मोदी है तो मुमकिन है! सर्वसामान्यांचं जगणं डोईजड, तूरडाळ १०० रुपये किलो

मुंबई : लोकसभा निवडणूक जाहीर होताच प्रत्येक विषय हा ‘मोदी है तो मुमकिन है’ अशा अविर्भावात झाली. मात्र बहुमताने सत्तेत येऊन देखील सरकार महागाई रोखण्यात आणि सर्व सामान्यांना दिलासा देण्यात अपयशी होताना दिसत आहेत. कारण लोकसभा निवडणुका संपताच पुन्हा एकदा महागाईने डोकं वर काढलं आहे. या आठवड्यात तूरडाळीनं तब्बल शंभरी गाठलीय. तूरडाळ प्रति किलो १०० रुपये झाली आहे. विशेष म्हणजे गेल्यो २ महिन्यांमध्ये डाळीच्या दरात ३५ रुपयांनी वाढ झालीय. तूरडाळीबरोबर मूग, मटकी, मसुर यांच्या किमतीही वाढल्यात. त्याचबरोबर शेंगदाणा, वरी यांच्या किमतीही चढ्या होतायत.
महाराष्ट्रात विदर्भ आणि मराठवाडा इथे अवकाळी पाऊस पडला. त्यामुळे धान्याचं उत्पादन कमी झालं. तूरडाळीत प्रति किलो ८ रुपये वाढ झाल्यानं ती आता तब्बल १०० रुपयांवर पोहोचली आहे. कच्ची तूर ३९ रुपये ते ४० रुपये होती. त्यात १५ ते २० रुपयांनी वाढ झालीय. कच्ची तूरडाळ ५,५०० ते ५,९०० प्रति क्विंटल झाली आहे. त्यामुळे ग्राहकांपर्यंत पोचेपर्यंत ती तब्बल १०० रुपये किलो झाली.
मसुर डाळ, मूगडाळीच्या दरात प्रति किलो ४ रुपयांनी वाढ झालीय. तर मटकीच्या दरात प्रति किलो १० रुपयांनी वाढ झालीय. मागील दोन महिन्यात तूरडाळीचा दर वाढतच चाललाय. गेल्या आठवड्यात तो प्रति किलो ९२ रुपये होता. मोठे व्यापारी हे सतत बाजारपेठेचा अंदाज, ग्राहकांची मागणी, आंतरराष्ट्रीय बाजारपेठ आणि सरकारचं धोरण याकडे लक्ष ठेवून असतात. त्यातल्या बदलानुसार त्यांचे भाव ठरतात. त्यांनी भाव ठरवल्यानंतर त्याचा परिणाम देशपातळीवर होत असतो.
गेल्या नोव्हेंबरमध्ये तूरडाळ, मुगडाळ, चणाडाळ आणि मसुरडाळ १०० रुपये किलो झाली होती. उडीदडाळ १२० रुपयांवर पोचली होती. आता पुन्हा एकदा सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागणार आहे. या रोजच्या लागणाऱ्या गोष्टींमुळे महिला वर्गामध्ये मोदी सरकार विरोधात प्रचंड नाराजी पसरण्याची शक्यता आहे. त्यामुळे जीवनाश्यक वस्तूंच्या भाव वाढीवर नियंत्रण ठेवण्यासाठी केंद्र सरकार नेमकी पावले उचलणार ते पाहावं लागणार आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं