. त्या घोषणेची अंमलबजावणी करण्याच्या महत्वपूर्ण निर्णयाला राज्य मंत्रिमंडळाने आज मान्यता दिली. मंत्रिमंडळाच्या मान्यतेमुळे पिककर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या राज्यातील शेतकऱ्यांना ३ लाख रुपयांपर्यंतचे पिककर्ज शून्य टक्के व्याजदराने मिळण्याचा मार्ग खुला झाला आहे.
4 वर्षांपूर्वी -
बीड | परळी तालुक्यातील सिरसाळा येथे MIDC उभारण्याचा मार्ग मोकळा | उद्योग मंत्रालयाची मंजुरी
बीड जिल्ह्यातील परळी तालुक्यातील सिरसाळा येथे MIDC उभारण्यात येणार आहे. सिरसाळा येथे MIDC उभारण्याच्या प्रस्तावाला महाराष्ट्राच्या उद्योग मंत्रालयाने मंजुरी दिली आहे. राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या प्रयत्नानंतर ही एमआयडीसी साकारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
4 वर्षांपूर्वी -
देशाची अर्थव्यवस्था ढासळतेय | पण भाजपचा पक्ष खजिना तुडुंब भरतोय | २०१९-२० मध्ये ७८५ कोटीची देणगी
देशात सत्ता आल्यापासून भाजपचा खजिना तुडुंब भरल्याचे समोर आले आहे. निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार, २०१९-२० मध्ये भारतीय जनता पक्षाला कॉर्पोरेट आणि व्यक्तिगत स्वरुपात तब्बल ७८५ कोटी देणगी मिळालं आहे. काँग्रेस पक्षाला १३९ कोटी रुपये देणगी मिळाली आहे. याचा अर्थ काँग्रेसच्या ५ पट जास्त भारतीय जनता पक्षाला देणगी मिळाली आहे. तर याच कालावधीत एनसीपीला ५९ कोटी, टीएमसी (TMC) ८ कोटी, सीपीएम १९.६ कोटी आणि सीपीआय १.९ कोटी रुपये देणगी मिळाली आहे.
4 वर्षांपूर्वी -
राज्य सरकारकडून एसटी महामंडळाला ६०० कोटीची आर्थिक मदत | कामगारांना पगारही मिळणार
महाराष्ट्राची लाल परी अर्थात एसटी (ST) गेल्या अनेक वर्षांपासून आर्थिक संकटात सापडल्याचं पहायला मिळत आहे. याच एसटी महामंडळाला आर्थिक अडचणीतून बाहेर काढण्यासाठी राज्य सरकारने आर्थिक मदत जाहीर केली आहे. राज्य सरकारकडून एसटी महामंडळाला 600 कोटी रुपयांची आर्थिक मदत देण्याचं जाहीर केलं आहे अशी माहिती राज्याचे परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष अनिल परब यांनी दिली.
4 वर्षांपूर्वी -
Digital India | आयकर विभागाची नवी वेबसाईट पाहिल्या दिवशीच क्रॅश | सीतारामन इन्फोसिसवर संतापल्या
इन्कमटॅक्स विभागाची नवी वेबसाईट मोठा गाजावाजा करून आणि सहा दिवस सर्व्हर बंद ठेवून आयकर विभागाची नवीन वेबसाईट सोमवारी रात्री लाँच करण्यात आली. मात्र, करदात्यांनी ही वेबसाईट क्रॅश होत असल्याचे फोटो ट्विटरवर टाकल्याने अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी ट्विटरवरून इन्फोसिस आणि कंपनीचे सह संस्थापक अध्यक्ष नंदन निलेकनींना चांगलेच झापले आहे.
4 वर्षांपूर्वी -
Lockdown झटका | मुंबईतलं पंचतारांकित 'हयात रिजन्सी' हॉटेल बंद | कर्मचाऱ्यांच्या पगारसाठी पैसाच नाही
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करत असताना महाराष्ट्रात दोन महिन्यांसाठी लॉकडाउन जाहीर करण्यात आलं होतं. ७ जून पासून राज्यात अनलॉकची घोषणा करण्यात आली. ज्यात मुंबईतील हॉटेल आणि रेस्टॉरंट्सला परवानगी देण्यात आली आहे. एकीकडे मुंबईतील दुकानदार आणि हॉटेल व्यवसायिकांमध्ये आनंदाचं वातावरण असताना दुसरीकडे हयात रिजन्सी या फाईव्ह स्टार हॉटेलने आपलं कामकाज बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.
4 वर्षांपूर्वी -
पेट्रोल-डिझेल दरवाढ | 6 राज्यांमध्ये 100 रुपयांच्या पुढे गेले पेट्रोल | भाजपाला सुख-दुःखच नाही?
पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किंमतींमुळे सर्वसामान्यांची अवस्था बिकट झाली आहे. आज या महिन्यात चौथ्यांदा पेट्रोल-डिझेलमध्ये दरवाढ झाली आहे. देशाची आर्थिक राजधानी मुंबईत पेट्रोल 101.52 रुपये प्रतिलिटरपर्यंत पोहोचले आहे. या वाढीमुळे आता देशातील 6 राज्यात पेट्रोलची किंमत 100 रुपयांच्या पुढे गेली आहे. त्याचबरोबर डिझेलची किंमतही 100 रुपयांच्या जवळपास पोहोचली आहे.
4 वर्षांपूर्वी -
मोदी सरकारचे नवे कामगार कायदे | हातात येणारा पगार कमी होणार आणि PF'वर मोठा परिणाम
लवकरच काही महिन्यांमध्ये केंद्र सरकार चार कामगार कायदे लागू करण्याची शक्यता आहे. मोदी सरकार या कामगार कायद्यांवर शेवटच्या टप्य्यात असून तो लवकरात लवकर लागू करण्याची तयारी सुरु झाली आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या हाती येणारा एकूण पगार पहिल्यापेक्षा कमी होणार आहे, तर पीएफ वाढणार आहे. कंपन्यांनाही कर्मचाऱ्यांच्या पीएफ फंडमध्ये जादा पैसे टाकावे लागणार आहेत. या नव्या नियमांमुळे बेसिक सॅलरी, भत्ते आणि पीएफचे गणित पूर्णपणे बदलणार आहे.
4 वर्षांपूर्वी -
पेट्रोल-डिझेल दरवाढीविरोधात काँग्रेसचे सोमवारी राज्यात एकाचवेळी एक हजार ठिकाणी आंदोलन - नाना पटोले
केंद्रातील मोदी सरकारने पेट्रोल, डिझेल व एलपीजी गॅसच्या किमती भरमसाठ वाढवल्या आहेत. पेट्रोलने १०० रुपये लिटरचा टप्पा पार केला असून डिझेल ९२ रुपये लिटर झाले आहे. ही भाववाढ अशीच चालू राहिली तर डिझेल १०० रुपये लिटर होण्यास फार दिवस लागणार नाहीत. स्वयंपाकाचा गॅसही ९०० रुपये झाला आहे. या महागाईमुळे लोकांचे जगणे कठीण झाले आहे. आधीच कोरोनाच्या संकटाने जनता त्रस्त आहे त्यात महागाईचा मार सहन करावा लागत आहेत.
4 वर्षांपूर्वी