आयकर विभागाच्या अंदाजानुसार पीएनबी बँक घोटाळा २०,००० कोटी पर्यंत ?

मुंबई : भारताच संपूर्ण बँकिंगक्षेत्र हादरवून सोडणाऱ्या पीएनबी बँक घोटाळा ११,३५० कोटी नाही तर तब्बल २०,००० कोटी पर्यंत असू शकतो अशी शक्यता आयकर विभागाने वर्तविली आहे. सीबीआयने या प्रकरणी नीरव मोदीच्या कंपनीचे मुख्य फायनान्शियल अधिकारी विपुल अंबानीची चौकशी चालू केली आहे.
चौकशीअंती अशी माहिती पुढे येत आहे की, विपुल अंबानी हे मुकेश अंबानी यांचे चुलतभाऊ आहेत. सर्वात मोठी गोष्ट ही की पीएनबीची ब्रीच कँडी शाखा सीबीआयने सील केली आहे. त्यामुळे सामान्य ग्राहकांचेही धाबे दणाणले आहेत.
आता पर्यंत जवळजवळ ५,७९० कोटी रुपये एकूण कारवाईत जप्त झाले आहेत आणि ईडीने १३ हुन अधिक पीएनबी बँकेच्या अधिकाऱ्यांची चौकशी केली आहे. अजून पीएनबीच्या बऱ्याच अधिकाऱ्यांची नावे पुढे येत आहेत ज्यांनी नीरव मोदीला या सर्व घोटाळ्यात मोठी मदत केली आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं