महत्वाच्या बातम्या
-
राष्ट्रीय ग्रामीण रोजगार गॅरेंटी अंतर्गत केंद्र ११,४९९ कोटींचं वाटप करणार
करोनाला रोखण्यासाठी देशभरात लागू झालेल्या लॉक डाऊननंतर अर्थव्यवस्थेला सावरण्यासाठी केंद्र सरकारपाठोपाठ रिझर्व्ह बँकेने आज मोठी घोषणा केली. बाजारात रोकड उपलब्धता वाढवण्यासाठी एसएलआर दर ३ टक्के करण्यात आला आहे. यामुळे बँकांना १.७ लाख कोटींची अतिरिक्त रोकड उपलब्ध होणार आहे. याशिवाय आणखी दोन उपाययोजनांमुळे येत्या ३० जून पर्यंत बाजारात ३.७४ लाख कोटीची अतिरिक्त रोकड उपलब्ध होणार असल्याचे आरबीआयने म्हटल आहे. त्याशिवाय ३ महिने कर्जाचे हप्ते स्थगित करण्याच्या सूचना बँकांना देण्यात आल्याचे दास यांनी सांगितले.
5 वर्षांपूर्वी -
3 महिने कोणत्याही कर्जाचे हफ्ते भरायची चिंता करू नका: आरबीआय
कोरोना विषाणूमुळे देशात २१ दिवसांचा लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. याचा फटका देशातील सर्वच क्षेत्रांना बसला आहे. देशातील गरीब आणि कामगारवर्गासाठी केंद्र सरकारने गुरुवारी १ लाख ७० हजार कोटींची योजना जाहीर केली आहे. त्याच्या दुसऱ्याच दिवशी आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनीही पत्रकार परिषद घेऊन रेपो रेट आणि रिव्हर्स रेपो रेटमध्ये कपात करुन उद्योग क्षेत्र आणि सर्वसामान्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. कोरोना विषाणूमुळे आर्थिक क्षेत्रावर मोठा परिणाम होणार असून जीडीपीचे अपेक्षित उद्दिष्ठ गाठणे कठीण जाणार असल्याचे ते म्हणाले.
5 वर्षांपूर्वी -
CRR ३ टक्क्यांवर; बाजारात ३ लाख ७४ हजार कोटी रूपये खेळते होणार
कोरोना विषाणूमुळे देशात २१ दिवसांचा लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. याचा फटका देशातील सर्वच क्षेत्रांना बसला आहे. देशातील गरीब आणि कामगारवर्गासाठी केंद्र सरकारने गुरुवारी १ लाख ७० हजार कोटींची योजना जाहीर केली आहे. त्याच्या दुसऱ्याच दिवशी आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनीही पत्रकार परिषद घेऊन रेपो रेट आणि रिव्हर्स रेपो रेटमध्ये कपात करुन उद्योग क्षेत्र आणि सर्वसामान्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. कोरोना विषाणूमुळे आर्थिक क्षेत्रावर मोठा परिणाम होणार असून जीडीपीचे अपेक्षित उद्दिष्ठ गाठणे कठीण जाणार असल्याचे ते म्हणाले.
5 वर्षांपूर्वी -
जगाची अर्थव्यवस्था ढासळणार पण चीनची ३.३ टक्क्यांनी वाढणार; मूडीजचा अंदाज
कोरोना विषाणूचे संक्रमण वेगाने पसरु नये म्हणून देशभरात २१ दिवसाचा लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. पण या लॉकडाऊनचा आता देशाच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम होण्याची शक्यता आहे. लॉकडाऊनमुळे भारताच्या विकासदरात मोठी घसरण होण्याचा अंदाज बार्कलेजने आपल्या अहवालात नोंदवला आहे. तीन आठवड्याच्या लॉकडाऊनमुळे २०२० च्या कॅलेंडर वर्षात भारताचा जीडीपी विकासदर २.५ टक्क्यांपर्यंत घसरु शकतो असे म्हटले आहे. सुरुवातीला भारताने २०२० मध्ये ४.५ टक्के वाढीचा अंदाज वर्तवला होता.
5 वर्षांपूर्वी -
कागमार-गरीबांसाठी १ लाख ७० हजार कोटींचं पॅकेज; अर्थमंत्र्यांची घोषणा
देशव्यापी लॉकडाऊनचा आज दुसरा दिवस असून देशभरात करोनाची लागण झालेल्या रुग्णांची सख्या वाढत असल्याचे दिसत आहे. देशभरात आतापर्यंत ६०६ जणांना करोना विषाणूची लागण झाली आहे, तर या आजारात ११ जणांचा बळी गेला आहे. देशात सर्वाधिक रुग्ण संख्या महाराष्ट्रात १२२ इतकी आहे.
5 वर्षांपूर्वी -
आयटी रिटर्न भरण्यासाठी ३० जूनपर्यंत मुदत वाढ: अर्थमंत्री सीतारामन
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी कोरोना व्हायरसच्या वैश्विक संकटाच्या पार्श्वभूमीवर काही महत्त्वपूर्ण घोषणा केल्या आहेत. करदात्यांना त्यातून मोठा दिलासा देण्यात आला आहे. इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची मुदत अर्थमंत्र्यांनी वाढवली आहे. या महासाथीच्या संकटामुळे जगभरावर आर्थिक संकट ओढवलं आहे. भारतातही अनेक उद्योगांचं, व्यापाऱ्यांचं नुकसान होत आहे. त्यासाठी आर्थिक पॅकेज जाहीर करण्याची घोषणा निर्मला सीतारामन यांनी केली. अर्थराज्यमंत्री अनुराग ठाकूरही या वेळी उपस्थित होते.
5 वर्षांपूर्वी -
कोरोनाविरुद्ध लढ्यासाठी चीन-अमेरिकेने काय केलं? आणि मोदींनी 'टाळी व थाळी' - सविस्तर वृत्त
जगभरात कोरोनाने थैमान घातले आहे. चीनपेक्षाही इटलीमध्ये मृतांची संख्या वाढली आहे. जगभरात आतापर्यंत कोरोनाने ११ हजारांवर बळी घेतले आहेत. तर भारतात अद्याप चार जणांचा मृत्यू झाला आहे. भारतात कोरोना दुसऱ्या टप्प्यात आलेला आहे. मात्र, तिसऱ्या टप्प्यात पोहोचण्याची शक्यता असून आज कोरोना पॉझिटिव्ह सापडलेल्या रुग्णांची आकडेवारी मोठी असल्याने देशासमोर धोक्याची घंटा वाजत आहे.
5 वर्षांपूर्वी -
कोरोना आपत्तीमुळे पर्यटन उद्योगाला तब्बल ५ लाख कोटींचा फटका
कोरोना व्हायरसच्या प्रकोपाचा परिणाम इतर क्षेत्रांवरही दिसत आहे. १० जानेवारीच्या प्रसार माध्यमातील आकडेवारीनुसार भारतीय टूर ऑपरेटर्सला यामुळे ५० कोटी डॉलर्सचा (३,५५० कोटी रुपये) फटका बसू शकतो अशी शक्यता वर्तविण्यात आली होती. त्यानुसार वर्षभर असेच चित्र कायम राहिले तर हे नुकसान तब्बल १४,२०० कोटी रुपयांपर्यंत जाऊ शकते. १० जानेवारीला रॉयटर्स या वृत्तसंस्थेच्या अहवालात हा अंदाज वर्तवण्यात आला होता. मात्र तो केवळ भारतीय टूर ऑपरेटर्ससंबंधित होता. दरम्यान, पर्यटन क्षेत्राशी निगडित अनेक छोटे-मोठे उद्योग आहेत.
5 वर्षांपूर्वी -
YES बँकेवरील निर्बंध बुधवारी ६ वाजल्यापासून मागे घेणार - RBI
येस बँकेच्या खातेदारांसाठी आनंदाची बातमी आहे. काही दिवसांपूर्वी झालेल्या कॅबिनेट बैठकीनंतर अर्थ मंत्र्यांनी सांगितलं होतं की, अर्थ मंत्रालयाकडून लवकरच येस बँक प्रकरणात नोटिफिकेशन जारी करण्यात येणार आहे. हे नोटिफिकेशन आल्यानंतर ३ दिवसांच्या आत येस बँकेवरील निर्बंध हटवण्यात येणार आहेत. ३ दिवसांमध्येच मोरेटेरियम पीरियड संपवण्यात येईल.
5 वर्षांपूर्वी -
अनिल अंबानींच्या कंपनीने YES बँकेचं १२,८०० कोटींचे कर्ज परत केले नाही
हजारो कोटींचा बॅँक घोटाळा करून खातेदारांना आर्थिक संकटात टाकलेल्या येस बॅँकेचा संस्थापक राणा कपूर, पत्नी बिंदू कपूरसह तिघांविरुद्ध केंद्रीय गुन्हे अन्वेषण शाखेने (सीबीआय) आणखी एक गुन्हा दाखल केला आहे. अमृता शेरगिलच्या बंगल्याच्या व्यवहारात घोटाळा केल्याचे स्पष्ट झाल्याने कपूर दाम्पत्यासह त्यांचा साहाय्यक गौतम थापरविरुद्ध शुक्रवारी गुन्हा दाखल केल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. राणा कपूर मागील रविवारपासून सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) ताब्यात असून सोमवार, १६ मार्चपर्यंत कोठडीची मुदत आहे.
