महत्वाच्या बातम्या
-
केंद्राचा भीषण निर्णय | व्हेंटिलेटर्स उत्पादक कंपनी म्हणतेय 'आम्ही व्हेंटिलेटर्सच्या उत्पादनातील तज्ज्ञ नाही'
देशात कोरोनाग्रस्तांची रुग्णसंख्या पुन्हा एकदा वाढीला लागण्याची भीती व्यक्त केली जात आहे. सलग तिसऱ्या दिवशी कोरोनाबाधित रुग्णांच्या आकड्यात वाढ होताना दिसत आहे. आदल्या दिवसाच्या तुलनेत कोरोना बाधितांच्या संख्येत नऊ हजारांनी वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे. कालच्या दिवसात 2 लाख 76 हजार 70 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. कोरोनाबळींचा आकडा घटल्याने त्यातल्या त्यात दिलासा मानावा लागेल. कारण एका दिवसात 3 हजार 874 कोरोनाग्रस्तांना प्राण गमवावे लागले आहेत.
4 वर्षांपूर्वी -
तौते चक्रीवादळ | गुजरातसाठी पंतप्रधानांची १ हजार कोटींच्या मदतनिधीची घोषणा | महाराष्ट्रासाठी फक्त मन की बात?
अरबी समुद्रातून आलेल्या तौक्ते चक्रीवादळाने महाराष्ट्रात हाहाकार माजवला. रायगड, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना मोठा तडाखा बसला. मुंबईतून पुढे जात हे तौक्ते वादळ गुजरातला गेले. गुजरातमध्येही या वादळाने कोट्यवधीचे नुकसान झाले आहे. दरम्यान, आज (१९ मे) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातचा दौरा केला. या दौऱ्यानंतर लगेचच १००० कोटींच्या मदतनिधीची घोषणा केली आहे.
4 वर्षांपूर्वी -
ग्रामीण भागातील बेरोजगारीचा दर आठवड्याभरात दुप्पट, शहरी भागातील बेरोजगारीत ११.७२ टक्क्यांची वाढ - CMIE अहवाल
देशभरामध्ये कोरोनाची परिस्थती गंभीर बनत चालली आहे.कोरोना रूग्णांसोबतच मृत्यूचं प्रमाण झपाट्याने वाढत आहे. अशा परिस्थितीमध्ये जगभरातून मोदींवर टिका केली जात आहे. गेल्या वर्षीच्या लॉकडाऊनचे अनेक दुष्परिणाम पाहायला मिळाले होते. आता पुन्हा दुसरी लाट आल्याने अनेक राज्यांमध्ये कडक नियमावली लागू केली होती. तर लाखो लोकांचे कोरोनामुळे प्राण गेल्याने भीतीच वातावरण असून लोकं घरातच बसणं पसंत करत आहेत.
4 वर्षांपूर्वी -
खतांच्या किमतीवरून खासदार रक्षा खडसेंचं केंद्राला पत्र | भाजपमधूनही दरवाढीला तीव्र विरोध
केंद्र सरकारने खताच्या किमतीत वाढ केली आहे. त्याची राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी गंभीर दखल घेतली आहे. पवारांनी थेट केंद्रीय रसायन आणि खते मंत्री सदानंद गौडा यांना पत्र लिहून खतांच्या किमतीतील दरवाढ मागे घेण्याची मागणी केली आहे. आधीच कोरोनाच्या संकटाने शेतकरी होरपळून निघालेला असताना ही दरवाढ म्हणजे शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार आहे, अशी टीकाही शरद पवारांनी केली आहे.
4 वर्षांपूर्वी -
शेतकऱ्यांच्या खात्यात २००० टाकून खतांचे भाव ६० टक्क्यांनी वाढवले | २००० दिले ६००० खिशातून काढले | विरोधक आक्रमक
केंद्र सरकारने खताच्या किमतीत वाढ केली आहे. त्याची राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी गंभीर दखल घेतली आहे. पवारांनी थेट केंद्रीय रसायन आणि खते मंत्री सदानंद गौडा यांना पत्र लिहून खतांच्या किमतीतील दरवाढ मागे घेण्याची मागणी केली आहे. आधीच कोरोनाच्या संकटाने शेतकरी होरपळून निघालेला असताना ही दरवाढ म्हणजे शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार आहे, अशी टीकाही शरद पवारांनी केली आहे.
4 वर्षांपूर्वी -
मोदी-शहांनी स्वतः क्लीनचिट दिलेल्या या नेत्यांना CBI, ED आणि आयकर विभाग अटक करणार नाहीत - काँग्रेस
पश्चिम बंगालच्या नारदा प्रकरणात पुन्हा एकदा केंद्रीय गुन्हे अन्वेषण (CBI) ने तपास सुरू केला आहे. सीबीआयने सोमवारी अनेक ठिकाणी छापेमारी केली. यानंतर ममता सरकारमधील मंत्री फिरहाद हाकिम, सुब्रत मुखर्जी, आमदार मदन मित्रा आणि माजी महापौर शोवन चॅटर्जी यांची चौकशी करुन सर्वांना अटक करण्यात आले. त्यानंतर या सर्वांना कोर्टात हजर केले केले होते.
4 वर्षांपूर्वी -
PM किसान सम्मान निधी वाटप | पंतप्रधानांकडून प्रत्येक हप्त्याचा जाहीर LIVE इव्हेंट
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पंतप्रधान किसान सम्मान निधी योजने अंतर्गत शेतकऱ्यांना मिळणाऱ्या आर्थिक मदतीचा आठवा हप्ता जारी करणार आहेत. व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे ते आज सकाळी 11 वाजता संवाद साधणार आहेत. पंतप्रधान कार्यालयानुसार आज 9.5 कोटींहून अधिक शेतकऱ्यांच्या खात्यात 19 हजार कोटींहून अधिकची रक्कम वळती केली जाणार आहे. या वेळी केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर देखील उपस्थित राहणार आहेत.
4 वर्षांपूर्वी -
सोशल मिडीयासाठी खर्च आणि यंत्रणा नको | सोशल मीडियासाठी 6 कोटी खर्च करण्याचा निर्णय रद्द
उपमुख्यमंत्री कार्यालयाचा सोशल मिडीया सांभाळण्यासाठी बाह्ययंत्रणा नियुक्त करण्याची बिलकूल गरज नाही, यासंदर्भातील शासननिर्णय तात्काळ रद्द करावा, असे निर्देश “उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज (१३ मे) दिले आहेत. उपमुख्यमंत्री कार्यालयाला समाजमाध्यमांवर स्वतंत्रपणे कार्यरत राहण्याची गरज वाटत नाही.
4 वर्षांपूर्वी -
उपमुख्यमंत्र्यांच्या सोशल मीडियावर ६ कोटी खर्चाची योजना | तर मोदी सरकारचा २०२० मध्ये ७१३ कोटीचा मार्केटिंग विक्रम
राज्य सरकारने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सोशल मीडियावर तब्बल ६ कोटी रुपये खर्च करण्याचा निर्णय घेतला आहे. सामान्य प्रशासन विभागाने काल यासंदर्भातील आदेश जारी केले आहे. या आदेशात अजित पवार यांची सोशल मीडियावरील खाती सांभाळण्यासाठी आणि त्यांनी घेतलेल्या निर्णयांची माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी एखादी बाहेरची कंपनी नियुक्त करण्यात येणार आहे. ही कंपनी अजित पवार यांचे ट्विटर, फेसबुक, ब्लॉगर, यूट्युब आणि इन्स्टाग्राम खात्याचे काम बघेल.
4 वर्षांपूर्वी -
निवडणुका आल्या की पेट्रोल-डिझेलचे दर नियंत्रणात अन संपल्या की दरवाढ, हे कसलं वित्त नियोजन?
निवडणुका आल्या की पेट्रोल डिझेलचे दर नियंत्रणात ठेवले जातात आणि निवडणुका गेल्या की दरवाढ केली जाते. हे काय वित्त नियोजन आहे का, असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी उपस्थित केला. कोरोना परिस्थितीत देशात व राज्यात वाढलेली पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीबाबत जयंत पाटील यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
4 वर्षांपूर्वी -
Sarkari Naukri | बँक नोट प्रेसमध्ये 135 जागांसाठी भरती
सार्वजनिक क्षेत्रातील भारत सरकारची मिनी रत्न कंपनी भारत सिक्युरिटीज प्रिंटिंग अँड मुद्रा निर्माण निगम लिमिटेड (SPMCIL) च्या बँक नोट प्रेस कार्यालयांमध्ये विविध पदांच्या 135 रिक्त जागांवर भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे.
4 वर्षांपूर्वी -
कोरोना आपत्तीत आरोग्य विषयक पायाभूत सुविधांच्या उभारणीसाठी हा पैसा खर्च करता आला असता - अर्थतज्ज्ञ कौशिक बासू
मागील काही दिवसांपासून राजधानी दिल्लीतील Central Vista चं बांधकाम चर्चेचा विषय ठरला आहे. या प्रकल्पाच्या किंमतीपासून त्याच्या बांधकामासाठी करोना काळात देखील विशेष परवानगी देण्यापर्यंत अनेक मुद्द्यांवर आक्षेप घेतले जात आहेत. विरोधकांकडून या प्रकल्पासाठी करण्यात येणाऱ्या खर्चावर बोट ठेवण्यात आलं आहे. विशेष म्हणजे इथल्या बांधकामानंतर जगप्रसिद्ध अशा इंडिया गेट आणि त्याच्या आजूबाजूच्या परिसर हा आता इतिहास झाला आहे. अनेकांनी याबाबद्दल खेद व्यक्त करत देश मोदींना कधीही माफ करणार नाही असं म्हटलं आहे.
4 वर्षांपूर्वी -
कोरोना आपत्तीत चीनचा मोठा निर्णय | भारतासहित जगभरात फटका बसणार
देशात सलग दुसऱ्या दिवशी 24 तासातील कोरोना रुग्णसंख्येने चार लाखांचा टप्पा ओलांडला. गेल्या 24 तासात भारतात 4 लाख 14 हजार 188 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. म्हणजेच आदल्या दिवसाच्या तुलनेत नव्या कोरोनाग्रस्तांच्या आकड्यात जवळपास दोन हजारांनी वाढ झाली आहे. तर 3 हजार 915 रुग्णांना प्राण गमवावे लागले. आधीच्या दिवशी भारतात एका दिवसातील सर्वाधिक कोरोनाबळींची ( 3 हजार 980) नोंद झाली होती. आजचा आकडा कमी असला, तरी त्याच्या जवळ जाणारा आहे.
4 वर्षांपूर्वी -
आमदार मनोरा वसतिगृह पुनर्बाधणीचा निर्णय फडणवीस सरकारने २०१८ ला घेतलेला | विलंबामुळे राज्याचं ७०० कोटींचं नुकसान
भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी आमदार मनोरा वसतिगृह पुनर्बाधणी प्रकल्पावरून राज्य सरकारला लक्ष केलं होतं. यासंदर्भात त्यांनी ट्विट करताना म्हटलं होतं की, या बांधकामासाठी ठाकरे सरकारने 900 कोटीचे टेंडर काढले आहे. संसदभवनापेक्षा लसीकरणाकडे लक्ष द्या, असा पंतप्रधानांना सल्ला देणाऱ्या आमदार रोहित पवार यांच्या नजरेतून हे सुटलेलं दिसतंय, सांगा जरा मुख्यमंत्र्यांना कोरोनाकडे लक्ष द्या म्हणावं. टक्केवारी काय तिथेही मिळेल त्यांना.
4 वर्षांपूर्वी -
कोरोनाबाबत मोदी सरकारकडे दूरदृष्टीचा अभाव आणि गाफीलपणा भोवला, रघुराम राजन यांनी सुनावले
देशात कोरोना महामारीची लाट येऊन १५ महिने उलटले आहे. दरम्यान, देशात कोरोना महामारीचा प्रार्दुभाव झपाट्याने वाढत आहे. याच पार्श्वभूमीवर ऑक्सिजन, बेड, व्हेंटिलेटर आणि अत्यावश्यक औषधांचा तुटवडा भासत आहे. विशेष म्हणजे भारतात १५ महिन्यांच्या कोरोनाकाळात एकूण रुग्णांची संख्या २.०२ कोटी झाली आहे. यापैकी १.६६ कोटी कोरोनामुक्त झाले आहेत. ३५ लाखांवर उपचार सुरू आहेत. २.२२ लाख लोकांचा मृत्यू झाला.
4 वर्षांपूर्वी -
निवडणुका संपल्या, पेट्रोल-डिझेलची भाव वाढ सुरु - काँग्रेस
देशातील ४ राज्यांमधील आणि एका केंद्रशासित प्रदेशातील विधानसभा निवडणुका आता संपल्या आहेत. त्यात प. बंगाल, तामिळनाडू आणि केरळ या प्रमुख तीन राज्यांमध्ये भाजपाला मोठा फटका बसला आहे. केवळ आसाम राखण्यात त्यांना यश आलं आहे. तर पुद्दुचेरीत आधीच पक्ष फोडाफोडी करून जे घडलं होतं तेच घडलं. मात्र निकालानंतर मोदी-शहा यांची राजकीय कोंडी झाल्याचं पाहायला मिळतंय. मात्र आता त्याचे इतर परिणाम देखील सुरु झाले आहेत आणि ते थेट सामान्य लोकांशी संबंधित आहेत.
4 वर्षांपूर्वी -
Sarkari Naukri | SBI बँकेत 5237 क्लार्क पदांसाठी भरती | त्वरा करा
SBI Clerk Recruitment 2021, Sarkari Naukri 2021: देशात कोरोनाची दुसरी लाट सुरु असताना सर्वात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडियाने मोठी भरती काढली आहे. बँकेत नोकरीची संधी शोधणाऱ्यांसाठी हा सुवर्णसंधी आहे. एसबीआयने क्लार्कच्या 5237 पदांवर भरती आयोजित केली आहे. अर्ज करण्याची प्रक्रिया 27 एप्रिल 2021 म्हणजेच आजपासून सुरु झाली आहे. अर्ज करण्याची लिंक खाली देण्यात आलेली आहे.
4 वर्षांपूर्वी -
मोदींवर पूर्ण विश्वास, ते मद्रास कोर्टाच्या टिप्पणीला गांभीर्याने घेतील असा मला विश्वास - संजय राऊत
आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताचं चित्रं ज्या पद्धतीने निर्माण केलं जात आहे. त्यावरून हे फार मोठं षडयंत्र असू शकतं. भारताची अर्थव्यवस्था नष्ट करण्याचं हे मोठं षडयंत्र असू शकतं, असा दावा शिवसेना नेते संजय राऊत यांनी केला. संजय राऊत यांनी मीडियाशी संवाद साधताना हा गंभीर दावा केला. राष्ट्रीय स्तरावर भारताचा अपमान होत असेल तर त्यात राजकारण करण्याची गरज नाही.
4 वर्षांपूर्वी -
जेव्हा रुपया प्रति डॉलर ५८ रुपये होता तेव्हा ICU'त होता | आता ७५.९१ आहे तर मजबूत?
अमेरिकन डॉलरच्या (US dollar) तुलनेत भारतीय रुपयाच्या किमतीत मोठी घसरण झाली आहे. यामुळे भारतीय रुपयाने गेल्या 9 महिन्यांतील निच्चांक पातळी गाठत 75.4 रुपयांवर पोहोचला आहे. मागील तीन आठवड्यांत भारतीय रुपयात जवळपास 4.2 टक्क्यांनी घसरण झाली असून ही अर्थव्यवस्थेसाठी चिंताजनक बाब आहे. अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपयात 32 पैशांनी घसरण झाली आणि रुपया गेल्या नऊ महिन्यांच्या निच्चांक पातळीवर पोहोचला.
4 वर्षांपूर्वी -
Sarkari Naukri | SBI मध्ये 328 पदांसाठी भरती
भारतीय स्टेट बँक भरती २०२१. एसबीआय भरती २०२१. स्टेट बँक ऑफ इंडियाने अधिकृत भरती अधिसूचना जारी केली आहे आणि १४९ विविध पदांसाठी अर्ज मागविले आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार एसबीआय भरती 2021 साठी 03 मे 2021 रोजी किंवा त्यापूर्वी ऑनलाईन अर्ज करू शकतात. वयोमर्यादा, पात्रता आणि एसबीआय भरतीसाठी अर्ज कसा द्यावा यासंबंधी अधिक माहिती खाली लेखात दिली आहे.
4 वर्षांपूर्वी