महत्वाच्या बातम्या
-
आत्मनिर्भर भारत! देशातील ६ विमानतळांचा लिलाव होणार - अर्थमंत्री
देशातील कोळसा उत्पादन वाढीवर भर दिला जाणार असं निर्मला सीतारामन यांनी स्पष्ट केलं. या कोळसा उत्पादन क्षेत्राच्या सुधारणेसाठी ५० हजार कोटींचं पॅकेज देण्याची घोषणा अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केली आहे. कोळश्याच्या व्यावसायिक उत्पादनावर भर दिला जाणार असंही निर्मला सीतारामन यांनी सांगितलं. कोळशाद्वारे गॅसनिर्मितीला प्राधान्य दिलं जाणार असंही त्यांनी स्पष्ट केलं. कोळसा क्षेत्रातील सरकारचे एकाधिकार कमी केले जाणार असंही त्यांनी सांगितलं. कोळसा उत्पादनासाठी खासगी कंपन्यांना संधी दिली जाईल असंही स्पष्ट करण्यात आलं आहे.
5 वर्षांपूर्वी -
‘लावा’ मोबाईल कंपनी चीनमधून भारतात येणार; ८०० कोटींची गुंतवणूक करणार
मोबाईलचं उत्पादन करणारी ‘लावा’ या कंपनीनं आपला चीनमधील व्यवसाय गुंडाळण्याचा निर्णय घेतला आहे. लावा इंटरनॅशनलकडून शुक्रवारी यासंदर्भातील माहिती देण्यात आली. भारतात करण्यात आलेल्या धोरणात्मक बदलांनंतर कंपनीनं आपला व्यवसाय भारतात आणण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीनं मोबाईल फोन डेव्हलपमेंट आणि उत्पादन वाढीसाठी पुढील पाच वर्षात भारतात ८०० कोटी रूपयांची गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला आहे.
5 वर्षांपूर्वी -
खरं वादळ अजून बाकी, ते आल्यावर मोठा आर्थिक फटका बसणार - राहुल गांधी
वादळ अजून आलेलं नाही, ते येत आहे. पण ते आल्यावर मोठा आर्थिक फटका बसणार असून अनेकांना तो सहन करावा लागणार असल्याचा इशारा काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी दिला आहे. यावेळी त्यांनी केंद्र सरकारला जाहीर करण्यात आलेल्या २० लाख कोटींच्या पॅकेजवर पुनर्विचार करावा असा सल्लाही दिला आहे. शेतकरी, मजुरांच्या खिशात पैसे द्या या मागणीचा यावेळी त्यांनी पुनरुच्चार केला. राहुल गांधी यांनी स्थानिक प्रसारमाध्यमांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संवाद साधला.
5 वर्षांपूर्वी -
झूम एपवरुन कर्मचाऱ्यांशी संवाद साधत उबरने ३५०० कर्मचाऱ्यांना बेरोजगार केलं
कोरोना व्हायरस आणि लॉकडाऊनचा अनेक कंपन्यांवर फरक पडत आहे. नुकतीच अमेरिका आणि जगातील सर्वात मोठी जिम कंपनी Gold Gym ने या काळात आपलं दिवाळ निघाल्याच घोषित केलं आहे. यानंतर जगातील सर्वात मोठी कॅब सर्व्हिस कंपनी उबर’वर देखील संकट कोसळलं आहे. कंपनीने जाहिर केलं होतं की, आर्थिक संकटामुळे अनेक कर्मचाऱ्यांना कामावरून काढावं लागेल.
5 वर्षांपूर्वी -
शेतीच्या पायाभूत सुविधांसाठी १ लाख कोटींचं पॅकेज - अर्थमंत्री निर्मला सीतारामन
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेल्या विषयी माहिती देण्याकरता आज तिसऱ्या दिवशी अर्थमंत्री निर्मला सीतारामन पत्रकार परिषद घेत आहेत. यावेळी अर्थ राज्यमंत्री अनुराग सिंह ठाकुर देखील उपस्थित आहेत. या पॅकेजअंतर्गत शेती आणि शेतीशी निगडीत इतर उद्योगधंद्याना काय दिलासा मिळणार आहे, यासंदर्भात आज घोषणा केल्या जात आहेत.
5 वर्षांपूर्वी -
आर्थिक प्रोत्साहनपर पॅकेज शेअर बाजारावर परिणाम करण्यात अपयशी
मागणीच्या बाबतीत चिंता कायम असल्याने सरकारने जाहीर केलेले २० लाख कोटी रुपयांच्या आर्थिक प्रोत्साहनपर पॅकेज शेअर बाजारावर परिणाम करण्यात अपयशी ठरल्याचे एंजल ब्रोकिंग लिमिटेडचे प्रमुख सल्लागार श्री अमर देव सिंह यांनी सांगितले. परिणामी एस अँड पी बीएसई सेन्सेक्स आणि निफ्टी ५० निर्देशांकात शेवटच्या ट्रेडिंग सेशनमध्ये २ टक्क्यांची घसरण झाली. दिवस पुढे जाऊ लागला, तशी घसरण वाढत गेली. ३० शेअर सेन्सेक्सचा निर्देशांक ८८५.७२ अंक किंवा २.७७% नी घसरला. तो ३१,१२२.८९ अंकांवर बंद झाला. निफ्टी ५० चा निर्देशांक २४०.८० अंक किंवा २.५७% नी कमी झाला. तो ९,१४२.७५ अंकांवर बंद झाला.
5 वर्षांपूर्वी -
कोरोना संकटात भारताला जागतिक बँकेकडून एक बिलियन डॉलरची मदत
कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर जागतिक बँकेने भारताला मोठा दिलासा दिला आहे. जागतिक बँकेने भारताला एक बिलियन डॉलरचं पॅकेज जाहीर केले आहे. हे सामाजिक संरक्षण पॅकेज आहे. यापूर्वी कोरोनाशी युद्धासाठी ब्रिक्स देशांच्या न्यू डेव्हलपमेंट बँकेने आपत्कालीन मदत म्हणून एक अरब डॉलरची मदत जाहीर केली होती.
5 वर्षांपूर्वी -
मजुर आणि शेतकऱ्यांसाठी केंद्रीय अर्थमंत्र्यांच्या ९ मोठ्या घोषणा
देशातल्या प्रत्येक राज्यात वन-नेशन वन रेशन कार्ड योजना लागू होणार असल्याची घोषणा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केली. आज झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी यासंदर्भातली घोषणा केली. या योजनेचा फायदा ६७ कोटी लोकांना फायदा होईल असंही स्पष्ट करण्यात आलं आहे. ही योजना लागू झाल्यास राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्यानुसार कोणत्याही कार्ड धारकाला देशातल्या कोणत्याही रेशन दुकानातून रेशन घेण्याची मुभा असेल असंही स्पष्ट करण्यात आलं आहे.
5 वर्षांपूर्वी -
रेल्वेची ३० जूनपर्यंतची सर्व तिकिटे रद्द, तिकिटांचा पूर्ण परतावा मिळणार
भारतीय रेल्वे प्रशासनाने ३० जूनपर्यंत रेल्वेच्या तिकिटांचे बुकींग करणाऱ्या प्रवाशांची तिकिटे रद्द करण्याची घोषणा केली आहे. ३० जूनपर्यंतची सर्व तिकिटे ऑटोमॅटीकपद्धतीने रद्द होणार असून या तिकिटांचा पूर्ण परतावा प्रवाशांना मिळणार असल्याचे मंगळवारी रेल्वेने जाहीर केलं. रद्द करण्यात आलेल्या तिकिटांमध्ये मेल, एक्सप्रेस तसेच लोकल उपनगरीय रेल्वे तिकिटांचा समावेश आहे.
5 वर्षांपूर्वी -
इन्कम टॅक्स रिटर्न्स भरण्यासाठी ३० नोव्हेंबर पर्यंत मुदतवाढ - केंद्रीय अर्थमंत्री
इन्कम टॅक्स रिटर्न्स भरण्याची मुदत ३० नोव्हेंबर पर्यंत वाढवण्यात आल्याची माहिती निर्मला सीतारामन यांनी दिली आहे. अत्यंत महत्त्वाची अशी ही घोषणा आहे. करोनाचं संकट आणि लॉकडाउन यामुळे जी स्थिती निर्माण झाली आहे त्यातून दिलासा देण्यासाठी २० लाख कोटींचं पॅकेज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलं.
5 वर्षांपूर्वी -
तुमच्या EPF खात्यातील रक्कम ऑनलाईन कशी काढाल? पहा स्टेप बाय स्टेप प्रक्रिया
ईपीएफ (Employees’ Provident Fund) म्हणजे सामान्य नोकरदारांच्या जिव्हाळ्याचा विषय आणि तोच आता गरजेच्या वेळी काढण्यासाठी कंपनी एजन्ट किंवा कंपनी HR भरोसे राहण्याची गरज आहे. कारण. ऑनलाईन कम्प्लायन्सेस मालकाप्रमाणे नोकरदारासांठी सोपे झाले आहेत आणि सदर प्रक्रिया घरबसल्या ऑनलाईन पूर्ण करता येणार आहे. त्यामुळे अडीअडचणीच्या वेळी स्वतःच त्यासाठी ऑनलाईन अर्ज करू शकता अशी सोय करण्यात आली आहे.
5 वर्षांपूर्वी -
नोकरदारांना मोठा दिलासा; पुढील ३ महिन्यांचा EPF केंद्र सरकार भरणार
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणात देशाता आत्मनिर्भर करण्यास सांगितले. आज जगभरात स्वयंपूर्ण शब्दाचा अर्थ पूर्णपणे बदलला आहे, असेही सांगितले. यावेळी मोदींनी २० लाख कोटी रुपयांचं हे पॅकेजची घोषणा केली. त्यासह २०२० मध्ये देशाच्या विकास यात्रेला व स्वावलंबी भारताच्या संकल्पनेले नवीन गती मिळवून देईल. या पॅकेजमध्ये जमीन, कामगार, लिक्वडिटी (तरलता) आणि कायदा या सर्वांवर लक्ष दिले आहे. हे पॅकेज कृषी, एमएसएमई, लघु उद्योग यांच्यासाठी करण्यात आले आहे.
5 वर्षांपूर्वी -
MSME क्षेत्राला कोणत्याही गॅरंटीशिवाय ३ लाख कोटींचं कर्ज - निर्मला सीतारामन
स्क्षूम, लघु, मध्यम कुटीर उद्योगांसाठी तीन लाख कोटीचे कर्ज देण्यात येईल. त्यासाठी कुठल्याही गॅरटीची आवश्यकता नाही. ४५ लाख MSME उद्योगांना याचा फायदा होईल. एक वर्ष कर्जाचा हप्ता भरण्याची गरज नाही.
5 वर्षांपूर्वी -
पॅकेजबाबत अर्थमंत्री सीतारमण यांची आज ४ वाजता पत्रकार परिषद
सध्या देशात कोरोनाचं थैमान वाढत आहे. अशा परिस्थितीत मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोठ्या पॅकेजची घोषणा केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वावलंबी भारत अभियानाची घोषणा केली असून २० लाख कोटींच्या आर्थिक पॅकेजची घोषणा केली. “हे पॅकेज स्वावलंबी भारत अभियानाचा महत्त्वाचा भाग आहे. आतापर्यंत जाहीर करण्यात आलेली आर्थिक मदत आणि हे पॅकेज एकत्र मिळून २० लाख कोटींचं आहे.
5 वर्षांपूर्वी -
कोणाला काय मिळते, याची आम्ही काळजीपूर्वक तपासणी करू - पी चिदंबरम
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वावलंबी भारत अभियानाची घोषणा केली असून २० लाख कोटींच्या आर्थिक पॅकेजची घोषणा केली आहे. नरेंद्र मोदी यांनी देशातील जनतेशी आज संवाद साधला. यावेळी त्यांनी या पॅकेजची घोषणा केली. नरेंद्र मोदींनी सांगितलं की, “हे पॅकेज स्वावलंबी भारत अभियानाचा महत्त्वाचा भाग आहे. आतापर्यंत जाहीर करण्यात आलेली आर्थिक मदत आणि हे पॅकेज एकत्र मिळून २० लाख कोटींचं आहे.
5 वर्षांपूर्वी -
लॉकडाऊनची मदत झाली, पण तो दीर्घकाळ राहिल्यास अर्थव्यवस्थेला मोठा धोका
देशात गेल्या २४ तासांमध्ये ३६०४ नव्या रूग्णांची नोंद झाली आहे. देशातील एकूण करोनाग्रस्तांची संख्या ७० हजार ७५६ झाली आहे. लॉकडाउन असतानाही दिवसागणिक रुग्णांच्या संख्येत होणारी वाढ चिंताजनक आहे. आतापर्यंत करोनानं २२९३ जणांचा बळी घेतला आहे. या सर्वांमध्ये दिलासादाक बाब म्हणजे देशात अजूनही समूह संसर्ग झालेला नाही. देशात आतापर्यंत २२ हजार ४५४ जणांनी करोनावर यशस्वीरित्या मात केली आहे. त्यामुळे सध्या उपचार घेत असलेल्या करोनाग्रस्त रूग्णांची संख्या ४६ हजार ८ आहे.