5 वर्षांपूर्वी -
शेअर बाजार कोरोनाच्या धास्तीने कोसळला; गुंतवणूकदारांचे ६ लाख कोटी बुडाले
जगभरात कोरोना व्हायरसने थैमान घातलं आहे. उद्योग- व्यवसायाबरोबरच शेअर बाजारावरही त्याचा मोठा परिणाम झाल्याचं पाहायला मिळत आहे. आठवड्याच्या सुरुवातीलाच अर्थात सोमवारी शेअर बाजारात मोठी पडझड पाहायला मिळत आहे. शेअर बाजार सुरु होताच सेन्सेक्स २००५ अंकांनी कोसळला असून तो ३२,५५७ अंकावर स्थिरावला आहे. निफ्टीत सध्या ६११ अंकांनी खाली आला आहे. तसेच आशियाई बाजारात पुन्हा एकदा पडझड झाली. याव्यतिरिक्त हाँगकाँग, शाँघाय, टोकियोचे बाजारही सोमवारी चांगलेच गडगडले आहेत.
5 वर्षांपूर्वी -
तुम्ही माझा अंत पाहू नका, SBI अध्यक्षांवर सीतारामन संतापल्या
देशातील सर्वात मोठ्या सार्वजनिक बँकेचे बिरुद मिरवणाऱ्या स्टेट बँक ऑफ इंडियाचा (SBI) कारभार निर्दयी आणि अकार्यक्षम असल्याचे खडे बोल केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी बँकेच्या उच्चपदस्थांना सुनावले. २७ फेब्रुवारी रोजी गुवाहाटीमध्ये झालेल्या एका कार्यक्रमादरम्यान निर्मला सीतारामन यांनी हे वक्तव्य केले होते. त्यांच्या या भाषणाची ऑडिओ क्लीप आता समोर आली आहे.
5 वर्षांपूर्वी -
राज्य शासनाच्या 'या' निर्णयामुळे अॅक्सिस बँकेला मोठा आर्थिक फटका बसणार
राज्यात काही बँकांचे घोटाळे आणि बुडीत कर्जामुळे बँका देशोधडीला लागल्याचं पाहायला मिळत आहे. नुकत्याच झालेल्या येस बँकेच्या घटनेमुळे अनेक महानगर पालिकांचा पैसा देखील त्यात अडकल्याने प्रशासनाची मोठी आर्थिक कोंडी झाली आहे. अनेकांचे पैसे अडकले. त्यामुळ नवा पेच निर्माण झाला आहे. लोकांचा पैसा सुरक्षित राहण्यासाठी राज्य सरकारने पाऊल उचलले आहे. त्यामुळे सार्वजनिक महामंडळांनी राष्ट्रीयकृत बँकेतच पैसे जमा करावेत, असा राज्य सरकारने आदेश जारी केला आहे. १ एप्रिलपासून खासगी तसेच सहकारी बँकेतील खाती बंद करण्यात येणार आहेत.
5 वर्षांपूर्वी -
बिल गेट्स यांचा मायक्रोसॉफ्टच्या संचालक मंडळाचा राजीनामा
मायक्रोसॉफ्टचे सर्वेसर्वा बिल गेट्स यांनी मायक्रोसॉफ्टच्या संचालक मंडळाचा आज (ता. १४) राजीनामा दिला. गेट्स यांना सामाजिक कार्यात प्राधान्याने काम करायचे असल्याने त्यांनी राजीनामा दिल्याचे मायक्रोसॉफ्टने सांगितले. संचालक मंडळाचा राजीनामा दिला असला तरी, गेट्स हे मायक्रोसॉफ्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी सत्या नडेला यांच्यासोबत तांत्रिक सल्लागार म्हणून काम करतील.
5 वर्षांपूर्वी -
सुरुवातीच्या पडझडीनंतर शेअर बाजार काहीसा सावरला, भीती मात्र कायम
सलग दुसऱ्या दिवशी मुंबई शेअर बाजाराच्या आणि राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निर्देशांकात मोठी पडझड झाली. राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीमध्ये ९५० अंकांची घसरण झाल्यामुळे बाजारात लोअर सर्किट लावण्यात आले. यामुळे राष्ट्रीय शेअर बाजारात व्यवहार ४५ मिनिटांसाठी स्थगित करण्यात आले. मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकात अर्थात सेन्सेक्समध्ये शुक्रवारी बाजार उघडताच घसरण झाल्याचे पाहायला मिळाले. सुरुवातीच्या पडझडीनंतर दोन्ही शेअर बाजारात गुंतवणूकदारांनी खरेदी करण्याला काहीसा उत्साह दाखविल्यामुळे निर्देशांक सावरण्यास मदत झाली.
