अक्कड़ बक्कड़ बंबे बो | डीजल नब्बे पेट्रोल सौ | सौ मे लगा धागा | सिलेंडर ऊछल के भागा

मुंबई, १९ फेब्रुवारी: कोरोना महामारीच्या काळात सर्वसामान्यांच्या अडचणीं कमी होण्याचं नाव घेताना दिसत नाहीत. वाढत्या महागाईमुळे त्यांच्या समस्या वाढल्या आहेत. पेट्रोल-डिझेलच्या किंमती आज पुन्हा वाढल्या आहेत. दरम्यान, तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत सलग 11 व्या दिवशी वाढ केली आहे. ज्यामुळे राजधानी दिल्लीत पेट्रोल प्रतिलिटर 90 रुपयांच्या पुढे गेले आहे. सध्या अनेक शहरांत पेट्रोलचे दर शंभरच्या पुढे गेले आहेत.
पेट्रोलियम कंपन्यांनी आज शुक्रवारी सलग ११ व्या दिवशी कंपन्यांनी पेट्रोल-डिझेलच्या किमतीत वाढ केली. या दरवाढीने दिल्लीत पेट्रोलने ९० रुपयांची तर डिझेलने ८० रुपयांची पातळी ओलांडली आहे. मुंबईत साधे पेट्रोल ९७ रुपयांच्या नजीक गेले आहे. दरम्यान, पेट्रोलने शंभरी ओलांडलेल्या शहरांची संख्या आज वाढली आहे.
याच विषयाला अनुसरून शिवसेना नेत्या उर्मिला मातोंडकर यांनी मोदी सरकारला टोला लगावला आहे. यासंदर्भात ट्विट करताना उर्मिला मातोंडकर यांनी म्हटलं आहे की, “अक्कड़ बक्कड़ बंबे बो….डीजल नब्बे पेट्रोल सौ….सौ मे लगा धागा…..सिलेंडर ऊछल के भागा, असं म्हणत मोदी सरकारची खिल्ली उडवली आहे.
अक्कड़ बक्कड़ बंबे बो
डीजल नब्बे पेट्रोल सौ
सौ मे लगा धागा
सिलेंडर ऊछल के भागा ??— Urmila Matondkar (@UrmilaMatondkar) February 18, 2021
मुंबईत पेट्रोलचा दर प्रतिलीटर ९६ रुपये ६२ पैसे आणि डिझेलचा दर ८७ रुपये ६७ पैसे इतका झाला आहे. कोलकातामध्ये पेट्रोलसाठी ९१ रुपये ४१ पैसे तर डिझेलसाठी ८४ रुपये १९ पैसे मोजावे लागत आहेत. बंगळुरुत हाच दर पेट्रोलसाठी ९३ रुपये २१ पैसे आणि डिझेलसाठी ८५ रुपये ४४ पैसे इतका आहे. मुंबईत गुरुवारी पेट्रोलचा दर ९६ रुपये ३२ पैसे तर डिझेलचा दर ८७ रुपये ३२ पैसे इतका होता. विशेष म्हणजे राजस्थान आणि मध्य प्रदेशात पेट्रोलच्या दराने शंभरी गाठली आहे.
News English Summary: Corona does not seem to be taking the name of alleviating the suffering of the masses during the epidemic. Rising inflation has exacerbated their problems. Petrol-diesel prices have risen again today. Meanwhile, oil companies have hiked petrol and diesel prices for the 11th day in a row. As a result, petrol in the capital Delhi has gone beyond Rs 90 per liter. Currently, petrol prices in many cities have gone beyond a hundred.
News English Title: Shivsena leader Urmila Matondkar criticised Modi govt over high fuel price news updates.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं