BREAKING | राज्यातल्या इंग्रजी माध्यमांच्या शाळांचा 25% शुल्क कपातीचा निर्णय

मुंबई , ०८ जुलै | महाराष्ट्राच्या इंग्लिश स्कूल ट्रस्टी असोसिएशने असा निर्णय घेतला आहे की कोरोनाच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक शुल्कात 25% कपात केली जाईल. यामुळे राज्यभरातल्या सुमारे 18,000 इंग्रजी शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या पालकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
कोरोनामुळे पालक गमावलेल्यांना देणार मोफत शिक्षण:
इंग्लिश स्कूल ट्रस्टी असोसिएशने शाळा शुल्कात कपात करण्याच्या निर्णयासोबतच असाही निर्णय घेतला आहे की कोरोनाच्या या संकटाच्या काळात ज्या विद्यार्थ्यांच्या पालकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे अशा विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये मोफत शिक्षण दिले जाणार आहे.
कोरोनामुळे आर्थिक स्थैर्य गमावलेल्या पालकांची मागणी:
कोरोनाच्या या जागतिक संकटामुळे अनेक लोकांना आपल्या नोकऱ्या गमवाव्या लागल्या आहेत किंवा त्यांच्या व्यवसायावर वाईट परिणाम झाला आहे. यामुळे त्यांच्या कुटुंबाचे आर्थिक स्थैर्य नाहीसे झाले आहे. या परिस्थितीचा विचार सामान्य नागरिकांच्या दृष्टिकोनातून करता सर्वच शाळांनी आपल्या शुल्कात कपात करावी अशी मागणी पालकवर्गाकडून केली जात होती. त्याला प्रतिसाद देत इंग्रजी माध्यमांच्या शाळांनी आपल्या शुल्कात 25% कपात करण्याचा निर्णय घेतला आहे.
महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.
News Title: English medium schools from Maharashtra decided to cut down fees by 25 percent news updates.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं