महत्वाच्या बातम्या
-
देशातील १२ टक्के स्टार्टअप बंद, तर ७०% स्टार्टअपची आर्थिकस्थिती बिकट
टप्प्याटप्प्याने लॉकडाऊन मागे घेणं ही भारतीय कंपन्यांसाठी डोकेदुखी ठरत आहे, असं वरिष्ठ अधिकाऱ्यांचं मत आहे. यापूर्वी काही कंपन्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, लॉकडाऊन हळूहळू मागे घेतल्यामुळे कंपन्यांसमोर नवी आव्हाने उभी राहणार आहेत. दुसरीकडे, भारतीय उद्योगपती आणि आयटी व्यावसायिकांचे केंद्र असलेल्या सिलिकॉन व्हॅलीने कोरोना विषाणूच्या फैलावानंतर उद्भवलेल्या स्थितीला सामोरे जाण्याची तयारी एप्रिल पासूनच सुरु केली होती. यामध्ये कर्मचारी कपात, वेतनात कपात आणि नव्या कर्मचारी भरतीस स्थगितीचा समावेश होता. आघाडीचे गुंतवणूकदार रंगास्वामी यांनी पीटीआय’सोबत बोलताना याबाबत माहिती दिली होती.
5 वर्षांपूर्वी -
आठवड्याभरात भाज्यांच्या दरात मोठी वाढ, सामान्यांना आर्थिक फटका
मुंबईत गेल्या काही दिवसांपासून जोरदार पाऊस बरसत आहे. या पार्श्वभूमीवर हवामान विभागाने सोमवारीही (6 जुलै) मुंबई आणि कोकणात पावसाचा इशारा दिला आहे. IMD, GFS व WRF मॉडेल मार्गदर्शनानुसार 6 जुलैसाठी मुंबई, कोकणात मुसळधार पाऊस होईल असा इशारा दिला आहे. दरम्यान याचा शेतीव्यवसायावर देखील परिणाम होतो आहे.
5 वर्षांपूर्वी -
इन्कम टॅक्स रिटर्न भरण्यास मुदतवाढ...जाणून घ्या तारीख
आयकर परतावे (ITR) भरण्यास मुदत वाढ देण्यात आली आहे. गेल्या आर्थिक वर्षाचा परतवा भरता येणार असल्याने नोकरदार वर्गाला मोठा दिलासा मिळाला आहे. अनेक खासगी कंपन्यांचे फॉर्म १६ अजूनही तयार नसल्याने परताव्याच्या प्रक्रियेला सुरुवात झालेली नाही. त्यामुळे आयकर विभागाने आधीची ३१ ऑक्टोबरची मुदत ३० नोव्हेंबरपर्यंत वाढवली आहे.
5 वर्षांपूर्वी -
मोदी सरकारकडून रेल्वेत खासगीकरण, खासगी कंपन्यांकडून अर्ज मागवले
भारतीय रेल्वेने बुधवारी एक महत्त्वपूर्ण घोषणा केली. १०९ मार्गांवर खासगी सेवा सुरु करण्याची तयारी रेल्वेने केली आहे. या ठराविक मार्गांवर दोन्ही बाजूंनी धावणाऱ्या आधुनिक १५१ रेल्वेगाड्या खासगी तत्त्वावर चालवण्याची रेल्वेची योजना आहे. त्यासाठी खासगी क्षेत्रातील कंपन्यांकडून अर्ज मागवण्यात आले आहेत.
5 वर्षांपूर्वी -
ठाकरे सरकार आर्थिक संकटात, कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी कर्ज काढावं लागेल
कोरोनामुळे राज्याची आर्थिक घडी विस्कळीत झाली आहे. याचा थेट परिणाम महसूलावर झाला असून सरकारी तिजोरीत खडखडाट आहे. परिणामी सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार द्यायचे कसे, असा प्रश्न सरकारला पडला आहे. यामुळे खासगी कर्मचाऱ्यांप्रमाणेच सरकारी कर्मचाऱ्यांचेही पगार लटकण्याची शक्यता आहे. ही परिस्थिती अशीच राहीली तर सरकारला कर्ज काढून पगार वाटप करावे लागेल, अशी चिंता मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केली आहे.
5 वर्षांपूर्वी -
संताप जनक वक्तव्य, पेट्रोल-डिझेलचे दर वाढले तरी सामान्यांवर काही प्रभाव पडत नाही - पेट्रोलियममंत्री
सध्या दोन्ही इंधनाचे दर प्रचंड वाढले आहेत. डिझेल 13 पैशांनी महागले असून, पेट्रोलची किंमतही 5 पैशांनी वाढली आहे. या महिन्यात सलग 21 दिवस इंधनाच्या दरात वाढ झाल्यानंतर सरकारी तेल कंपन्यांनी रविवारी दरवाढ केली नव्हती. पण आज सोमवारी पुन्हा दरवाढ करण्यात आली आहे. कालच्या 80.38 रुपयांच्या तुलनेत दिल्लीत पेट्रोलचे दर 5 पैशांनी वाढून 80.43 रुपये झाले आहेत. डिझेलही 13 पैशांनी वाढून त्याचा भाव 80.53 रुपयांवर पोहोचला आहे. काल दिल्लीत डिझेलची किंमत 80.40 रुपये होती. गेल्या काही दिवसांपासून दिल्ली हे देशातील पहिले राज्य बनले आहे, जेथे पेट्रोलपेक्षा डिझेल महाग आहे.
5 वर्षांपूर्वी -
भारतीय औषध कंपन्यांनी चीनमधून आयात केलेला माल बंदरात अडकला
गलवान खोऱ्यातील संघर्षानंतर चिनी सामानावर बहिष्कार घालण्याची, चीनमधून आयात बंद करण्याची मागणी होत आहे. पण सध्या याचा भारतीय औषध कंपन्यांना फटका बसत आहे. भारतीय औषध कंपन्यांनी चीनमधून आयात केलेला माल बंदरात अडकून पडला आहे. त्यामुळे औषध उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे चिनी कंपन्यांकडून आयातीला मंजुरी देण्यासाठी औषध कंपन्यांनी वरिष्ठ सरकारी कार्यलय आणि पंतप्रधान कार्यालयाला विनंती केली आहे. सीएनबीसी टीव्ही १८ ने याबाबत वृत्त दिले.
5 वर्षांपूर्वी -
मोटार सायकल ते शेतीचा ट्रॅक्टर, पेट्रोल-डिझेल दराने सर्वच हैराण...केंद्राविरोधात संताप
लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर सलग २१ दिवस झालेल्या इंधन दरवाढीला रविवारी ब्रेक लागला. मात्र आज सोमवार उजाडताच हे दरवाढीचे सत्र पुन्हा सुरू झाले आहे. आज मुंबई आणि दिल्लीसह देशाच्या अनेक भागांमध्ये पेट्रोल-डिझेल महागले आहे. मुंबईत पेट्रोलच्या दरात ५ पैशांची, तर डिझेलच्या दरात १२ पैशांची वाढ झाली आहे. त्यामुळे मुंबईकरांना आता प्रतिलिटर पेट्रोलमागे ८७.१७ रुपये, तर प्रतिलिटर डिझेलमागे ७८.८१ रुपये मोजावे लागणार आहेत. सलग या इंधन दरवाढीने सर्वसामान्य जनतेचे कंबरडे मोडले आहे.
5 वर्षांपूर्वी -
चिनी कंपन्यांकडून पीएम केअरला तब्बल ४९ कोटीचा निधी - सविस्तर वृत्त
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २८ मार्च रोजी पीएम केअर्स फंडची घोषणा केली होती व पंतप्रधानांच्या आवाहनाचा आदर करत देशवासीयांनी या फंडासाठी देणग्या दिल्या आहेत. २९ मे रोजी पंतप्रधान कार्यालयाने आरटीआय कार्यकर्ते तेजा यांना उत्तर देत पीएम केअर्स फंड सार्वजनिक अधिकारात येत नसल्याचे कळवले होते. त्या पत्रव्यवहाराच्या आधारावर वकील सुरेंदर सिंह हुडा यांनी दिल्ली उच्च न्यायालयात याचिका केली होती.
5 वर्षांपूर्वी -
आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी काँग्रेस नेते अहमद पटेल यांच्या घरावर ईडीचा छापा
संदेसरा समूहाच्या ५००० कोटींच्या आर्थिक गैरव्यवहारप्रकरणात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल यांची चौकशी करण्यासाठी शनिवारी सक्तवसुली संचलनालयाचे (ईडी) पथक अचानक त्यांच्या घरी धडकले. प्राथमिक माहितीनुसार, आज सकाळी ‘ईडी’च्या तीन अधिकाऱ्यांचे पथक अहमद पटेल यांच्या दिल्लीतील मदर तेरेसा क्रिसेंट निवासस्थानी दाखल झाले. सध्या ‘ईडी’च्या पथकाकडून त्यांचा जबाब नोंदवून घेतला जात आहे.
5 वर्षांपूर्वी -
चिंता वाढली! भारताचा GDP दोन वर्ष केवळ एक टक्क्यांनी वाढणार – IMF
कोरोना आपत्तीमुळे भारतीय अर्थव्यवस्थेवर गंभीर परिणाम होणार याचे संकेत अनेक जागतिक संघटनांनी दिले होते. त्याला आंतरराष्ट्रीय नाणे निधीकडून दुजोरा मिळत असल्याचं दिसत आहे. त्यानुसार भारताचा जीडीपी दोन वर्ष फक्त एक टक्क्यांनी वाढणार असं वक्तव्य आंतरराष्ट्रीय नाणे निधीच्या मुख्य अर्थतज्ज्ञ गीता गोपीनाथ यांनी केलं आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.
5 वर्षांपूर्वी -
जेव्हा दिग्गज करोडपती कलाकारांना पेट्रोलचे भाव परवडत नव्हते...ते PR मॅनेजमेंट
देशात पेट्रोल आणि डिझेलचे दर दररोज वाढत असल्याने सर्वसामान्य नागरिकांच्या खिशाला चांगलीच कात्री बसत आहे. देशात आज सलग विसाव्या दिवशी इंधन दरवाढ झाली आहे. आज डिझले 17 पैशांनी, तर पेट्रोल 21 पैशांनी महागले आहे. त्यामुळे राजधानी दिल्लीत पेट्रोलचे दर प्रति लिटर ८०.१३ रुपये झाले असून डिझेलचे दर प्रति लिटर ८०.१९ रुपये झाले आहेत.
5 वर्षांपूर्वी -
देशात सलग २०व्या दिवशी इंधन दरवाढ, सरकारचं दुर्लक्ष अन सामान्य राम भरोसे
देशात पेट्रोल आणि डिझेलचे दर दररोज वाढत असल्याने सर्वसामान्य नागरिकांच्या खिशाला चांगलीच कात्री बसत आहे. देशात आज सलग विसाव्या दिवशी इंधन दरवाढ झाली आहे. आज डिझले 17 पैशांनी, तर पेट्रोल 21 पैशांनी महागले आहे. त्यामुळे राजधानी दिल्लीत पेट्रोलचे दर प्रति लिटर ८०.१३ रुपये झाले असून डिझेलचे दर प्रति लिटर ८०.१९ रुपये झाले आहेत.
5 वर्षांपूर्वी -
वर्णभेद आंदोलनानंतर खबरदारी, Fair & Lovely क्रिमचं नाव बदलण्याचा निर्णय
वर्णभेदावरून अमेरिकेत प्रचंड तणाव निर्माण झाला आहे. यामुळे युनिलिव्हर कंपनीने त्यांच्या फेअर अण्ड लव्हली या क्रिमचं नाव बदलण्याचं ठरवलं आहे. या क्रिमच्या माध्यमातून भारतातून युनिलिव्हर कंपनी जवळपास ५० कोटी डॉलर कमावते. जगभरात वर्णभेद निर्माण झाल्यामुळे वर्णद्वेष संपुष्टात येण्याकरता चेहरा उजळ करणाऱ्या क्रीमच्या जाहिरातींवरही अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात होते. त्यामुळे नाव बदलण्याचा निर्णय घेतला गेल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
5 वर्षांपूर्वी -
अक्षय तू कार वापरणं बंद केलं आहेस का? वर्तमानपत्र वाचत नाहीस का? - जितेंद्र आव्हाड
लॉकडाऊन शिथिल झाल्यापासून आज सलग १९व्या दिवशी पेट्रोल-डिझेल महागले आहे. दररोज होणाऱ्या या इंधन दरवाढीमुळे ग्राहकांचे कंबरडे मोडून निघाले आहे. आज दिल्लीत पेट्रोलच्या दरात १६ पैशांची तर डिझेलच्या दरात १४ पैशांची वाढ करण्यात आली. या दरवाढीनंतर दिल्लीत पेट्रोलचे दर ७९.९२ रुपये प्रति लिटर तर डिझेलचे दर ८०.०२ रुपये प्रति लिटर इतके झाले आहेत. यासह राजधानीत डिझेलच्या दराने पहिल्यांदाच ८० रुपयांचा टप्पा पार केला आहे.
