वॉरेन बफेट यांची भारतातील पहिली गुंतवणूक ‘पेटीएम’मध्ये

नवी दिल्ली : जगप्रसिद्ध उद्योगपती आणि ‘बर्थशायर हॅथवे’ या कंपनीचे सर्वेसेवा वॉरेन बफेट हे भारतात पहिल्यांदाच गुंतवणूक करणार असल्याचे वृत्त आहे. वॉरेन बफेट हे विजय शेखर शर्मा यांच्या‘पेटीएम’ कंपनीच्या मुख्य कंपनीत म्हणजे ‘वन 97 कॉम्युनिकेशंस’मध्ये ते मोठी गुंतवणूक करणार असल्याचे समजते.
वॉरेन बफेट ‘वन 97 कॉम्युनिकेशंस’मध्ये तब्बल २,५०० कोटी रुपयांची गुंतवणूक करणार असल्याचे वृत्त इकॉनॉमिक टाइम्सने प्रसिद्ध केले आहे. त्याच अनुषंगाने बर्थशायर हॅथवे आणि पेटीएममध्ये सध्या प्राथमिक स्थरावर बोलणी सुरू असून येत्या दोन ते तीन आठवड्यांमध्ये याबाबत अंतिम निर्णय घेतला जाऊ शकतो. बर्थशायर हॅथवे वन-97 कम्युनिकेशनमधील सुमारे दोन ते चार टक्के समभाग खरेदी करेल, असे म्हटले जात आहे. या वृत्ताला ‘बर्थशायर हॅथवे’ने दुजोरा दिला असला तरी वन-97 कम्युनिकेशन’मधून दुजोरा मिळू शकला नाही.
परंतु बर्थशायर हॅथवे’कडून एवढी मोठी गुंतवणूक झाल्यास त्याचा प्रचंड मोठा फायदा वन-97 कम्युनिकेशन’ला होणार आहे. त्यामुळे सर्व स्पर्धकांना मोठ्या प्रमाणावर टक्कर देणे त्यांना सहज शक्य होणार आहे. विशेष म्हणजे या गुंतवणुकीनंतर पेटीएम’मध्ये चीनची अलीबाबा कंपनी आणि जपानच्या सॉफ्टबँके बरोबरच अमेरिकेतील बर्थशायर हॅथवे सुद्धा जोडली जाणार आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं