महत्वाच्या बातम्या
-
BREAKING | मोदींचा नवा भारत जगातील सर्वात प्रभावशाली देशांच्या यादीतून बाहेर
लॉकडाउनमुळे भारताला बसलेल्या आर्थिक फटक्याच्या पार्श्वभूमीवर आणखी एक चिंता वाढविणार वृत्त समोर आलं आहे. कारण सामर्थ्यशाली देशांच्या यादीमधून भारत बाहेर फेकला गेला आहे. भारत हा आशियामधील चौथा सर्वात शक्तीशाली देश ठरला आहे. सिडनीमधील लोवी इन्स्टिट्यूटने केलेल्या अभ्यासामध्ये आशियामधील सर्वात प्रभावशाली देशांची यादी जाहीर केली आहे.
5 वर्षांपूर्वी -
पंजाब सरकार आक्रमक | विधानसभेत केंद्राच्या कृषी कायद्याविरोधात विधेयक सादर
संसदेत विरोधकांचा विरोध डावलत संमत करण्यात आलेल्या तीन कृषी विषयक वेधयकांविरोधात पंजाबनं रणशिंग फुंकलंय. राष्ट्रपतींनी या विधेयकांवर स्वाक्षरी केल्यानंतर त्याचं आता कायद्यात रुपांतर झालं असलं. या कायद्याचा विरोध म्हणून पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी मंगळवारी पंजाब विधानसभेत कृषी कायद्याविरोधात विधेयक सादर केलं. ‘सरकार कोसळलं तरी बेहत्तर पण राज्यात कृषी कायदा लागू होऊ देणार नाही’, असं मुख्यमंत्री अमरिंदर सिंह यांनी विधानसभेत गर्जना केली.
5 वर्षांपूर्वी -
परतीच्या पावसाने सामान्यांच्या डोळ्यात पाणी येणार | कांदा शंभरी गाठणार
परतीच्या पावसाचा जसा शेतकऱ्यांना फटका बसला, तसाच सर्वसामान्य ग्राहकांनाही बसायला सुरुवात झाली आहे. भाजी बाजारातील दरवाढीची झलक दाखवायला कांद्याने सुरुवात केलीय. काही आठवड्यांपूर्वी २० ते २५ रुपये किलो दराने कांदा मिळत होता. मात्र सध्या कांद्याचे दर तब्बल ७० रुपयांच्या घरात पोहोचलेत. राज्यातील कांद्याची परिस्थिती पाहता येत्या काही दिवसांत कांद्याने शंभरी गाठली, तरी आश्चर्य वाटून घेऊ नका, असं राज्यातले अनुभवी व्यापारी सांगतायत.
5 वर्षांपूर्वी -
पंकजा मुंडेचं वर्चस्व असलेल्या बँकेच्या चेअरमनला लाच घेताना अटक
भ्रष्टाचाराच्या प्रकरणात मागील 2 वर्षापासून गाजत असलेल्या वैद्यनाथ बँकेचे चेअरमन अशोक जैन यांना तब्बल दहा लाख रुपयांची लाच घेताना लाच लुचपत विभागाने रंगेहाथ पकडले आहे. या घटनेमुळे बीड जिल्ह्यासह राज्यात एकच खळबळ उडाली आहे. ही कारवाई आज अशोक जैन यांच्या परळी येथील राहत्या घरी करण्यात आली. औरंगाबाद लाच लुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी सापळा रचून धाड टाकली तेव्हा हा संपूर्ण प्रकार उजेडात आला.
5 वर्षांपूर्वी -
मोदी सरकारच्या पॅकेजमुळे अर्थव्यवस्थेला फारसा उपयोग नाही | मूडीजची टिपणी
महिन्याभरापूर्वी जागतिक रेटिंग एजन्सी मूडीजनं तब्बल २२ वर्षांनंतर भारताच्या पतमानांकनात म्हणजेच रेटिंगमध्ये जून महिन्यात घट केली होती. भारताला यापुढं विविध संस्थाच्या माध्यमातून आर्थिक नीती प्रभावीपणे लागू करता येणार नाही शिवाय अनेक आव्हानांचा सामना करावा लागणार आहे. केंद्राने जाहीर केलेल्या २० लाख कोटींचे आर्थिक पॅकेजही पुरेसे नाही. त्यामुळे कमी वृद्धीचा धोका काही काळ राहणार आहे. म्हणूनच मूडीजनं बीएए २ वरून भारताची रेटिंग यापूर्वीच बीएए ३ केली होती.
5 वर्षांपूर्वी -
मोदी सरकारची जबरदस्त कामगिरी | भारतापेक्षा पाकिस्तान-अफगाणिस्तानची अर्थव्यवस्था स्थिर - राहुल गांधी
भारतातील घसरती अर्थव्यवस्था आणि सकल राष्ट्रीय उत्पादनात (GDP) झालेली मोठी घसरण या मुद्द्यांवरून आतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या (इंटरनॅशनल मॉनिटरी फंडाच्या-IMF) अहवालात चिंता व्यक्त करण्यात आली आहे. या अहवालात या वित्तीय वर्षात भारताच्या जीडीपी विकासात १० टक्क्यांची घसरण होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. या बरोबरच भारताचा विकासदर हा बांगलादेशच्या विकासदराहून कमी राहणार असल्याचेही नमूद करण्यात आले आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी या मुद्द्यावरून केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे.
5 वर्षांपूर्वी -
सेन्सेक्स कोसळला | गुंतवणूकदारांचे २.७ लाख कोटीचे नुकसान
अमेरिकेत दुसरे पॅकेज देण्याची शक्यता मावळली आहे. भारताने जाहीर केलेले दुसरे पॅकेज अपेक्षा अपेक्षाभंग करणारे आहे. त्याचबरोबर विविध देशात करोनाचा संसर्ग वाढल्यामुळे लॉकडाऊन सुरू झाल्याने जागतिक शेअर बाजाराबरोबरच भारतीय शेअर बाजाराचे निर्देशांक गुरुवारी कोसळले.
5 वर्षांपूर्वी -
TRP Scam कोट्यवधींचा | पण हा घोटाळा दाबला जातं होता
केंद्रीय माहिती आणि प्रसारण खाते मंत्र्यांचे वृत्तवाहिन्यांच्या टीआरपी घोटाळ्याकडे लक्ष हवे होते. परंतु, कोट्यवधींच्या हा घोटाळा दाबण्याची केंद्र सरकार भूमिका घेत होते, असा आरोप प्रदेश कॉंग्रेसचे प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांना केला आहे.
5 वर्षांपूर्वी -
मोदींच्या नव्या भारतातील GDP'ला बांग्लादेशचा GDP सुद्धा पिछाडीवर टाकणार
भारताचा शेजारी असणारा बांग्लादेश लवकरच भारताला ‘सकल राष्ट्रीय उत्पादनाच्या’ (ग्रॉस डोमेस्टिक प्रॉडक्ट अर्थात जीडीपी) बाबतीत पिछाडीवर टाकणार आहे. २०२० च्या आर्थिक वर्षात करोनामुळे भारतीय अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसला आहे. मात्र आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या (आयएमएफ) आकडेवारीनुसार बांग्लादेशच्या जीडीपीमध्ये चार टक्क्यांनी वाढ होण्याची शक्यता आहे. सन २०२० मध्ये बांग्लादेशचा जीडीपी १.८८८ डॉलरपर्यंत जाण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे करोनामुळे आर्थिक फटका बसलेल्या भारताचा जीडीपी उणे १०.५ टक्क्यांपर्यंत घसरणार असून ते १.८७७ डॉलरपर्यंत घसरणार असल्याचे सांगितले जात आहे.
5 वर्षांपूर्वी -
SBI ची ऑनलाइन बँकिंग सेवा ठप्प | पाहा काय झालंय नेमकं
भारतीय स्टेट बँक (SBI)च्या ऑनलाइन बँकिंग सेवा अचानक ठप्प झाली आहे. बँकेने एका ट्वीटद्वारे ही माहिती दिली आहे. मात्र, असं असलं तरीही एटीएम आणि पीओएस मशीनवर काहीही परिणाम झालेला नाही. देशातील सर्वात मोठ्या बँकेने याबाबत ट्विटरवरुन माहिती देताना सांगितलं की, ‘कनेक्टिव्हिटीमुळे आज आमच्या मुख्य ग्राहकांना (13.10.20) मुख्य बँकिंग प्रणाली उपलब्ध होण्यास विलंब झाला आहे. एटीएम आणि पीओएस मशीन वगळता सर्व चॅनेल प्रभावित आहेत.’
5 वर्षांपूर्वी -
Fake TRP | प्रक्षोभक वृत्त आणि खोटी माहिती देणाऱ्यांना जाहिराती नाही - Parle G
विखारी प्रचार करणाऱ्या, आक्रमकपणे खोटी माहिती देणाऱ्या, समाजात तेढ निर्माण होईल असा कंटेट देणाऱ्या चॅनेल्सवर जाहिरात देणार नाही, असा मोठा निर्णय मुंबईची प्रसिद्ध बिस्किट कंपनी पारले जी ने घेतला आहे. यामुळे आता सोशल मीडियावर Parle G ची मोठ्या प्रमाणावर चर्चा सुरू आहे. Twitter करांनी तर पारले जी ला Genious किताब देऊन टाकला आहे.
5 वर्षांपूर्वी -
प्रॉपर्टी कार्ड | पंतप्रधान मोदींनी केली महत्वाकांक्षी स्वामित्व योजनेची सुरुवात
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे स्वामित्व योजनेची सुरूवात केली. या महत्वाकांक्षी योजनेची सुरुवात केल्यानंतर सुमारे १ लाख लोकांना प्रॉपर्टी कार्ड वितरीत केले जातील. हे कार्ड मोबाइल फोन आणि एसएमएसद्वारे पाठवण्यात आलेल्या लिंकने डाउनलोड केले जाऊ शकेल.
5 वर्षांपूर्वी -
देशात विद्वेष पसरविणाऱ्या तीन वाहिन्यांना जाहिराती देणार नाही | उद्योगपती राजीव बजाज
समाजामध्ये विद्वेष पसरविणाºया व विषारी वातावरण निर्माण करणाºया तीन वृत्तवाहिन्यांना जाहिराती न देण्याचे बजाज ऑटो कंपनीने ठरविले असून, त्यांना काळ्या यादीत टाकले आहे. ही माहिती कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक राजीव बजाज यांनी दिली आहे. मात्र, त्यांनी या तीन वाहिन्यांची नावे उघड केलेली नाहीत.
5 वर्षांपूर्वी -
RBI आणि World Bank'चा अंदाज जवळपास सारखा | भारताचा GDP ९.५ टक्क्यांनी घसरणार
आर्थिक वर्ष २०२१ मध्ये जीडीपीमध्ये ९.५ टक्क्यांची घसरण होण्याची शक्यता, रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी वर्तवली आहे. रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण निर्धारण समितीची (एमपीसी) तीन दिवसीय बैठक पार पडली. त्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी याबाबत माहिती दिली. दरम्यान, रेपो दरात कोणतेही बदल करण्यात आले नसून ते ४ टक्क्यांवर कायम ठेवण्यात आल्याचेही दास म्हणाले. तसंच आगामी काळातही महागाई दर अपेक्षेपेक्षा अधिक राहणार असून करोना महासाथीच्या संकटामुळे मागणीदेखील कमीच राहण्याची भीती रिझर्व्ह बँकेनं व्यक्त केली आहे. यापूर्वी रिझर्व्ह बँकेची बैठक २८ सप्टेंबर रोजी पार पडणार होती. परंतु गणसंख्येअभावी ही बैठक पुढे ढकलण्यात आली होती.
5 वर्षांपूर्वी -
2021 पर्यंत 15 कोटी लोकांवर अत्यंत गरिबीची परिस्थिती ओढावणार - जागतिक बँक
कोरोनाचा प्रादुर्भाव सतत वाढत असल्याने एप्रिल महिन्यात WHO ने जगात जागतिक महामारी जाहीर केली. या महामारीमुळे अनेकांचे व्यवसाय ठप्प झाले. कामकाजावर त्याचा परिणाम दिसून आला. आर्थिकदृष्ट्या प्रबळ असणाऱ्या व्यवसायांवरसुद्धा या महामारीचा परिणाम दिसून आला. मार्च महिन्यापासून जगाची आर्थिक गाडी ढासळली आहे. त्याचमुळे हातावर पोट असणाऱ्या मजूर वर्गावर उपासमारीची वेळ आली आहे.
5 वर्षांपूर्वी -
व्हेनेझुएला चलनाचे अवमूल्यन | भाजीपाल्यासाठी बाजारात जाताना बॅगेतून नोटा
खनिज तेलाचा सर्वात मोठ्या उत्पादक देशांपैकी एक असलेल्या व्हेनेझुएला देशाचे दिवस फिरले आहेत. मागील काही वर्षांपासून व्हेनेझुएलाची आर्थिक परिस्थिती बिकट होत चालली आहे. बाजारात येताना नागरिकांना बॅगा भरून नोटा आणाव्या लागत असल्याचे चित्र आहे. चलनाचे अवमूल्यन झाल्यामुळे आता सरकारकडून मोठ्या मुल्याच्या नोटा छापण्यात येणार आहेत. सरकार आता एक लाखाची नोट छापण्याची तयारी करत आहे.
5 वर्षांपूर्वी -
अजित पवारांना मोठा दिलासा | राज्य सहकारी बँक घोटाळ्याप्रकरणी क्लीन चीट
महाराष्ट्र राज्य सहकारी बॅंक कथित घोटाळ्याप्रकरणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मोठा दिलासा मिळाला आहे. या प्रकरणी अजित पवार यांच्यासह 69 जणांना क्लीन चीट मिळली आहे. मुंबई पोलिसांकडून सत्र न्यायालयात आज क्लोजर रिपोर्ट दाखल करण्यात आला.
5 वर्षांपूर्वी -
आत्मनिर्भर भारतातून मोदी सरकारला नक्की काय म्हणायचं तेच स्पष्ट नाही - रघुराम राजन
काही महिन्यांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘आत्मनिर्भर भारत’ची घोषणा केली होती. दरम्यान, आत्मनिर्भर भारतवर रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित करत इशाराही दिला आहे. आर्थिक संशोधन संस्था इक्रियरच्या ऑनलाइन कार्यक्रमाला संबोधित करताना राजन यांनी यावर भाष्य केलं.
5 वर्षांपूर्वी -
कोरोना लस | मुकेश अंबानींची रिलायन्स लाईफ सायन्सेसही शर्यतीत
रिलायन्स लाईफ सायन्सला मिळालेल्या मान्यतेनंतर याच महिन्यापासून जनावरांवर या लसीची चाचणी केली जाणार आहे. कपंनीनं लस विकसित करण्यासाठी एक व्यापक योजनादेखील तयार केली आहे. यामध्ये टेस्ट किट तयार करण्यापासून, चाचणी केंद्र चालवणं, लस विकसित करणं आणि त्याचं वितरण यांचा समावेश आहे. रिलायन्स कोविड १९ साठी जी लस तयार करत आहे ती रिकंबिनेंट प्रोटिन बेस्ड लस आहे. पुढील वर्षाच्या पहिल्या तिमाहीपर्यंत या लसीची मानवी चाचणी सुरू केली जाऊ शकते, अशी शक्यताही वर्तवण्यात येत आहे. टाईम्स ऑफ इंडियानं यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.
5 वर्षांपूर्वी -
ट्रॅक्टरच्या गाद्याच सोडा, ८००० कोटीच्या विमानातील ५० पलंगांवर सुद्धा बोला | सणसणीत टोला
काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि खासदार राहुल गांधी सध्या कृषी कायद्याविरोधात पंजाबमध्ये सुरू असलेल्या आंदोलनात सहभागी झालेत. यावेळी, ट्रॅक्टरवर एका कुशन लावलेल्या खुर्चीवर ते बसलेले काही फोटो समोर आले होते. केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी यावर बोट ठेवत सोमवारी राहुल गांधी यांना ‘व्हीआयपी शेतकरी’ म्हणत टीकाही केली होती. यालाच आज पत्रकार परिषदेत राहुल गांधी यांनी जोरदार प्रत्यूत्तर दिलंय. ‘गाद्यांची गोष्ट करणारे ८००० कोटी रुपयांच्या विमानात गप्प का आहेत? त्या विमानात गाद्याच नाहीत तर ५० पलंग आहेत’ असं म्हणत राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान मोदींवर निशाणा साधलाय.
5 वर्षांपूर्वी