5 वर्षांपूर्वी -
पेट्रोल-डिझेलचे भाव गगनाला भिडले, मोदी सरकारचे मंत्री शांत
लॉकडाऊन शिथिल झाल्यापासून आज सलग १९व्या दिवशी पेट्रोल-डिझेल महागले आहे. दररोज होणाऱ्या या इंधन दरवाढीमुळे ग्राहकांचे कंबरडे मोडून निघाले आहे. आज दिल्लीत पेट्रोलच्या दरात १६ पैशांची तर डिझेलच्या दरात १४ पैशांची वाढ करण्यात आली. या दरवाढीनंतर दिल्लीत पेट्रोलचे दर ७९.९२ रुपये प्रति लिटर तर डिझेलचे दर ८०.०२ रुपये प्रति लिटर इतके झाले आहेत. यासह राजधानीत डिझेलच्या दराने पहिल्यांदाच ८० रुपयांचा टप्पा पार केला आहे.
5 वर्षांपूर्वी -
१५४० सहकारी बँका रिझर्व्ह बँकेच्या नियंत्रणाखाली, ग्राहकांच्या ठेवी सुरक्षित होणार
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत झालेल्या बुधवारच्या कॅबिनेट बैठकीत केंद्र सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. को-ऑपरेटिव्ह बँकांबाबत सरकार अध्यादेश आणणार आहे. त्यामुळे १४८२ अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक आणि ५८ मल्टी स्टेट को-ऑपरेटिव्ह बँक आता रिझर्व्ह बँकेच्या अख्यारित येणार आहेत.
5 वर्षांपूर्वी -
चीनबरोबर संबंध सुधारत असल्याने चीन कंपन्यांबरोबरच्या करारांना अडथळा नाही
चिनी कंपन्यांसोबत करण्यात आलेले करार रद्द करण्यात आलेले नाहीत अशी माहिती उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी दिली होती. हे करार तूर्तास जैसे थे ठेवण्यात आले आहेत, याचा अर्थ ते रद्द केले असा नसून त्यावरील पुढील कार्यवाही प्रतीक्षाधीन आहे असं सुभाष देसाई यांनी स्पष्ट केलं होतं. हेंगली, पीएमआय इलेक्ट्रो मोबिलिटी सोल्युशन्स जेव्ही विथ फोटोन आणि ग्रेट वॉल मोटर्स या चीन येथील तीन कंपन्यांसोबत महाराष्ट्र शासनाने १५ जून रोजी केलेले सामंजस्य करार तूर्तास जैसे थे ठेवण्यात आले आहेत अशी माहिती सुभाष देसाई यांनी दिली होती.
5 वर्षांपूर्वी -
२०१४'मध्ये ही होर्डिंग्स पाहिली असतील पेट्रोल पंपा वरती, आव्हाडांकडून आठवण
लॉकडाऊन शिथिल झाल्यापासून दररोज होणाऱ्या इंधन दरवाढीमुळे सर्वसामान्यांच्या खिशाला झळ बसत आहे. पेट्रोलियम कंपन्यांनी आज डिझेलच्या किंमती वाढवल्या असून पेट्रोलचे दर मात्र स्थिर आहेत. आज डिझेलचे दर ४० ते ५० पैशांनी महागल्याने मुंबईत डिझेल प्रतिलिटर ७८.२२ रुपये झाले आहे. तर पेट्रोलचा भाव ८६.५४ रुपयांवर स्थिर आहे. तसेच ४८ पैशांच्या दरवाढीने राजधानी दिल्लीत डिझेलचा भाव ७९.८८ रुपये झाला आहे. तर पेट्रोलचा भाव ७९.७६ रुपयांवर कायम आहे. सलग १८व्या दिवशी झालेल्या या इंधन दरवाढीमुळे ग्राहकांचे कंबरडे मोडून निघाले आहे.
5 वर्षांपूर्वी -
चीन अभ्यास करून मैदानात, आता भारताविरुद्ध औषधांच्या बाजापेठेसंबंधित अस्त्राचा वापर
गलवान खोऱ्यात भारत आणि चिनी सैन्यामध्ये सुरु असलेल्या संघर्षाचे पडसाद संपूर्ण देशभरात पहायला मिळत आहेत. २० भारतीय जवानांना या संघर्षात हौतात्म्य पत्करावं लागलं. यानंतर संपूर्ण देशभरात चिनी मालावर बहिष्कार घालण्याची मागणी सुरु झाली. अनेक शहरातील बाजारपेठांमध्ये दुकानदारांनी चिनी माल न विकण्याचा निर्णय घेतला.
5 वर्षांपूर्वी