मोदींच्या राज्यात पेट्रोल-डिझेल किमतीच्या भडक्याने लोकांच्या खिशाला आग | अजून विक्रमी दरांकडे कूच

नवी दिल्ली , १३ जून | देशभरात पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत पुन्हा एकदा वाढ झाली आहे. आज पेट्रोलचा दर 27 पैशांनी तर डिझेलचा दर हा 23 पैशांनी वाढला आहे. मुंबईत आज पेट्रोलची किंमत 102.30 रुपये असून डिझेलची किंमत ही 94.39 रुपये इतकी आहे. देशातील एकूण सहा राज्यांत पेट्रोलचे दर हे शंभरीपार झाले असून डिझेलचा प्रवासही शंभरीकडे सुरु आहे.
राजधानी दिल्लीमध्ये पेट्रोलची किंमत ही 96.12 रुपये आहे तर डिझेलची किंमत ही 86.98 रुपये इतकी आहे. शहरांचा विचार करता भोपाळमध्ये सर्वाधिक म्हणजे 104.29 रुपये पेट्रोलचा दर तर 95.60 रुपये इतका डिझेलचा दर आहे. राजस्थानच्या श्रीगंगानगर जिल्ह्यामध्ये देशातील सर्वाधिक दराने पेट्रोल आणि डिझेलची विक्री होत आहे. त्या ठिकाणी पेट्रोल हे 107 रुपये तर डिझेल हे 100.05 रुपये इतके आहे.
पुढील विक्रमी दारांकडे वाटचाल:
पेट्रोल-डिझेलच्या विक्रमी दरांनंतर तज्ज्ञांनी व्यक्त केलेल्या अंदाजानुसार पेट्रोलचे दर १२१ रुपये प्रतिलिटर पार होऊ शकतात असा अंदाज व्यक्त केला आहे. त्यामुळे आधीच वाढलेल्या महागाईमुळे त्यात अजून भर पडण्याची शक्यता व्यक्त करण्यात येतं आहे.
News Title: Petrol Diesel news high record in the India news updates.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं