महत्वाच्या बातम्या
-
दिवाळी आधी राज्य सरकारकडून शेतकऱ्यांना मदत मिळणार | वडेट्टीवार यांची माहिती
राज्यातील परतीच्या पावसानं मोठा धुमाकूळ घातला होता. अनेक ग्रामीण भागात अतिवृष्टी झाल्यानं शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठं नुकसान झालं होतं. अतिवृष्टी नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत देण्याची घोषणा महाविकास आघाडी सरकारनं केली होती. अखेर त्यासंदर्भात निर्णय झाला असून, दिवाळी आधी महाराष्ट्र सरकारकडून शेतकऱ्यांना मदत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्याचे मदत व पुर्नवसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी प्रसार माध्यमांना याबाबत माहिती दिली.
5 वर्षांपूर्वी -
मेट्रो ३ कांजूरमार्गच्या जमिनीवर केंद्राचा दावा | मोदी सरकार व गुजरात केडरचे अधिकारी सरसावले
ठाकरे सरकारने काही दिवसांपूर्वी अधिकृत घोषणा करून कागदोपत्री आरेतील मेट्रो कारशेड कांजूरमार्गमध्ये स्थलांतरित करण्याचा निर्णय घेतला होता आणि त्यानंतर राज्य सरकारचा सर्वबाजूंनी कौतुक करण्यात आलं होतं. या निर्णयानंतर राज्यातील भाजप आणि ठाकरे सरकारमध्ये अनेक आरोप प्रत्यारोप झाले होते. मात्र यामध्ये केंद्रातील मोदी सरकारने आडकाठी घातल्याने खळबळ माजली आहे.
5 वर्षांपूर्वी -
अजून एक धक्कादायक अंदाज | रिलायन्सच्या शेअर 'इतका' कोसळणार
कोरोना आपत्ती आणि लॉकडाउनमुळे एकूण इंधनाची मागणी प्रचंड प्रमाणात घटली आणि परिणामी कंपनीच्या नफ्यात गेल्यावर्षीच्या तुलनेत मोठी घट झाल्याचं समोर आलं आहे. लॉकडाउनमुळे ऑइल रिफायनिंग आणि पेट्रोकेमिकल्सच्या उद्योगात मोठा आर्थिक परिणाम झाला आहे. परिणामी कंपनीला नकारात्मक कामगिरीला तोंड द्यावं लागलं आहे. मात्र त्यात अजून एक धक्कादायक अंदाज व्यक्त झाल्याने रिलायन्सची चिंता मोठ्या प्रमाणात वाढू शकते. रिलायन्सच्या नकारात्मक कामगिरीनंतर ब्रोकरेज संस्थांनी रिलायन्स इंडस्ट्रीजचा (Reliance Industries Share value) आढावा घेऊन शेअरबाबत महत्वपूर्ण अंदाज व्यक्त केला आहे.
5 वर्षांपूर्वी -
स्वतःच्या जाहिरातीसाठी मोदी सरकारने करदात्यांचे ७१३ कोटी उधळले | प्रति दिन २ कोटी
नरेंद्र मोदी सरकारने गेल्या आर्थिक वर्षात करदात्यांच्या पैशातील सुमारे 713.20 कोटी रुपये खर्च केले ज्यामुळे वृत्तपत्रे, इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि होर्डिंग्ज इत्यादी जाहिरातींद्वारे स्वतःची जोरदार जाहिरातबाजी केल्याचं समोर आलं आहे.
5 वर्षांपूर्वी -
आजपासून LPG सिलिंडर होम डिलिव्हरीचे नियम बदलले | वाचा अन्यथा...
होम डिलीव्हरीचे नियम बदलत आहेत, मात्र किंमती नाही. सिलिंडर चोरट्यांना रोखण्यासाठी आणि खर्या ग्राहकाची ओळख पटविण्यासाठी कंपनीने मोठा निर्णय घेतला आहे. नवीन नियम 1 नोव्हेंबरपासून लागू होईल, ज्याचा परिणाम फक्त घरगुती सिलिंडरवर होईल. तथापि, जुना नियम व्यावसायिक सिलिंडरवर लागू राहील. LPG सिलिंडरच्या होम डिलिव्हरीमध्ये कंपन्यांनी ऑथेंटिकेशन कोड लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. या नियमांतर्गत, गॅस वितरणवेळी ओटीपी क्रमांकाची आवश्यकता असेल. इतकेच नाही तर हा नियम लागू करण्यासाठी ऍप ही तयार करण्यात आला आहे.
5 वर्षांपूर्वी -
अनिल अंबानी कंपनीचे मुख्यालय येस बँकेच्या ताब्यात जाणार
अनिल अंबानी यांच्या उद्योगसमूहाचे मुंबईतील मुख्यालय ‘रिलायन्स सेंटर’चा ताबा घेण्याची प्रक्रिया येस बँकेने सुरू केली आहे. हे मुख्यालय विकून टाकणे अथवा आपले कार्यालय तेथे हलविणे असे दोन पर्याय बँकेसमोर असल्याचे सूत्रांनी सांगितले.
5 वर्षांपूर्वी -
कांद्याच्या दरांनी रडवल्यानंतर आता मिरचीने सर्वसामान्य जनतेला ठसका बसणार
काही दिवसांपूर्वी कांद्याने सामान्य ग्राहकांच्या डोळयात पाणी आणल्याचं पाहायला मिळालं. रोजचा प्रपंच चालावं देखील गृहिणींना कठीण झालं होतं. संपूर्ण किचनचा बजेटच बिघडल्याने गृहिणी देखील संताप व्यक्त करत होत्या.
5 वर्षांपूर्वी -
गॅस सिलेंडरचे अनुदान तुमच्या खात्यावर जमा होत नाही | काय असावं कारण?
केंद्र सरकार दर महिन्याला घरगुती गॅस सिलेंडरचे दर जाहीर करत होते. त्यामुळे दर महिन्याला गॅस सिलेंडरची किंमत बदलत असून, त्यामागील अनुदान देखील बदल होते. आठशे रुपयांच्या सिलिंडरचे साधारण दोनशे रुपयांचे अनुदान ग्राहकांच्या आधारकार्डला जोडलेल्या बँक खात्यात जमा होत असे.
5 वर्षांपूर्वी -
पंतप्रधानजी जनतेला लुटून मित्रांना पैसे देणं बंद करा | आत्मनिर्भर बना – राहुल गांधी
केंद्र सरकार कोरोना फंड जमवण्यासाठी पेट्रोल-डिझेलवर अधिक टॅक्स लावण्याच्या तयारीत आहे. त्यावरून काॅंग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. राहुल गांधी यांनी एका बातमीचा स्क्रिनशाॅट शेअर करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधलाय. ‘पंतप्रधानजी जनतेला लूटने सोडा, आपल्या मित्रांना पैसे देणं बंद करा, आत्मनिर्भर बना, असं ट्विट राहुल गांधी यांनी केलं आहे. राहुल गांधी यांनी केलेलं हे ट्विट काही वेळातच अनेकांनी रिट्विट आणि लाईक केलं आहे.
5 वर्षांपूर्वी -
जम्मू काश्मीर आणि लडाखमध्ये आता कोणीही जमीन खरेदी करू शकेल
केंद्रातील मोदी सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. आता देशातील कोणतीही व्यक्ती जम्मू-काश्मीरमध्ये जमीन खरेदी करुन तेथे स्थायिक होऊ शकते. मात्र, शेतजमिनीवरील बंदी अद्याप कायम असणार आहे. मंगळवारी गृह मंत्रालयाने एक नवीन अधिसूचना जारी केली आहे.
5 वर्षांपूर्वी -
अब्जाधीश बिर्ला कुटुंबियांसोबत अमेरिकेत वर्णभेद | रेस्टॉरंटमधून बाहेर काढले
देशातील प्रसिद्ध उद्योगपती कुमार मंगलम बिर्ला यांच्या कुटुंबियांसोबत वर्णभेद झाल्याचे प्रकरण समोर आले आहे. बिर्ला कुटुंबियांसोबत ही घटना अमेरिकेची राजधानी वॉशिंग्टनमध्ये घडली आहे. कुमार मंगलम बिर्ला यांची मुलगी अनन्या बिर्ला यांनी ट्वीट करून याची माहिती दिली.
5 वर्षांपूर्वी -
मोदींचा व्होकल फॉर लोकल नारा | भारतीयांकडून एका आठवड्यात चायनीस मोबाईल खरेदीचा विक्रम
विजयादशमी म्हणजेच दसऱ्या निमित्त देशवासीयींना शुभेच्छा देत पंतप्रधान मोदींनी आजच्या मन की बात कार्यक्रमाद्वारे जनतेशी संवाद साधला. विजयादशमीचे पर्व हे असत्यावर सत्याच्या विजयाचे व एकप्रकारे संकटावर धैर्याच्या विजयाचे देखील पर्व असल्याचे त्यांनी सुरूवातीस सांगितले. तसेच, सण-उत्सवांच्या काळात बाजारात खरेदीसाठी जाताना व्होकल फॉर लोकलचा आपला संकल्प नक्कीच लक्षात ठेवा, असं त्यांनी देशवासीयांना आवाहन केलं आहे.
5 वर्षांपूर्वी -
सोशल मीडिया, फेक न्यूजमार्फत बेरोजगारांचे लक्ष काही काळासाठी इतरत्र वळवता येईल पण...
एस.पी. जैन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च या संस्थेच्या वतीने आयोजित वेबिनारमध्ये रघुराम राजन यांनी अनेक विषयांवर भाष्य केलं. देशातील बेरोजगारीचे वाढते प्रमाण आणि तरुणांच्या आयुष्यावर होणाऱ्या दूरगामी परिणामांवर त्यांनी सखोल भाष्य यावेळी केलं. आत्मनिर्भर भारत या उपक्रमांतर्गत आयातीपेक्षा निर्यातीवर भर देण्याच्या मोदी सरकारच्या प्रयत्नांबद्दलही राजन यांनी इशारा दिला. निर्यातीला प्राधान्य देण्याचे प्रयत्न यापूर्वीही देशात झाले असून ते आतापर्यंत अयशस्वी ठरले आहेत, याकडेही राजन यांनी उपस्थितांचे लक्ष वेधले.
5 वर्षांपूर्वी -
BREAKING | ITR भरण्याची डेडलाइन वाढवली | आता ही असणार तारीख
कोरोना काळात सरकारकडूव सामान्यातील सामान्य माणसांना आर्थिक दिलासा देण्यासाठी विविध प्रयत्न सुरू आहेत. दरम्यान देशाच्या अर्थचक्रात महत्त्वाचा सहभाग असणाऱ्या करदात्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. इनकम टॅक्स रिटर्न (ITR) भरण्यासाठी सर्वसामान्यांना आणखी वेळ मिळाला आहे. सेंट्रल बोर्ड ऑप डिरेक्ट टॅक्सेस (CBDT)ने 2019-20 या आर्थिक वर्षासाठी आयकर विवरणपत्र (Income Tax Returm) भरण्यासाठीची डेडलाइन 31 डिसेंबर 2020 पर्यंत वाढविली आहे. त्याचप्रमाणे ज्यांचे आयटीआर ऑडिट करणे आवश्यक आहे त्यांच्यासाठी या प्रक्रियेची अंतिम मुदत 31 जानेवारी 2021 पर्यंत वाढवण्यात आली आहे.
5 वर्षांपूर्वी -
मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेले पॅकेज अतिशय फसवे | फडणवीसांची टीका
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेजी यांनी जाहीर केलेले पॅकेज हे अतिशय फसवे असल्याची टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलीय. बळीराजाला अतिशय तोकडी मदत देताना, त्यांनी निव्वळ बहाणे शोधले. शेतकर्यांचे झालेले प्रचंड नुकसान पाहता त्यांनी जाहीर केलेली मदत ही तोंडाला पाने पुसणारी असल्याचे ते म्हणाले.
5 वर्षांपूर्वी -
अतिवृष्टीबाधित शेतकऱ्यांना १० हजार कोटींची मदत | मुख्यमंत्री ठाकरेंची घोषणा
राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक भागांत शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. हातातोंडाशी आलेले पिक वाहून गेले आहे. या अतिवृष्टी आणि पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने १० हजार कोटी रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत या आर्थिक मदतेची घोषणा केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, हे १०,००० कोटी रुपये विविध कारणआंसाठी असणार आहेत. शेतीचे झालेले नुकसान, वाहून गेलेली शेती, खरडून गेलेली शेती, पिकं वाहून गेली असतील, रस्ते उद्धवस्त झाले असतील, विजेचे खांब पडले असतील, दळणवळण यंत्रणा असेल या सर्व गोष्टींसाठी दहा हजार कोटी आम्ही जाहीर करत आहोत.
5 वर्षांपूर्वी -
ऑटोमेशनमुळे जगभरात करोडो नोकऱ्या जाणार | स्वतःला अपग्रेडेड ठेवा अन्यथा...
भारतात नोटाबंदी आणि जीएसटी लागू झाल्यानंतर देशाच्या अर्थव्यवस्थेला आलेली मरगळ दूर करण्यासाठी मोदी सरकारचे प्रयत्न सुरु असतानाच देशात करोना विषाणूचा शिरकाव झाला. त्यानंतर मार्च २०२० पासून अद्यापपर्यंत अर्थव्यवस्थेचे मोठे नुकसान झाले. पाच महिन्यांच्या लॉकडाउनमुळे जीडीपीचा दर मायनसमध्ये पोहोचला. जो आपला शेजारील देश बांगलादेशच्या जीडीपीपेक्षाही खाली गेला. त्याचबरोबर सप्टेंबर २०२० ची बेरोजगारीची आकडेवारीही समोर आली. यामध्ये देशातील बेरोजगारीचा दर हा ६.६७ टक्के नोंदवण्यात आला आहे. सध्याच्या ताज्या बेरोजगारीच्या आकडेवारीकडे पाहता ४५ वर्षांतील सर्वात वाईट कामगिरी असल्याचं समोर आलं आहे.
5 वर्षांपूर्वी -
कोरोनाच्या लसीकरणासाठी भारताला येईल ५० हजार कोटी खर्च | प्रति लस किंमत?
अद्याप कोरोनावरील लस विकसित झाली नसली तरी लवकरच अशी लस उपलब्ध होण्याची शक्यता आहेत. त्या पार्श्वभूमीवर सरकारकडून ही तरतूद करण्यात येत आहे. दरम्यान, चीननंतर जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला दुसरा देश असलेल्या भारताला कोरोनाविरोधातील लसीकरणासाठी तब्बल ५० हजार कोटींचा खर्च येणार आहे.
5 वर्षांपूर्वी -
AXIS ला नो ऍक्सेस | अधिक सुविधांसहित मुंबई पोलीसांचे पगार HDFC बँकेत
मुंबई पोलीसांचे पगार आता एचडीएफसी बँकेत होणार आहेत. बॅंकतून त्यांना पोलिसांना १ कोटी विमा कवच आणि इतर सुविधा मिळणार आहे. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना २०१५ साली अॅक्सिस बँकेत मुंबई पोलिसांचे पगार करण्याबाबत करार करण्यात आला होता. या कराराची मुदत ३१ जुलै २०२० रोजी संपली आहे. त्यानंतर राज्य सरकारने एचडीएफसी बॅंकेत पगार करण्याचा निर्णय घेतला.
5 वर्षांपूर्वी -
अर्थव्यवस्था पुनरुज्जीवनाच्या उंबरठ्यावर – शक्तिकांत दास
कोरोनामुळे देशाची आर्थिक स्थिती ढासळली होती ती आता हळूहळू पूर्ववत होत असल्याची माहिती रिझव्र्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी दिली आहे. केंद्र सरकार आणि मध्यवर्ती बँकेकडून परिस्थितीजन्य लवचीकता दाखवत मौद्रिक आणि वित्तीय धोरणांचा सातत्याने पाठपुरावा केला गेल्याने, देशाची अर्थव्यवस्था आता पुनरुज्जीवनाच्या उंबरठय़ावर येऊन ठेपली आहे, असे रिझव्र्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी काल म्हटले आहे.
5 वर्षांपूर्वी