पेगासस हेरगिरी | जर रिपोर्ट्स खरे असतील तर हा एक गंभीर मुद्दा - सर्वोच्च न्यायालय

नवी दिल्ली, ०५ ऑगस्ट | एकीकडे संसदेत पेगासस प्रकरणावरुन गदारोळ सुर आहे तर दुसरीकडे सर्वोच्च न्यायालयात यावर सुनावणी सुरु आहे. सर्वोच्च न्यायालय या प्रकरणाशी संबंधित 9 अर्जांवर सुनावणी करीत आहे. पेगासस हेरगिरी प्रकरणाची एसआयटी चौकशी करण्याची मागणी याचिकाकर्त्यांने केली आहे. सुनावणीदरम्यान, जर हे रिपोर्ट्स खरे असतील तर हा एक गंभीर मुद्दा आहे असे न्यायमूर्ती एन. व्ही. रमना यांनी सांगितले आहे. ते पुढे म्हणाले की, सर्वप्रथम हेरगिरीचा अहवाल 2019 मध्ये समोर आला होता. परंतु, यावर अजून कोणीही माहिती गोळा करण्याचा प्रयत्न केला की नाही याबद्दल माहित नाही.
ही याचिका पत्रकार एन. राम आणि शशी कुमार यांनी दाखल केली आहे. दरम्यान, याचिकाकर्त्यांचे वकील कपिल सिब्बल म्हणाले की, पेगासस हे एक वाईट तंत्रज्ञान असून ते नकळत आपल्या जीवनात प्रवेश करते. यामुळे आपली गोपनीयता, सन्मान आणि स्वातंत्र्यांच्या मुल्ल्यांवर हल्ला होतो. हे स्पायवेअर केवळ सरकारी संस्थांनाच विकल्या जाते असे ते यावेळी म्हणाले.
स्पायवेअर का खरेदी केली?
केंद्र सरकारने स्पायवेअरच्या माध्यमातून पत्रकार, घटनात्मक संस्था, न्यायालयीन अधिकारी आणि अगदी शिक्षणतज्ज्ञ यांना टारगेट केले जात आहे. अशा अशा परिस्थितीत सरकारने स्पायवेअर का खरेदी केले? याचे उत्तर द्यावे अशी मागणी कपिल सिब्बल यांनी सुप्रीम कोर्टात केली आहे.
महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.
News Title: Pegasus row Supreme court to hear batch of pleas for independent probe news LIVE updates.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं