भारत-पाकिस्तान दरम्यान 'पाणीबाणी'; पाणी वाद पेटण्याची शक्यता

नवी दिल्ली: भारत आणि पाकिस्तान दरम्यान पाण्यावरुन तिढा वाढण्याची शक्यता आहे. भारत आणि पाकिस्तानमध्ये ५९ वर्षांपूर्वी सिंधू नदीच्या पाणीवाटपाचा करार झाला. दरम्यान, सदर कराराचं उल्लंघन होत असल्याचा आरोप अनेक दिवसांपासून दोन्ही देश एकमेकांवर करत आहेत. त्यामुळे लवकरच हा वाद विकोपाला जाण्याची शक्यता राजकीय विश्लेषकांनी दिली आहे. तसेच लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने सत्ताधारी सुद्धा प्रतिष्ठेचा करणार यात शंका नाही.
सध्या पाकिस्तानात सुद्धा पाणी प्रश्न अतिशय गंभीर झाला आहे. विशेष म्हणजे पाकिस्तानची आर्थिक राजधानी असलेल्या कराचीजवळच्या भागात स्थानिकांना पाण्यासाठी मोठी पायपीट करावी लागते. तसेच भारतातील सीमारेषेवर काही वेगळी परिस्थिती नाही. धक्कादायक म्हणजे भारतातील तब्बल तीन-चतुर्थांश लोकांच्या घरांमध्ये पिण्यासाठी आवश्यक असलेले स्वच्छ पाणी उपलब्ध नाही. त्यात उपलब्ध पाण्यापैकी ७० टक्के पाणी हे प्रदूषित झालं आहे, अशी आकडेवारी भारत सरकारच्या अहवालात समोर आली आहे.
तत्पूर्वी भारत आणि पाकिस्तान या दोन देशांदरम्यान १९ सप्टेंबर १९६० रोजी सिंधू जल करार अस्तित्वात आला होता. त्यावेळी जागतिक बँकेच्या मध्यस्थीनं हा करार प्रत्यक्षात अंमलात आला होता. दरम्यान, याच कराराचं आता दोन्ही देशांकडूनच उल्लंघन होत असल्याचा दोन्ही देश परस्परांवर करत आहेत. त्यात सध्या भारताकडून चिनाब नदीवर जलविद्युत प्रकल्पाचं काम जोरात सुरू आहे. नेमका त्या कामावरच आता पाकिस्ताननं आक्षेप घेत आहे. त्यामुळे भारताकडून सिंधू जल कराराच उल्लंघन सुरू असल्याचा कांगावा करत पाकिस्ताननं थेट पाणी पुरवठ्यावर परिणाम होईल, अशी भीती पाकिस्तानने व्यक्त केली आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं