एक्झिट पोलच्या अंदाजानंतर शेअर बाजार उसळला

मुंबई : लोकसभा निवडणुकांचे एक्झिट पोल काल सर्वच वृत्तवाहिन्यांनी जाहीर केल्यानंतर आज शेअर बाजाराने मोठी उसळी मारल्याचे समजते. आज सकाळी शेअर बाजार उघडताच मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक अर्थात सेन्सेक्स तब्बल ९०० अंकांनी वधारला. तर निफ्टी देखील ११,६४८ अंकांवर पोहोचला. यासह रूपया देखील ७३ पैशांनी मजबूत झाला आहे.
केंद्रात कोणाचे सरकार येणार याचा फैसला २३ मे रोजी होणार असला तरीही रविवारी लोकसभा निवडणूक मतदानाचा शेवटचा ७वा टप्पा पार पडल्यानंतर विविध माध्यमांनी दर्शवलेल्या एक्झिट पोल प्रमाणे केंद्रातील सत्ता पुन्हा भाजप प्रणित ‘एनडीए’ कडे जाणार असल्याचे दिसत आहे. याचा परिणाम आज शेअर बाजारावरही दिसून आला. आज सकाळी सेन्सेक्स ८८८.९१ अंकांच्या वाढीसह ३८,८१९.६८ अंकांवर तर निफ्टी २८४.१५ अंकांच्या वाढीसह ११,६९१.३० अंकांवर उघडला.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं