मोदी है तो मुमकिन है? | मोदींच्या नव्या भारतातील लोकांपेक्षा बांगलादेशातील लोकांचं प्रती माणसी उत्पन्न वाढलं

नवी दिल्ली, २२ मे | मागील काही काळापासून मोदी है तो मुमकिन है अशी टिमकी मिरवणाऱ्या केंद्र सरकारवर जागतिक स्तरावर नामुष्की ओढवली आहे. गेल्या वर्षी देशाच्या जीडीपी’ने ऐतिहासिक निच्चांक गाठला होता. एकाबाजूला देश कोरोना आपत्तीने कोलमडलेला असताना दुसऱ्या बाजूला बेरोजगारी, महागाई आणि ढासळणाऱ्या अर्थव्यवस्थेमुळे अनेक गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. या सर्वांचा बळी ठरत आहे तो सामान्य माणूस यात शंका नाही. मागील अनेक वर्षांपासून खंबीर असणारा देश सर्वच बाजूने खचताना दिसतोय. आता भारताच्या शेजारील गरीब देशांतील लोकांचं जीवनमान आणि मिळकत देखील भारतापेक्षा उंचावत असल्याचं समोर आलं आहे.
प्रती माणसी उत्पन्नाच्या बाबतीत बांगलादेशनं भारताला मागे टाकलं आहे. भारतीय नागरिकांचं सरासरी वार्षिक उत्पन्न १९४७ डॉलर म्हणजेच १.४१ लाख रुपये आहे. भारत सरकारनं दिलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, कोरोना विषाणूमुळे फैलावलेल्या महामारीमुळे लॉकडाऊन लावण्यात आला. त्याचा परिणाम आर्थिक व्यवहारांवर झाला. त्यामुळे प्रती माणशी उत्पन्नात घट झाली. तर याच कालावधीत बांगलादेशमधील नागरिकांचं सरासरी वार्षिक उत्पन्न २२२७ डॉलरवर गेलं. गेल्या वर्षीच्या तुलनेत ही वाढ ९ टक्के आहे.
सरासरी वार्षिक उत्पन्नाचा आकडा लक्षात घेतल्यास बांगलादेशी नागरिकांचं उत्पन्न भारतीयांपेक्षा अधिक आहे. बांगलादेश १९७१ मध्ये स्वतंत्र झाला. त्यावेळी बांगलादेशची गणना सर्वाधिक गरिब राष्ट्रांमध्ये व्हायची. मात्र गेल्या काही वर्षांत बांगलादेशनं उत्पादन क्षेत्रावर विशेष लक्ष दिलं. आर्थिक वर्ष २०२०-२१ मध्ये बांगलादेशी नागरिकाचं सरासरी वार्षिक उत्पन्न २२२७ डॉलर म्हणजेच १.६२ लाख रुपयांवर पोहोचलं. गेल्या वर्षी बांगलादेशी नागरिकाचं वार्षिक उत्पन्न २०६४ डॉलर म्हणजेच १.४६ लाख रुपये होतं.
News English Summary: Bangladesh lags behind India in terms of per capita income. The average annual income of an Indian citizen is डॉलर 1,947, or ४ 1.41 lakh. According to the latest figures provided by the Government of India, the lockdown was caused by an epidemic spread by the corona virus.
News English Title: Poor country like Bangladesh outpaces India capita income news updates.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं