मंदिर आणि धर्मावर चर्चा करुन देशात रोजगार निर्मिती होणार नाहीये: सॅम पित्रोदा

गांधीनगर : मला भारताची खरंच चिंता वाटू लागते जेव्हा मी देशात मंदिर, धर्म, जात, देव अशा विषयांवर वादविवाद आणि संघर्ष पाहतो. देशात रोजगार निर्मिती ही कोणत्याही धर्मामुळे नाही तर केवळ विज्ञानच भविष्याची निर्मिती करु शकतं असं ठाम मत भारताच्या मोबाइल क्रांतीचे जनक सॅम पित्रोदा यांनी केलं आहे.
सॅम पित्रोदा यांनी गांधीनगर येथील एका विद्यापीठात विद्यार्थ्यांशी संवाद साधताना हे वक्तव्य केलं आहे. आपण जेव्हा कधी रोजगारासंबंधी चर्चा करतो तेव्हा त्याला लगेचच राजकीय रुप दिलं जातं अशी खंत सुद्धा त्यांनी संवादादरम्यान व्यक्त केली आहे. देशाचे भविष्य हे विज्ञानावर आधारित असत आणि फक्त विज्ञानामुळेच देशाचं भविष्य घडू शकत, परंतु दुर्दैवाने सार्वजनिक ठिकाणी विज्ञानावर फार कमी चर्चा होत असल्याची खंत सॅम पित्रोदा यांनी व्यक्त केली.
देशातील तरुणांकडून जेव्हा रोजगारासंबंधी चर्चा होते तेव्हा विशेषकरून राजकारण्यांकडून भरकटवलं जात. निरुपयोगी गोष्टी सांगून तरुणांना चुकीच्या मार्गावर ढकलले जात आहे असं सनसनाटी आरोप सुद्धा त्यांनी केला. नेते मंडळी अशा विषयांवर बोलत असतात ज्यांना काहीच अर्थ नसतो, कारण संपूर्ण आयुष्यात त्यांनी भाषण देण्याव्यतिरिक्त समाजासाठी दुसरं त्यांनी काहीच केलेलं नसतं. त्यामुळे तरुणांना मार्गदर्शन करण्याची त्यांची योग्यता नाही असं सॅम पित्रोदा बोलले आहेत. त्यानाच एकूणच रोख हा देशातील सध्याच्या राजकीय वातावरणावर होता असं जाणवत होत.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं