महत्वाच्या बातम्या
-
गॅस सिंलिंडरच्या दरात पुन्हा वाढ | आजपासून गॅसच्या किमतींत 25 रुपयांची वाढ
एकाबाजूला पेट्रोल आणि डीझेलच्या किमती वाढत असतानाच सामान्य नागरिकांच्या खिशाला आता गॅसने सुद्धा कात्री लावली. सरकारी तेल कंपन्यांनी आजपासून गॅसच्या किमतींमध्ये 25 रुपयांची वाढ केली आहे. दिल्लीत आता सबसिडी नसलेला LPG सिलेंडर 819 रुपयांत मिळत आहे. आधी याची किंमत 794 रुपये एवढी होती. 2021 मध्ये सुरुवातीच्या दोन महिन्यांतच घरगुती सिलेंडरच्या किमतींमध्ये तब्बल 125 रुपयांची वाढ झाली आहे. 1 जानेवारी रोजी जे सिलेंडर 694 रुपयांना मिळत होते ते आता 819 रुपयांवर पोहोचले आहे.
4 वर्षांपूर्वी -
इंधन - गॅस दरवाढीचा निषेध | काँग्रेसचे आमदार सायकलवरून विधानभवनात
‘अक्कड बक्कड बंबे बो, 80, 90 पुरे 100’, ‘आपण पुन्हा आदिमानवांच्या दिशेने प्रवास करत आहोत का?’, असे फलक हातात घेऊन काँग्रेसने इंधन दरवाढीचा अनोख्या पद्धतीने निषेध नोंदवला. काँग्रेसच्या सर्व मंत्री, आमदार आणि नेत्यांनी आज सायकलवरून प्रवास करत विधान भवन गाठले. यावेळी काँग्रेसचे सर्व बडे नेते उपस्थित होते.
4 वर्षांपूर्वी -
फडणवीसांच्या काळातील पेट्रोल डिझेलवरील सेस ठाकरे सरकार हटवण्याच्या तयारीत?
देशात गेल्या दिवसांपासून इंधनाच्या दरांमध्ये सतत वाढ होताना दिसत आहे. अशात महागाईचा भडका उडाल्याचं पाहायला मिळालं. मुंबईत पेट्रोलची वाटचाल शतकाकडे चालली आहे. पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या दराने वाहनचालकांची डोकेदुखी वाढली आहे. पेट्रोल दराने शंभरी गाठली आहे. मात्र ठाकरे सरकार राज्यातील जनतेला दिलासा देण्याची शक्यता आहे. मार्चमध्ये सादर होणाऱ्या राज्याच्या अर्थसंकल्पात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात सवलत मिळण्याचे संकेत आहेत. राज्यातील जनतेला दिलासा देण्याचा प्रयत्न राज्य सरकारकडून सुरू असल्याची माहिती अर्थखात्याशी संबंधित लोकांनी दिली आहे.
4 वर्षांपूर्वी -
घरगुती गॅसच्या दरात अजून 25 रुपयाने वाढ | मोठ्या शहरांत अनुदान पूर्णपणे बंद
सरकारी तेल कंपन्यांनी गुरुवारी घरगुती गॅसच्या दरात पुन्हा सिलिंडरमागे २५ रुपये वाढ केली. यामुळे दिल्लीत १४.२ किलोच्या सिलिंडरचे दर ७६९ रुपयांवरून ७९४ रुपये झाले. वाढीव दर २५ फेब्रुवारीपासूनच लागू झाला आहे. ही वाढ उज्ज्वला योजनेच्या लाभार्थींसह अनुदानित आणि विनाअनुदानित सिलिंडरवर लागू असेल.
4 वर्षांपूर्वी -
इंधन दर कधी कमी होणार ते मला सांगता येणार नाही | हे धर्मसंकट आहे - अर्थमंत्री
देशात गेल्या दिवसांपासून इंधनाच्या दरांमध्ये सतत वाढ होताना दिसत आहे. अशात महागाईचा भडका उडाल्याचं पाहायला मिळालं. मुंबईत पेट्रोलची वाटचाल शतकाकडे चालली आहे. त्यामुळे ही सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री आहे. मुंबईत पेट्रोलचा दर प्रति लिटर 97.34 रुपये आहे तर डिझेलचा दर प्रति लिटर 88.44 पैसे इतका आहे.
4 वर्षांपूर्वी -
नीरव मोदीच्या भारत प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा | ब्रिटन न्यायालयाचा मोठा निर्णय
पंजाब नॅशनल बँकेतील 14,000 कोटी रुपयांच्या घोटाळ्यातील फरार हिरा व्यावसायिक नीरव मोदीच्या भारतात प्रत्यार्पणासाठी लंडनच्या वेस्टमिन्स्टर दंडाधिकारी न्यायालयाने गुरुवारी मान्यता दिली. नीरव मोदीविरोधात भारतात एक खटला चालू आहे, ज्याचे उत्तर त्याला द्यावे लागेल, असंही लंडनच्या वेस्टमिन्स्टर न्यायदंडाधिकाऱ्यांनी सांगितलं. नीरव मोदी याच्यावर पुरावे नष्ट करण्यासाठी आणि साक्षीदारांना धमकावण्याचा कट रचणे, असे गंभीर स्वरूपाचे आरोप आहेत.
4 वर्षांपूर्वी -
शिक्षण मंडळाचा महत्वाचा निर्णय | 8 लाख विद्यार्थ्यांना मिळणार 21.36 कोटी परत
दुष्काळ आणि नैसर्गिक संकट आदींमुळे राज्यातील काही जिल्ह्यातील विद्यार्थ्यांच्या परीक्षेची शुल्क माफी करण्याचा निर्णय तत्कालीन सरकारने घेतला होता. मात्र त्यासाठी ज्या विद्यार्थ्यांनी शुल्क भरले, त्यांना त्यांची रक्कम ही परत देण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. यासाठी विद्यार्थ्यांची बँक खाती अथवा इतर काही पर्याय आहेत, याचीही माहिती घेऊन ती परत केली जाणार असल्याचे मंडळाकडून कॉप्स या संस्थेचे पदाधिकारी अमर एकाड यांना एका पत्राद्वारे कळविले आहे.
4 वर्षांपूर्वी -
अर्थव्यवस्था धोक्यात आहे | तरुणांना रोजगार हवा आहे | मोदींच ते ट्विट व्हायरल
सोशल नेटवर्कींगवर मागील काही दिवसांपासून रोजगारासंदर्भातील विषय चांगलाच चर्चेत आहे. ‘मोदी रोजगार दो’ हा ट्रेण्ड रविवारी आणि सोमवारी ट्विटरवर टॉप ट्रेण्डींग टॉपिकमध्ये होता. मोदीजी, भाषणं नको रोजगार द्या असं म्हणणारे लाखो ट्विट करण्यात आले.
4 वर्षांपूर्वी -
इंधन दरवाढीची झळ सर्वसमान्यांना | महागाईत वाढ | भाज्या महागल्या
इंधन दरवाढीमुळे आता सर्वसामान्यांचे आर्थिक गणित कोलमडू लागले आहे. इंधनदरवाढीचा परिणाम भाजी मंडईवर जाणवू लागला आहे. आठवड्याभरात भाज्यांच्या किंमतीत किमतीत १५ ते २० रुपयाने वाढ झाली आहे. त्याची झळ सर्वसमान्यांना सोसावी लागत आहे. सातत्याने होणार्या इंधन दरवाढीचा परिणाम घाऊक तसेच किरकोळ भाजीपाला बाजारावर जाणवू लागला आहे.
4 वर्षांपूर्वी -
सर्व क्षेत्रात सरकारने असण्याची आवश्यकता नाही | सर्व सरकारी बँकांचे खासगीकरण होणार - पंतप्रधान
खासगीकरणावरील वेबिनारमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सरकारची भूमिका स्पष्ट केली. ‘धंदा करणं हा सरकारचा ‘धंदा’ नाही. सरकारनं लक्ष लोककल्याणावर केंद्रित असायला हवं. अनेक सरकारी कंपन्या तोड्यात आहेत. त्या कंपन्या करदात्यांच्या पैशांवर तग धरुन आहेत. आजारी कंपन्यांना पैसा पुरवणं हे सरकारला आता जड जात आहे’, असं पंतप्रधान मोदींनी सांगितलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने आपल्या दुसऱ्या टर्ममध्ये देशातील काही मोठ्या पण आर्थिक संकटात सापडलेल्या कंपन्यांचं खासगीकरण करण्याबाबत पाऊल टाकलं जात आहे
4 वर्षांपूर्वी -
धंदा करणं हा सरकारचा धंदा नाही म्हणणारं सरकार १०० कंपन्या विकणार
खासगीकरणावरील वेबिनारमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सरकारची भूमिका स्पष्ट केली. ‘धंदा करणं हा सरकारचा ‘धंदा’ नाही. सरकारनं लक्ष लोककल्याणावर केंद्रित असायला हवं. अनेक सरकारी कंपन्या तोड्यात आहेत. त्या कंपन्या करदात्यांच्या पैशांवर तग धरुन आहेत. आजारी कंपन्यांना पैसा पुरवणं हे सरकारला आता जड जात आहे’, असं पंतप्रधान मोदींनी सांगितलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने आपल्या दुसऱ्या टर्ममध्ये देशातील काही मोठ्या पण आर्थिक संकटात सापडलेल्या कंपन्यांचं खासगीकरण करण्याबाबत पाऊल टाकलं जात आहे
4 वर्षांपूर्वी -
80 वर्षांच्या आजोबांना वीज कंपनीकडून 80 कोटी रुपयांचे वीज बिल
मुंबईच्या वसई परिसरात राहणाऱ्या 80 वर्षांच्या आजोबांना वीज कंपनीने 80 कोटी रुपयांचे बिल पाठवले. विशेष म्हणजे हे बिल केवळ 2 महिन्यांचे आहे. हे पाहून आजोबांचे ब्लड प्रेशर वाढले आणि त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले.
4 वर्षांपूर्वी -
नोकरीदार महिलांसाठी खुशखबर | ESIC कडून आजारपणातील लाभाशी संबंधीत नियमात बदल
कर्मचारी राज्य विमा महामंडळाने (ईएसआयसी) मंगळवारी झालेल्या बैठकीत नोकरी करणार्या महिलांना मोठा दिलासा दिला आहे. बैठकीत महिलांसाठी आजारपणातील लाभ (Sickness Benefit) घेण्याच्या अटींमध्ये काहीशी शिथिलता आणली आहे. ईएसआयसीच्या या बैठकीत मातृत्व रजेनंतर आवश्यकता भासल्यास आजाराशी संबंधीत सुटी देण्याच्या व्यवस्थेत दिलासा देण्याचा निर्णय घेण्यात आला. मीडिया रिपोर्टनुसार, महिला विमाधारक 20 जानेवारी 2017 च्यानंतर याचा दावा करू शकतात. महिला विमाधारकाला यापूर्वी हा क्लेम मिळवण्यासाठी 78 दिवसापर्यंत काम करणे अनिवार्य होते. मात्र, आता तो कालावधी कमी करण्यात आला आहे.
4 वर्षांपूर्वी -
मराठा तरुणांसाठी ‘सारथी’अंतर्गत मोफत कोर्सेस | अधिक माहितीसाठी वाचा
मराठा समाजातील युवक ‘जॉब स्किल रेडी’ व्हावेत या उद्देशाने ‘सारथी’मार्फत (छत्रपती शाहू महाराज संशोधन,प्रशिक्षण व मानव विकास संस्था, पुणे) विशेष कौशल्य विकास कार्यक्रम राबवण्यात येत आहे. मराठा, कुणबी समाजाच्या तरुणांना याअंतर्गत सुरू करण्यात आलेल्या विविध कोर्सेसचा लाभ घेता येणार आहे.
4 वर्षांपूर्वी -
पेट्रोल दर वाढ | तुमचं वाहन नाही | पण रिक्षा, टॅक्सीचं भाडं वाढलं
मुंबईत एमएमआर रिजनमध्ये ऑटो आणि टॅक्सीची भाडेवाढ होणार आहे. ऑटो रिक्षाचे भाडे 18 वरुन 21 रुपयांवर तर टॅक्सीचे भाडे 22 रुपयांवरुन 25 रुपये करण्याचा निर्णय झाला आहे. परिवहन आयुक्तांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आलाय. मागील काही दिवसांपासून पेट्रोल, डिझेल आणि गॅसचे दर वाढत आहेत. त्यामुळे ऑटो रिक्षा आणि टॅक्सीचालक आंदोलनाच्या पवित्र्यात होते. मात्र, भाडेवाढीचा निर्णय होत असल्यानं आता त्यांना दिलासा मिळाला आहे. मात्र, इंधन दरवाढीचा फटका आता सर्वसामान्य नागरिकांना सहन करावा लागणार आहे.
4 वर्षांपूर्वी -
मोदी सरकारने डिझेलच्या करातून कमावलेले २१ लाख कोटी - काँग्रेस
काही दिवसांपासून पेट्रोल, डिझेलच्या दरांमध्ये वाढ सुरू आहे. तर काही शहरांमध्ये पेट्रोल शंभरी पार केले गेले आहे. तर अनेक शहरांमध्ये पेट्रोल शतकाच्या उंबरठ्यावर आहे. पेट्रोलच्या दरात सुरू असलेली वाढ अशीच वाढत राहिल्यास अनेक शहरांमध्ये पेट्रोल शतक गाठेल, अशी परिस्थिती आहे.
4 वर्षांपूर्वी -
हेच का ते अच्छे दिन | इंधन दरवाढीवरून मुंबईतील पेट्रोल पंपांवर शिवसेनेची पोस्टरबाजी
पेट्रोल-डिझेलच्या किंमती गगनाला भिडल्या आहेत. मागील काही आठवड्यांपासून इंधन दर वेगानं वाढले असून, काही ठिकाणी पेट्रोलचे दर शंभरीपार गेले आहे. पेट्रोल डिझेलच्या वाढत्या दरांमुळे सर्वसामान्य नागरिक हैराण असल्याचं चित्र आहे. याच मुद्द्यावरून विरोधकांकडून मोदी सरकार घेरण्याचा प्रयत्न केला जात आहे.
4 वर्षांपूर्वी -
वाहने रस्त्यावर सोडून एक दिवस लोकांना घरी जावे लागेल | मग बसा बोंबलत - शिवसेना
पेट्रोल-डिझेलच्या किंमती गगनाला भिडल्या आहेत. मागील काही आठवड्यांपासून इंधन दर वेगानं वाढले असून, काही ठिकाणी पेट्रोलचे दर शंभरीपार गेले आहे. पेट्रोल डिझेलच्या वाढत्या दरांमुळे सर्वसामान्य नागरिक हैराण असल्याचं चित्र आहे. याच मुद्द्यावरून विरोधकांकडून मोदी सरकार घेरण्याचा प्रयत्न केला जात आहे.
4 वर्षांपूर्वी -
पेट्रोलचे भाव तब्बल 101.22 | नव्या ऐतिहासिक दराच्या दिशेने वाटचाल सुरु
पेट्रोल आणि डीझेलच्या भावांमध्ये पुन्हा वाढ करण्यात आली आहे. सलग 12 व्या दिवशी ही वाढ झाली आहे. नवीन दरांप्रमाणे आता मुंबईत प्रति लिटर पेट्रोलचे भाव चक्क 97 रुपयांवर पोहोचले. तर दिल्लीत पेट्रोल प्रति लिटर 90.58 रुपयांनी विकले जात आहे. दिल्लीत आज डीझेलच्या किमती 37 तर पेट्रोलच्या किमती लिटरप्रमाणे 39 पैशांनी वाढवण्यात आल्या आहेत.
4 वर्षांपूर्वी -
आम्ही तेल प्रकल्प उभारले | सात वर्षात तुम्ही काय केलं जाहीरपणे सांगा - काँग्रेस
मागील काही दिवसांपासून पेट्रोल डिझेलच्या दरांमध्ये सातत्यानं वाढ होत आहे. यामुळे सर्वसामान्यांचं कंबरडं मोडलं आहे. देशातील काही राज्यांमध्ये पेट्रोलच्या दरांनी शंभरी गाठली आहे. तर काही राज्यांमध्ये पेट्रोल शंभरीच्या उंबरठ्यावर आहे. राज्यातील प्रमुख शहरांमध्ये पेट्रोल लवकरच शंभरी पार करेल. पेट्रोल, डिझेलच्या किमती सातत्यानं वाढत असल्यानं सामान्य नागरिक अक्षरश: मेटाकुटीला आले आहेत.
4 वर्षांपूर्वी