5 वर्षांपूर्वी -
...अन्यथा खासगी आणि सरकारी बँकांवरील लोकांचा विश्वासच उडेल: RBI माजी गव्हर्नर
भारतीय रिझर्व्ह बॅंकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी येस बॅंक प्रकरणी सरकारवर निशाणा साधला आहे. या समस्येतून बाहेर पडण्यासाठी खूप वेळ होता. यासंदर्भात खूप दिवसांपासून चर्चा सुरु होती. एका खासगी वृत्तवाहीनीला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते. गेल्या आठवड्यापासूनच रिझर्व बॅंकेने येस बॅंकेला आपल्या नियंत्रणात घेतले आणि ग्राहकांना ५० हजार रुपयांपेक्षा जास्त पैसे काढण्यावर बंदी लावली.
5 वर्षांपूर्वी -
कोरोना इम्पॅक्ट: सेन्सेक्स १६०० तर निफ्टी ४७० अंकानी घसरला
कोरोना व्हायरसबाधितांची संख्या जगभरात वाढत असताना त्याचा गंभीर परिणाम आता आर्थिक आघाडीवरही दिसू लागला आहे. जगातील सर्वच महत्त्वाच्या शेअर बाजारांच्या निर्देशांकात पडझड झाल्याचे पाहायला मिळत आहे. मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकात गुरुवारी सकाळी मोठी घसरण झाली. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक तब्बल १८०० अंकांनी कोसळला. राष्ट्रीय शेअर बाजार अर्थात निफ्टीमध्येही ५०० अंकांची घसरण झाल्याचे पाहायला मिळाले.
5 वर्षांपूर्वी -
दलाल स्ट्रीट आज हलाल स्ट्रीट झाला: प्रियांका चतुर्वेदी
कोराना विषाणूच्या प्रभावामुळे शेअर बाजारात हाहाकार उडाला आहे. तेलाच्या किेंमतीत झालेल्या घसरणीनंतर आठवड्याच्या सुरुवातीलाच शेअर बाजार कोलमडल्याचे चित्र पहायला मिळाले. दुपारी निर्देशांकात २३४२ अंकाची घसरण होऊन सेन्सेक्स ३५, २३४ वर आला. निफ्टीही घसरून तो १०, ४०० वर आला. कोरोनाने जगभरात आर्थिक मंदीचे सावट घोंगावत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. शेअर बाजारातील निर्देशांकात झालेल्या घसरणीमुळे गुंतवणूकदारांचा जवळपास ५ लाख कोटी रुपये बुडाले आहेत.
5 वर्षांपूर्वी -
YES BANK - राणा कपूर यांच्या मुलीला मुंबई विमानतळावरच रोखले
येस बँकेचे संस्थापक राणा कपूर यांच्या संपूर्ण कुटुंबियांविरोधात लुक आऊट नोटीस जारी करण्यात आले आहे. या नोटीसच्या आधारावर राणा कूपर यांची मुलगी रोशनी कपूर यांना लंडनला जाण्यापासून रोखण्यात आले आहे. येस बँक गैरव्यवहार प्रकरणात रोशनी कपूर यांच्यावरही संशयाची टांगती तलवार आहे. त्यांच्या नावाने असलेल्या कंपनीलाही येस बँकेने कर्ज दिले आहे. रविवारी संध्याकाळच्या दरम्यान मुंबई विमानतळावरुन रोशनी या ब्रिटीश एअरवेजच्या विमानाने लंडनला कूच करणार होत्या. मात्र त्यांना रोखण्यात आले असून त्यांना घरी परतावे लागले.
5 वर्षांपूर्वी -
शेअर बाजारात पडझड, सेन्सेक्स १४०० अंकांनी कोसळला
करोना व्हायरसमुळे आधीच शेअर बाजारात निरुत्साह असताना, येस बँकेवर आरबीआयने निर्बंध लादले त्यामुळे शुक्रवारी बाजार आणखी गडगडला. आता सौदी अरेबियाने तेल बाजारपेठेला मोठा धक्का दिला आहे. एकेकाळचा सहकारी असलेल्या रशिया विरोधात सौदी अरेबियाने दर युद्ध सुरु केले आहे. त्यामुळे तेलाच्या किंमतीमध्ये ऐतिहासिक घसरण झाली आहे. आज सकाळी बाजार उघडताच मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकात १४०० अंकांची घसरण झाली. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी सुद्धा ४०० पेक्षा जास्त अंकांनी गडगडला. निफ्टी सात महिन्यातील नीचांकी पातळीला पोहोचला आहे.
5 वर्षांपूर्वी