जगातील बलाढ्य उद्योगपती जॅक मा निवृत्त, पण काय संदेश दिला उद्योग जगाला?

बीजिंग : चीनमधील जगप्रसिद्ध इ-कॉमर्स कंपनी अलीबाबाचे संस्थापक आणि चीनमधील सर्वात श्रीमंत व्यक्ती जॅक मा यांनी काही दिवसांपूर्वीच स्वतःच्या कंपनीतून निवृत्त होण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्या या धाडसी निर्णयामुळे संपूर्ण जगाला आश्चर्याचा धक्का बसला आहे. उद्या म्हणजे सोमवारी १० ऑगस्ट रोजी आणि वयाच्या ५४व्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांनी स्वतःच्या कंपनीतून निवृत्त होण्याचा निर्णय जाहीर केला.
जॅक मा चीनमधील सर्वात श्रीमंत व्यक्ती म्ह्णून प्रसिद्ध असून ते संपूर्ण आशियातील श्रीमंत व्यक्तींमध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहेत. उद्या निवृत्त झाल्यानंतर त्यांनी चीन तसेच जगभरात शिक्षणाचा अधिक प्रसार करण्यासाठी त्यांनी चैरिटी फाउंडेशन सुरू करण्याचा निर्णय जाहीर केला आहे.
वयाच्या या वळणावर एखाद्या कंपनीचा सीइओ म्हणून काम करण्यापेक्षा मला लोकांना शिकवायला अधिक आवडेल अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली आहे आणि त्याअनुषंगाने काही धाडसी निर्णय सुद्धा घेतले आहेत. परंतु निवृत्ती पूर्वी त्यांनी संपूर्ण उद्योग जगातला आयुष्याच्या कोणत्या वयात आपण काय निर्णय घेतले पाहिजे आणि कशात स्वतःला आपल्या वयानुसार गुंतवलं पाहिजे याचे धडे दिले आहेत.
जॅक मा म्हणतात,’ २० ते ३० वयाच्या टप्यात तुम्ही योग्य बॉसला फॉलो केलं पाहिजे. एखाद्या नामांकित कंपनीमध्ये कशा प्रकारे काम केलं पाहिजे याचे धडे घेतले पाहिजेत. तुमचं वय जेव्हा ३० – ४० मध्ये असेल तेव्हा तुम्ही स्वतःच काही करण्याचा निर्णय घेतला पाहिजे. परंतु त्या दम्यान पास किंवा नापास होणं मोठ्या मनाने स्वीकारा. त्यानंतर वय जेव्हा पन्नाशीत येईल तेव्हा तुम्ही ज्या क्षेत्रात असाल त्यात सर्वोत्तम कामगिरी बजावली पाहिजे. जेव्हा तुमचं वय ५०-६० मध्ये असेल तेव्हा तुम्ही तुमच्या पुढच्या पिढीला मार्गदर्शन आणि त्यांना घडविण्यात वेळ घालवला पाहिजे. त्यानंतर म्हणजे वयाची साठी ओलांडल्यावर तुम्ही तुमच्या नातवंडांसोबत वेळ व्यतीत केला पाहिज’ असं जॅक मा म्हणतात.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं