जागतिक बँकेच भारतातील जीएसटी करप्रणालीवर प्रश्नचिन्ह

नवी दिल्ली : केवळ विरोधकांनीच नव्हे तर आता खुद्द जागतिक बँकेनेच (वर्ल्ड बँक) भारतातील जीएसटी करप्रणालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. भारतातील जीएसटी करप्रणाली ही सर्वात किचकट करप्रणाली असल्याचा शेरा वर्ल्ड बँकेने मारल्याने मोदी सरकारची चांगलीच अडचण झाली आहे.
जागतिक बँकेने प्रसिद्ध केलेल्या एकूण ११५ देशांच्या करप्रणालीत भारत दुसऱ्या क्रमांकावर असल्याचे सांगण्यात आले आहे. जागतिक बँकेच्या त्या करप्रणालीबाबतच्या अहवालात भारतातील जीएसटी करप्रणालीला सर्वात किचकट करप्रणाली असल्याचे नमूद केलं आहे.
भारतात जुलै २०१७ मध्ये जीएसटी संपूर्ण देशात लागू करण्यात आला ज्यामध्ये एकूण ५ स्लॅब आहेत. त्यातील रिफंड देण्याच्या प्रक्रिया मंदावल्याने वर्ल्ड बँकेने अहवालात चिंता व्यक्त केली आहे. कारण रिफंड मिळण्याला उशीर होतो आणि परिणामी उद्योगाचे अर्थकारण गडबडून त्याचा थेट दुष्परिणाम उद्योगावर होतो असा शेरा सुद्धा वर्ल्ड बँकेने अहवालात मारण्यात आला आहे आणि जीएसटी प्रणालीत सुधारणा करावी आणि टॅक्स स्लॅब कमी करून प्रक्रिया सुटसुटीत करावी असा सल्ला सुद्धा वर्ल्ड बँकेने भारत सरकारला दिला आहे.
जागतिक बँकेच्या या जीएसटी कारप्रणालीमधील शेऱ्याने मोदी सरकार आता काय उपाययोजना करते या कडेच सर्वांचे लक्ष आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं