शेअर बाजार १५०० अंकांनी गडगडला

मुंबई : आज सकाळी शेअर बाजार चांगल्या तेजीत सुरु झाला होता. दरम्यान, सेन्सेक्स अजून वरती जाईल असे प्रथम दर्शनी वाटत असताना दुपारनंतर शेअर बाजारात मोठी घसरण पाहायला मिळाली. दुपारी सेन्सेक्समध्ये तब्बल १५०० अंकांनी घसरण झाली तर निफ्टीमध्ये सुद्धा३५० अंकाची घसरण पाहायला मिळाली.
दुपारी इतकी मोठी पडझड झाल्याने गुंतवणूकदारांचे प्रचंड नुकसान झाल्याने भांडवली बाजारात मोठी खळबळ उडाली आहे. यात विशेष करून येस बँक, सन फार्मासह इंडिया बुल्स हाऊसिंगचे शेअर मोठ्या प्रमाणावर घसरले. सर्वाधिक नुकसान बँकिंग क्षेत्राचे पाहायला मिळत आहे. सकाळी बाजार उघडताच सेन्सेक्स १७२ अंकांने वाढून ३७३९१.६ अंकावर पोहोचला तर निफ्टीही ६९ ने वाढत ११३२३ वर पोहोचला होता. परंतु, दुपार होता होता सेन्सेक्समध्ये मोठी घसरण झाली आणि त्यामुळे सेन्सेक्सचा चार्ट व्ही-शेपमध्ये दिसू लागला. एकदिवसात गुंतवणूकदारांचे करोडो रुपये पाण्यात गेले आहेत.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं