महत्वाच्या बातम्या
-
Mhada Lottery | पुणे विभागातील म्हाडाच्या घरांचा ऑनलाईन निकाल पाहा Live
म्हाडाच्या पुणे विभागाच्या 5647 घरांसाठी आज सोडत जाहीर केली जाणार आहे. यामध्ये अनेकांची पुणे, सोलापूर, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यांमधील घरांचा समावेश आहे. दरम्यान यंदा देखील ही लॉटरी सोडत अर्जदारांना ऑनलाईन पाहता येणार आहे. नेहरू मेमोरियल हॉलमध्ये या म्हाडा घरांच्या लॉटरीचा निकाल ऑनलाईन जाहीर केला जाईल. या ठिकाणी गर्दी टाळण्यासाठी अधिकाधिक अर्जदारांनी त्याच वेबकास्टिंग पहावं असं आवाहन करण्यात आले आहे. भाग्यवान विजेत्यांना घरबसल्या निकाल पाहण्याची सोय यंदा देखील उपलब्ध असेल. सोबतच ज्यांना या सोडतीमध्ये घर लागणार आहे त्यांना ई मेल, एसएमएस या द्वारा माहिती मिळणार आहे.
4 वर्षांपूर्वी -
म्हाडा लॉटरी पुणे | घरांसाठी दलालाची गरज नाही | नागरिकांनी भूलथापांना बळी पडू नये
म्हाडा’च्या माध्यमातून सर्वसामान्यांना दर्जेदार आणि माफक दरात हक्कांची घरे मिळवून देण्याचे काम सुरु आहे. ‘म्हाडा’ची प्रक्रिया अत्यंत पारदर्शक व भ्रष्टाचारमुक्त असून यासाठी कोणत्याही दलालाची नेमणूक करण्यात आलेली नाही. त्यामुळे नागरिकांनी कोणत्याही भूलथापांना बळी पडू नये, असे आवाहन उपमुख्यमंत्री तथा पुणे पालकमंत्री अजित पवार यांनी केले.
4 वर्षांपूर्वी -
महाविकास आघाडीला पाठिंबा देणारे छोटे पक्ष ईडीच्या रडारवर | विवा ग्रुपवर ईडीची छापेमारी
सध्या महाविकास आघाडीतील नेते मंडळी ईडीच्या रडारवर असल्याचं पाहायला मिळालं आहे. खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत आणि त्यापूर्वी शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांना चौकशीच्या फेऱ्यात घेण्यात आलं आहे. त्यानंतर ईडीचा मोर्चा भाजपाला राम राम ठोकून राष्ट्रवादीत प्रवेश करणाऱ्या एकनाथ खडसे यांच्यावर तेही पाहायला मिळालं आहे.
4 वर्षांपूर्वी -
Jio चे गहू विकत होते | पोलिसांच्या नेटवर्क क्षेत्रात आले आणि पकडले गेले
भारतात काही घडू शकते, असे म्हटले जाते. याचाच प्रत्यय देणारी एक घटना सुरतमध्ये घडली आहे. सूरतमधील एका भागात ‘रिलायन्स जिओ’चा लोगो वापरून चक्क गव्हाचे पीठ विकणाऱ्या चौघा जणांना पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे.
4 वर्षांपूर्वी -
TRP scam | पार्थो दासगुप्ता यांचा जामीन अर्ज सत्र न्यायालयाने फेटाळला
बहुचर्चित टीआरपी घोटाळ्यातील आरोपी ब्रॉडकास्ट ऑडियन्स रिसर्च काउन्सिलचे (बार्क) माजी सीईओ पार्थो दासगुप्ता यांचा जामीन अर्ज मुंबईतील सत्र न्यायालयाने फेटाळला. यामुळे दासगुप्ता यांचा कोठडीतला मुक्काम वाढणार आहे.
4 वर्षांपूर्वी -
बेपत्ता अब्जाधीश जॅक मा एका कार्यक्रमात व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे सहभागी
मागील अनेक दिवसांपासून गायब असलेले आशियातील सर्वात श्रीमंत उद्योगपती जॅक मा (Jack Ma) यांचा पहिला व्हिडीओ समोर आला आहे. अलिबाबा या ई कॉमर्स कंपनीचे संस्थापक असलेले जॅक मा यांचा हा व्हिडीओ चीनचं सरकारी वृत्तपत्र ग्लोबल टाईम्सने जारी केला आहे. जॅक मा हे ग्रामीण शिक्षणासंदर्भातील एका कार्यक्रमात व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे सहभागी झाले होते.
4 वर्षांपूर्वी -
पीएम केअर फंडाच्या पारदर्शकतेवर पश्नचिन्ह | हिशोब सार्वजनिक करण्याची मागणी
पीएम केअर पंडचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. 100 माजी नोकरशाहांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पीएम केअर फंडाच्या पारदर्शकतेवर पश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. या नोकरशाहांनी शनिवारी पंतप्रधानांना एक पत्रही लिहिलं आहे. कोणत्याही शंकांचं निरसन करण्यासाठी आणि जनतेला उत्तर देण्यासाठी पीएम केअर फंडात पारदर्शकता आणण्याची मागणी केली आहे.
4 वर्षांपूर्वी -
झटपट कर्ज देणारे ॲप्स धोकादायक | उच्च न्यायालयाची RBI आणि केंद्र सरकारला नोटीस
मोबाइल आणि अॅप हे आपल्या जीवनातील सध्या दैनंदिन गरजेचे भाग झाले आहेत. सातत्याने इंटरनेटद्वारे मोबाइलची हाताळणी करताना अनेक जाहराती येत असतात. त्यात सध्या एका क्लिकवर ऑनलाइन कर्ज, अशा जाहिराती सातत्याने दिसतात. या जाहिरातीला क्लिक केले की ते संबंधित अॅप डाऊनलोड करण्यास सांगितले जाते. तात्काळ कर्ज मिळवण्याच्या इच्छेने आपण अॅप डाऊनलोड करतो. संबंधित अॅप तुम्हाला तुमचा पॅन कार्ड क्रमांक, नोकरीचे ठिकाण, मासिक वेतन व बँक खात्याची माहिती विचारते. अमूक कर्ज रकमेचा हफ्ता असा असेल, असे भासवले जाते. सर्व माहिती टाकताच ही रक्कम खात्यात येतेदेखील. आपण हफ्ते भरण्यास सुरुवात करतो. पण दोन-तीन मासिक हफ्ते भरले की कळते या कर्जावरील व्याजदर भीषण स्वरुपात वाढविण्यात आले आहेत.
4 वर्षांपूर्वी -
Good News | महाराष्ट्रातील अंगणवाडी सेविकांना सेवानिवृत्तीचा लाभ मिळणार
महाराष्ट्रातील अंगणवाडी सेविकांना आता सेवानिवृत्तीचा लाभ तात्काळ मिळणार आहे. अंगणवाडी सेविका, मदतनीस व लघु अंगणवाडी सेविका यांना सेवानिवृत्ती, राजीनामा किंवा मृत्यू झाल्यानंतर भारतीय विमा निगमतर्फे लाभाची रक्कम एकरकमी प्रदान करण्यात येईल अशी माहिती देण्यात आली आहे.
4 वर्षांपूर्वी -
आनंद महिंद्रांचा WhatsApp ला रामराम | सिग्नल अँप इन्स्टॉल
अलिकडे व्हॉट्सअँपने आपली प्रायव्हसी पॉलिसी अपडेट केली असून त्याबद्दल सर्व युजर्संना इन-अँप नोटीफिकेशन मिळत आहे. व्हॉट्सअँपवर आपल्या परेन्ट कंपनी फेसबुक सोबत डेटा शेअर करणार असल्याचे या अपडेटेड पॉलिसीमध्ये नमूद केले आहे. सध्या होत असलेल्या ऑनलाईन फ्रॉड्स आणि डेटा हॅकिंगमुळे बहुतांश लोकांनी व्हॉट्सअँपला पर्यायी अँप शोधण्याचे काम सुरु केले आहे. दरम्यान, टेलिग्राम आणि सिगनल अँप प्रचलित होत आहेत. या अपडेटेड पॉलिसीचा खरा अर्थ काय? फेसबुक सोबत कोणता डेटा शेअर करणार? युजरकडून कोणता डेटा घेणार? व्हॉट्सव्हॉट्सअँप अँप युजर्सचे खाजगी मेसेजेस वाचू शकतो का? असे अनेक प्रश्न सर्वांना पडले आहेत.
4 वर्षांपूर्वी -
ढिसाळ बँक व्यवस्थापन | अजून एका सहकारी बँकेचं लायसन्स रद्द
महाराष्ट्रातल्या आणखी एका बँकेचं लायसन्स आरबीआयनं रद्द केलंय. उस्मानाबादच्या वसंतदादा नागरी सहकारी बँकेचं लायसन्स रद्द करण्यात येत असल्याची घोषणा आरबीआयनं केलीय. बँकेची जी सध्याची स्थिती आहे, त्यात बँक ग्राहकांची देणी देण्यात किंवा व्यवहार करण्यास असमर्थ असल्याचंही आरबीआयनं म्हटलंय. विशेष म्हणजे बँकेचं लायसन्स रद्द झालं तर कोणत्याही ग्राहकाची 5 लाखापर्यंतची रक्कम सुरक्षित आहे. ती त्यांना परत मिळण्याची गॅरंटी आहे. त्यानुसार उस्मानाबादच्या वसंतदादा नागरी सहकारी बँकेच्या 99 टक्के ग्राहकांचा पैसा सुरक्षित आहे.
4 वर्षांपूर्वी -
२० लाख अपात्र शेतकऱ्यांना १,३६४ कोटीचं वाटप | RTI अंतर्गत माहिती उघड
पंतप्रधान किसान सन्मान योजने अंतर्गत २०.४८ लाख अपात्र लाभार्थ्यांना १,३६४ कोटी रुपयांचे वाटप करण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. केंद्रीय कृषी मंत्रालयाने माहिती अधिकारात ही माहिती दिली आहे.
4 वर्षांपूर्वी -
Privacy Policy | Whatsapp, Facebook वर बंदी घाला | व्यापाऱ्यांची केंद्राकडे मागणी
फेसबुकच्या मालकीचं व्हॉट्सअॅप नवीन वर्षात कात टाकतंय. येत्या 8 फ्रेबुवारी 2021 ला व्हॉट्स अॅप आपली सेवा, अटी तसंच गोपनियतेच्या धोरणात बदल करत आहे. व्हॉट्स अॅपच्या नव्या अटी आणि धोरणांशी सहमत नसाल तर तुमचं व्हॉट्स बंद होणार आहे.
4 वर्षांपूर्वी -
PAN Card | घरबसल्या 10 मिनिटांत बनवा | ऑनलाईन स्टेप्स
पॅन कार्ड अनेक कामांसाठी, महत्त्वपूर्ण डॉक्यूमेंट मानलं जातं. इनकम टॅक्स रिटर्न करायचं असेल, बँकेत 50000 हून अधिक रक्कम काढायची असेल, वाहन खरेदी अशा अनेक कामांसाठी पॅन कार्ड मागितलं जातं. त्यामुळे प्रत्येकाचं पॅन कार्ड असणं अतिशय आवश्यक आहे. जर तुमच्याकडे पॅन कार्ड नसेल, तर घरबसल्या पॅन कार्ड फ्रीमध्ये बनवता येणार आहे. पॅन कार्ड बनवण्साठी ओळख पत्र, अॅड्रेस प्रूफ आणि जन्मतारखेचा प्रूफ असणे आवश्यक आहे.
4 वर्षांपूर्वी -
अनिल अंबानींच्या ३ कंपन्यांची बँकेत फ्रॉड खाती | आर्थिक अफरा-तफरी | ना ED ना CBI
मोदी सरकार देशभर विरोधकांच्या मागे ईडी, CBI आणि इन्कम टॅक्स खात्याच्या चौकशी लावून विरोधकांना त्रास देत असल्याचा आरोप नेहमीच करण्यात येतोय. त्यात सर्वाधिक भर हा ज्या राज्यात भाजपाची सत्ता नाही तिथल्या विरोधकांना लक्ष केलं जातं. सध्या महाराष्ट्रातील सत्ताधारी आणि त्यांचे नातेवाईक विशेष लक्ष आहेत.
4 वर्षांपूर्वी -
‘इनोव्हेटिव्ह रिजन’ म्हणून कोकणच्या विकासासाठी बांधील – उपमुख्यमंत्री
कोकणात बुद्धीमत्ता, सर्जनशीलतेची विपूलता असून जगाच्या पाठीवर संशोधन करणाऱ्या भारतीयांपैकी अनेक जण कोकणातील आहेत. कोकणात नैसर्गिक साधनसंपत्तीबरोबर ‘इनोव्हेटीव्ह’ संशोधनासाठी अनुकुल वातावरण व क्षमता आहे. त्यामुळे कोकणातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग हे तीन जिल्हे ‘इंटरनॅशनल ग्रीनफिल्ड इनोव्हेटिव्ह रिजन’ म्हणून विकसित करण्याची सूचना राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसेवा शरद पवार यांनी आज केली.
4 वर्षांपूर्वी -
फ्लॅटची स्टॅम्प ड्युटी आता बिल्डरला भरावी लागणार | ग्राहकांना मोठा फायदा
ठाकरे सरकारच्या मंत्रिमंडळाची आज बैठक झाली असून, या बैठकीत महत्त्वाचे निर्णय घेण्यात आलेत. या बैठकीत बांधकाम व्यावसायिकांना प्रीमियममध्ये 50% सवलत देण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आलाय. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत या प्रस्तावाला मंजुरी मिळालीय. त्यामुळे बांधकाम व्यावसायिकांना मोठा दिलासा देण्यात आलाय. या आधीच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत आयत्यावेळी प्रस्ताव आल्याने काँग्रेसने विरोध केला होता, पण सरकारमधील तीनही पक्षांची चर्चा झाल्यानंतर आज या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहे.
4 वर्षांपूर्वी -
Sarkari Naukri | आयकर विभागात भरती | 10 वी पास व पदवीधर उमेदवारांना संधी
Income Tax Department Recruitment 2021 : आयकर विभाग अंतर्गत आयकर निरीक्षक, कर सहाय्यक, मल्टी-टास्किंग स्टाफ पदांच्या एकूण 38 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. उमेदवाराचे वय 18 ते 25 वर्षे दरम्यान असावे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 जानेवारी 2021 आहे. तरी अहर्ता आणि इतर महत्वाची महिती तुम्ही खाली सविस्तर वाचू शकता. तसेच सरकारी आणि खाजगी नोकरी संदर्भात थेट मोबाईलवर अलर्ट हवे असल्यास महाराष्ट्रनामा मोबाईल अँप डाउनलोड करा.
4 वर्षांपूर्वी -
वर्षा राऊत यांना ईडीकडून पुन्हा समन्स | ११ जानेवारीला हजर राहण्याचे आदेश
पीएमसी बँक घोटाळ्याप्रकरणी शिवसेना नेते व राज्यसभा सदस्य संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना ईडीने पुन्हा एकदा समन्स बजावले आहेत. ११ जानेवारीला चौकशीसाठी हजेर राहण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.
4 वर्षांपूर्वी -
भविष्यातील राजकारण | डेटा सायन्स | चीनला जॅक मा नव्हे त्यांच्याकडील ग्राहक डेटा हवाय
चीनमधील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक असणारे अब्जाधीश, चीनमधील सर्वात मोठी ऑनलाइन कंपनी असणाऱ्या अलिबाबा समूहाचे संस्थापक आणि माजी अध्यक्ष जॅक मा यांनी मागील काही महिन्यांपासून सर्वजनिक कार्यक्रमांना उपस्थिती लावलेली नाही. त्यामुळे जॅक मा हे बेपत्ता असल्याचा भीती व्यक्त केली जात आहे. मागील दोन महिन्यांपासून जॅक मा हे कोणत्याही सार्वजनिक कार्यक्रमाला उपस्थित राहिलेला नाहीत. त्यामुळे त्यांच्यासंदर्भातील वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलं आहे.
4 वर्षांपूर्वी