5 वर्षांपूर्वी -
बहुसंख्य कंपन्या कर्मचाऱ्यांचे वेतन, बोनस कापण्याच्या तयारीत, केंद्राकडे या मागण्या
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाचा परिणाम देशाच्या अर्थचक्रावर होत असतानाच बहुसंख्या कंपन्यांनी कर्मचाऱ्यांचे वेतन आणि बोनस कापण्याचा निर्णय घेतला आहे. वर्षभर काम केल्यानंतर प्रत्येक नोकरदारवर्ग मे महिन्याच्या अखेरीपासून पगारवाढ आणि बोनसची वाट पाहत असतो. आपल्या कामाचं कौतुक हे या पगारवाढ आणि बोनसमधून कर्मचाऱ्यांना कंपनी देत असते. पण आता सगळ्या कंपन्यांची याकडे करडी नजर आहे. कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव पाहता कंपन्या पगारवाढ आणि बोनस कापण्याच्या तयारीत आहेत.
5 वर्षांपूर्वी -
Uber Cab कडून ३७०० कर्मचाऱ्यांना कामावरुन कमी करण्याची घोषणा
कोरोना व्हायरस आणि लॉकडाऊनचा अनेक कंपन्यांवर फरक पडत आहे. नुकतीच अमेरिका आणि जगातील सर्वात मोठी जिम कंपनी Gold Gym ने या काळात आपलं दिवाळ निघाल्याच घोषित केलं. यानंतर आता जगातील सर्वात मोठी कॅब सर्व्हिस कंपनी उबर (Uber)वर देखील संकट कोसळलं आहे. कंपनीने जाहिर केलं आहे की, आर्थिक संकटामुळे अनेक कर्मचाऱ्यांना कामावरून काढावं लागेल.
5 वर्षांपूर्वी -
खराब आर्थिक स्थितीतही पगाराबाबत अनेक कंपन्यांकडून गुड न्यूज...नक्की वाचा
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाचा परिणाम देशाच्या अर्थचक्रावर होत असतानाच बहुसंख्या कंपन्यांनी कर्मचाऱ्यांचे वेतन आणि बोनस कापण्याचा निर्णय घेतला आहे. अशा प्रतिकूल परिस्थितीतही एफएमसीजी आणि ग्राहकोपयोगी वस्तूंची निर्मिती करणाऱ्या काही कंपन्यांनी मात्र कर्मचाऱ्यांचे मनोबल उंचावण्यासाठी वेतनात आणि बोनसमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. ही वाढ गेल्या वर्षभरातील (मार्चपासून एप्रिलपर्यंत) असल्याचेही कंपन्यांनी स्पष्ट केले आहे.
5 वर्षांपूर्वी -
यूपीत १०० कोटी पेक्षा जास्त रक्कमेची दारू विक्री; दिल्लीत कोरोना फी लागू
सोमवारपासून अनेक राज्यांमध्ये दारूची दुकानं उघडल्यामुळे मद्यप्रेमींच्या दुकानाबाहेर लांबच लांब रांग लागल्याचं पाहायला मिळालं. अनेक ठिकाणी सोशल डिन्स्टसिंगचे तीनतेरा वाजलेले दिसले. दारूच्या दुकानाबाहेर सामाजिक अंतराचे नियम लोकांनी धाब्यावर बसवल्यानंतर अनेक राज्य सरकार सतर्क झाल्याचं पाहायला मिळत आहे. बंगळुरुमध्येही दुकानांबाहेर लागलेल्या रागांमध्ये सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे मोठया प्रमाणावर उल्लंघन झाले. अनेकांनी स्वत:हासाठी दुसऱ्यांना रांगेत उभे केले होते. दारूची दुकाने सुरु होताच पहिल्याच दिवशी अनेक राज्यांना बऱ्यापैकी महसूल मिळाला आहे.
5 वर्षांपूर्वी