भारत-पाकिस्तानमध्ये ‘समझोता एक्सप्रेस’ ३ मार्चपासून सुरळीत

नवी दिल्ली : पुलवामा जिल्ह्यातील सीआरपीएफ’च्या जवानांवरील भ्याड दहशदवादी हल्ला आणि त्यानंतर एअर स्ट्राईकनंतर भारत-पाकिस्तानमधील तणावाच्या पार्श्वभूमीवर स्थगित करण्यात आलेली समझोता एक्सप्रेसची सेवा ३ मार्चपासून सुरळीत सुरु झाली आहे. दोन्ही देशांनी मिळून रेल्वे सेवा पुन्हा सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. मागील रविवारी दिल्लीमधून पाकिस्तानसाठी समझोता एक्सप्रेस पुन्हा निघाली होती. रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने ही तशी अधिकृत माहिती दिली प्रसिद्ध केली होती.
पाकिस्तानने त्यांच्या ताब्यात असलेले विंग कमांडर अभिनंदन वर्थमान यांची सुटका केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी हा निर्णय झाला आहे. त्यानुसार तीन मार्चला भारतातून पाकिस्तानसाठी पहिली ट्रेन निघेल असे एका अधिकाऱ्याने सांगितले होते. भारताने पाकिस्तानातील बालकोटमधील जैश-ए-मोहम्मदच्या तळावर एअर स्ट्राइक केल्यानंतर पाकिस्तानने समझोता एक्सप्रेस बंद केली होती.
भारतातून मागील रविवारी समझोता एक्सप्रेस पाकिस्तानला गेली. त्यानंतर सोमवारी लाहोरहून तीच ट्रेन पुन्हा परतीच्या प्रवासाला निघाली. भारत-पाकिस्तानमधील तणाव कमी व्हावा यासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवर बरेच प्रयत्न सुरु आहेत. समझोता एक्सप्रेसची सेवा पूर्ववत होणे याला तणाव कमी करण्याच्या दिशेने टाकलेले एक पाऊल म्हटले गेले.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं