महत्वाच्या बातम्या
-
वाढता कोरोना संसर्ग | ICSE बोर्डाकडूनही दहावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय
देशातील वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर काउंसिल फॉर द इंडियन स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशन्स (ICSE board) बोर्डाने अखेर दहावीची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. तर बारावीची परीक्षा ही ऑफलाईन पद्धतीनेच होईल. या परीक्षेची नवी तारीख आणि वेळापत्रक आणखी काही दिवसांनी जाहीर करण्यात येईल, असे ICSE बोर्डाकडून सांगण्यात आले.
4 वर्षांपूर्वी -
कोरोना आपत्ती | डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठाच्या सर्व परीक्षा पुढे ढकलल्या
डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या बी.ए, बीएस्सी व बीकॉमसह अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या परीक्षा २ मे पर्यंत स्थगित करण्यात आल्या आहेत. तसेच इतर अभ्यासक्रमाची परीक्षाही २७ एप्रिलऐवजी ५ मे पासून सुरू होणार आहे.
4 वर्षांपूर्वी -
CBSE बोर्डाच्या १०वीच्या परीक्षा रद्द तर १२वीच्या परीक्षा लांबणीवर
CBSE बोर्डाच्या १०वी आणि १२वीच्या परीक्षेसंदर्भात केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. १०वीच्या परीक्षा रद्द केल्या असून १२वीच्या परीक्षा लांबणीवर टाकल्या आहेत. दरम्यान, १०वीच्या विद्यार्थ्यांनी दिलासा मिळाला असला तरी १२वीच्या विद्यार्थ्यांना मात्र परीक्षेतून पुर्ण सुटका मिळाली नाही आहे. आज (१४ एप्रिल) दुपारी १२ वाजता एक महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी शिक्षणमंत्री आणि इतर अधिकाऱ्यांसोबत चर्चा करण्यात आली. दरम्यान, कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता मे महिन्यात होणाऱ्या सीबीएसई बोर्डाच्या दहावी आणि बारावीच्या परीक्षा रद्द करण्याची मागणी जोर धरत होती.
4 वर्षांपूर्वी -
BREAKING | इयत्ता पहिली ते आठवी परीक्षा रद्द | विद्यार्थ्यांना थेट पुढील वर्गात प्रवेश - राज्य सरकार
महाराष्ट्रात शुक्रवारी कोरोनाच्या रुग्णसंख्येने कहर केला. गेल्या २४ तासांत राज्यांत तब्बल ४७,८२७ नवीन काेरोना रुग्ण वाढले आहेत. ही काेरोना महामारी सुरू झाल्यापासूनची उच्चांकी संख्या आहे. राज्यातील एकूण रुग्णसंख्या २९ लाख ४,०७६ वर पाेहोचली आहे. सक्रिय रुग्णांची संख्याही ३ लाख ८९,८३२ वर गेली आहे. गुरुवारी २०२ रुग्णांचा मृत्यू झाला. एकूण मृतांची संख्या ५५,३७९ झाली आहे. दुसरीकडे, दिवसभरात २४,१२६ रुग्ण बरे हाेऊन घरीही परतले.राज्यातील एकूण कोरोनामुक्तांचा आकडा आता २४ लाख ५७,४९४ झाला आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८४.६२ टक्क्यांवर आले आहे. राज्याचा मृत्युदर १.९१% इतका आहे.
4 वर्षांपूर्वी -
HSC Board Exams 2021 | 3 एप्रिलपासून 12'वी च्या विद्यार्थ्यांना हॉलतिकीट ऑनलाईन उपलब्ध
महाराष्ट्र राज्य बोर्डाच्या 12 वी च्या विद्यार्थ्यांना 3 एप्रिलपासून परीक्षेचे हॉलतिकीट ऑनलाईन उपलब्ध येणार आहे. सर्व कनिष्ठ महाविद्यालयं महाराष्ट्र राज्य बोर्डच्या www.mahahsscboard.in या अधिकृत संकेतस्थळावरुन हॉलतिकीट डाऊनलोड करु शकतील. यासाठी त्यांना शाळा/महाविद्यालयांचा लॉगईन आयडी (Login ID) वापरावा लागेल.
4 वर्षांपूर्वी -
...तर १० वी आणि १२ वीच्या विद्यार्थ्यांना जूनमध्ये परीक्षा देता येणार
१०वी आणि १२वीच्या विद्यार्थ्यांना आणि पालकांना मोठा दिलासा देणारी बातमी आहे. कोरोनामुळे १०वी आणि १२वीचे जे विद्यार्थी आता परीक्षा देऊ शकणार नाहीत, त्यांच्यासाठी जूनमध्ये विशेष परीक्षा घेणार असल्याची माहिती शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे. विद्यार्थी कोरोनाबाधित असेल, विद्यार्थ्यांच्या घरात, परिसरात कोरोना रुग्ण असतील आणि तो राहत असलेला विभाग सील केला असेल तर अशा विद्यार्थ्यांना सध्या घोषित केलेल्या तारखेला दहावी तसेच बारावीची परीक्षा देता येणार नाही. या विद्यार्थ्यांसाठी जूनमध्ये विशेष परीक्षा घेतली जाणार आहे, अशी माहिती वर्षा गायकवाड यांनी दिली.
4 वर्षांपूर्वी -
१० वी आणि १२ वीच्या विद्यार्थ्यांसाठी | सरावासाठी प्रश्नसंच इथं ऑनलाईन उपलब्ध
दहावी, बारावीच्या परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी पालक व विद्यार्थ्यांकडून होत असताना राज्य शिक्षण मंडळाने शुक्रवारी दहावी , बारावीच्या परीक्षेचे अंतिम वेळापत्रक जाहीर केले. त्यानुसार बारावीची परीक्षा २३ एप्रिल ते २१ मे तर दहावीची परीक्षा २९ एप्रिल ते २० मे दरम्यान होणार आहे. त्यासाठी, विद्यार्थ्यांची तयारीही सुरू झाली आहे. दरम्यान, विद्यार्थ्यांना सरावासाठी प्रश्नसंच ऑनलाईन उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. स्वतः शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी या संदर्भात अधिकृत माहिती दिली आहे.
4 वर्षांपूर्वी -
ITI विद्यार्थ्यांना 28 हजारांपर्यंत शुल्क प्रतिपूर्ती मिळणार | ऑनलाइन अर्ज करण्याचे आवाहन
शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील (आयटीआय) पीपीपी योजनेंतर्गत उपलब्ध जागांवर प्रवेश घेणाऱ्या तसेच खासगी आयटीआयमधून शिल्पकारागीर प्रशिक्षण योजनेंतर्गत अभ्यासक्रमांसाठी केंद्रीय ऑनलाइन पद्धतीने प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रशिक्षण शुल्क प्रतिपूर्तीचा लाभ देण्यात येतो. या योजनेतून २८ हजार ८०० रुपयांपर्यंत प्रशिक्षण शुल्क प्रतिपूर्तीचा लाभ देण्यात येत असून चालू शैक्षणिक वर्ष २०२०-२१ मध्ये प्रथम आणि द्वितीय वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी यासाठी ऑनलाइन अर्ज करावेत, असे आवाहन कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता मंत्री नवाब मलिक यांनी केले आहे.
4 वर्षांपूर्वी -
इंजिनिअर व्हायचंय? | बारावीला गणित-भौतिकशास्त्र न घेताही इंजिनिअर होता येणार
अभियांत्रिकीच्या अभ्यासक्रमाला प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या पण गणित विषय न आवडणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने (AICTE ) बारावीला गणित (Maths) आणि भौतिकशास्त्र (Physics) विषय न घेणाऱ्या विद्यार्थ्यांनाही अभियांत्रिकीच्या अभ्यासक्रमाला प्रवेश देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे लाखो विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
4 वर्षांपूर्वी -
ऑनलाईन परीक्षा | इंटरनेट नेटवर्कसाठी गोंदियातील विद्यार्थ्यांची छत्तीसगढ सीमेपर्यंत धाव
देशातील ग्रामीण भागाच्या अनेक पट्ट्यांमध्ये इंटरनेटचा अभाव असल्याने विद्यार्थ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो. त्यात अनेक ठिकाणी दयनीय अवस्था असल्याचं पाहायला मिळतंय. कारण त्याचा थेट परिणाम शिक्षणावर होताना दिसत असला तरी सरकारी यंत्रणांना त्याचं गांभीर्य नाही असंच म्हणावं लागेल.
4 वर्षांपूर्वी -
MBBS Final Year Exam | ८ मार्चपासून परीक्षा ऑफलाईनच होणार
देशभरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना ८ मार्च पासून MBBS अंतिम वर्ष परीक्षेला सुरुवात होत आहे. विशेष म्हणजे अनेक विद्यार्थ्यांनी ही परीक्षा ऑनलाइन पद्धतीने घ्यावी अशी मागणी विद्यापीठ व वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांच्याकडे वारंवार केली होती. परंतु, या परीक्षा ऑनलाइन घेणे शक्य नसून राज्यातील अनेक असे केंद्र, महाविद्यालय आहेत जिथे इंटरनेट कनेक्टिव्हिटी नाही.
4 वर्षांपूर्वी -
शिक्षण मंडळाचा महत्वाचा निर्णय | 8 लाख विद्यार्थ्यांना मिळणार 21.36 कोटी परत
दुष्काळ आणि नैसर्गिक संकट आदींमुळे राज्यातील काही जिल्ह्यातील विद्यार्थ्यांच्या परीक्षेची शुल्क माफी करण्याचा निर्णय तत्कालीन सरकारने घेतला होता. मात्र त्यासाठी ज्या विद्यार्थ्यांनी शुल्क भरले, त्यांना त्यांची रक्कम ही परत देण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. यासाठी विद्यार्थ्यांची बँक खाती अथवा इतर काही पर्याय आहेत, याचीही माहिती घेऊन ती परत केली जाणार असल्याचे मंडळाकडून कॉप्स या संस्थेचे पदाधिकारी अमर एकाड यांना एका पत्राद्वारे कळविले आहे.
4 वर्षांपूर्वी -
Breaking | दहावी, बारावीच्या परीक्षेची तारीख अखेर जाहीर | शिक्षण मंत्र्यांची माहिती
कोरोना संसर्गामुळे यंदाच्या शैक्षणिक वर्षात काही अडसर निर्माण झाले. परंतु, यावर देखील मात करुन यंदा दहावी आणि बारावीच्या परीक्षा नेहमीच्या पद्धतीनेच, मात्र काहीशा उशिराने घेतल्या जाणार आहेत. राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी इयत्ता १० वी आणि १२ वीच्या परीक्षांची तारीख अखेर आज अधिकृतपणे जाहीर केली आहे.
4 वर्षांपूर्वी -
JEE Exam Updates | मुख्य परीक्षेसाठी १२'वीत 75 टक्के गुणांची अट रद्द
जेईई मुख्य परीक्षेसाठी किमान ७५ टक्के गुणाच्या अटीतून विद्यार्थ्यांना सूट देण्यात आली आहे. बारावी परीक्षेत कमीतकमी ७५ टक्के गुण घेण्याची अट या वर्षी लागू होणार नसल्याची माहिती केंद्रीय मंत्री रमेश पोखरियाल यांनी दिली आहे. आयआयटी जेईईसाठी घेतलेला निर्णय आणि मागील शैक्षणिक वर्षासाठी घेतलेल्या निर्णयाच्या अनुषंगाने, शिक्षण मंत्रालयाने पुढील शैक्षणिक वर्ष २०२१-२२ साठीच्या संयुक्त प्रवेश परीक्षा (मुख्य) साठी इयत्ता बारावीमध्ये किमान ७५ टक्के गुण मिळविण्याचे पात्रता निकष शिथिल केले आहेत. एनआयटी, आयआयआयटी, एसपीए आणि इतर सीएफटीआयशी संबंधित प्रवेश जेईई (मुख्य) वर आधारित आहेत.
4 वर्षांपूर्वी -
...या तारखेपासून राज्यातील पाचवी ते आठवीचे वर्ग सुरू होणार
कोरोनाचा फैलाव सुरू झाल्यापासून लॉकडाऊनच्या नियमांमुळे बंद असलेल्या राज्यातील शाळा आता हळूहळू सुरू होत आहे. आधी नववी, दहावी, बारावीचे वर्ग सुरू झाल्यानंतर आता पाचवी ते आठवीचे वर्गही सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. राज्यातील पाचवी ते आठवीचे वर्ग २७ जानेवारीपासून सुरू होणार आहेत. याबाबतची माहिती शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे.
4 वर्षांपूर्वी -
प्राध्यापिका रोहिणी गोडबोलेंना फ्रान्स सरकारचा मानाचा 'नॅशनल ऑर्डर ऑफ मेरिट' पुरस्कार
फ्रान्स सरकारने भारतीय भौतिकशास्त्रज्ञ आणि प्राध्यातिका रोहिणी गोडबोले यांचा ‘नॅशनल ऑर्डर ऑफ मेरिट’ हा बहुमानाचा पुरस्कार देऊन गौरव केला आहे. मूळच्या पुण्याच्या असणार्या रोहिणी गोडबोले यांना भारत आणि फ्रान्स यांच्यातील संयुक्त संशोधन प्रकल्पांसोबत मूलभूत विज्ञान संशोधनात महिलांचे प्रमाण वाढावे, यासाठी दिलेल्या योगदानासाठी या सर्वोच्च पुरस्काराने गौरवण्यात आले आहे.
4 वर्षांपूर्वी -
अॅमेझॉन अॅकॅडमी | E-learning Entry | JEE ते स्पर्धा परीक्षांची ऑनलाईन तयारी
अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये प्रवेशासाठी संयुक्त प्रवेश परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना मदत करण्यासाठी, अॅमेझॉन इंडियाने अॅमेझॉन अॅकॅडमी सुरू करण्याची घोषणा केली आहे. कंपनीने एका निवेदनात म्हटले आहे की, या ऑनलाइन व्यासपीठाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिक्षण सामग्री, लाइव्ह लेक्चरद्वारे जेईईसाठी नियमित तयारी करवून घेतली जाईल. तसेच गणित, भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्र यांचे विस्तृत मूल्यांकन उपलब्ध करुन दिले जाईल. अॅमेझॉन अॅकॅडमीची बीटा आवृत्ती व्हीबँड आणि गुगल प्ले स्टोअरवर विनामूल्य उपलब्ध असेल.
4 वर्षांपूर्वी -
GATE परीक्षेचं Admit Card आलं | असं करा डाउनलोड
भारतीय तंत्रज्ञान संस्था अर्थात आयआयटीमध्ये प्रवेशासाठीची गेट परीक्षा फेब्रुवारी महिन्यात 6, 7, 13 आणि 14 तारखेला होणार आहे. या परीक्षेसाठीची प्रवेशपत्रं मुंबई आयआयटीतर्फे आज (आठ जानेवारी) वेबसाइटवर उपलब्ध करण्यात आली आहेत. gate.iitb.ac.in या वेबसाइटवरून ती डाउनलोड करता येणार आहेत. ज्या उमेदवारांनी परीक्षेसाठी अर्ज केला आहे, त्यांना आजपासून ही अॅडमिट कार्डस् डाउनलोड करता येतील.
4 वर्षांपूर्वी -
मुंबईत १६२ खासगी इंग्रजी शाळा बेकायदा | ऍडमिशन पूर्वी माहिती घ्या
मुंबई महापालिकेच्या शिक्षण विभागाने शहरातील २०६ बेकायदा शाळांची यादी नुकतीच जाहीर केली. इंग्रजी माध्यमाच्या सर्वाधिक १६२ बेकायदा शाळा असल्याचे उघडकीस आले आहे. इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्यासाठी पालकांची धडपड सुरू असते. त्यामुळे पालकांची फसवणूक होण्याची शक्यता आहे. बेकायदा शाळा तातडीने बंद करा अन्यथा दंडात्मक कारवाई करण्यात येईल, अशी सूचना पालिकेने शाळा प्रशासनाला दिली आहे.
4 वर्षांपूर्वी -
SSC-HSC Exam Result | दहावी-बारावीच्या पुरवणी परीक्षेचा निकाल उद्या
महाराष्ट्र राज्य मंडळाने नोव्हेंबर आणि डिसेंबरमध्ये घेतलेल्या दहावी आणि बारावीच्या पुरवणी परीक्षेचा निकाल बुधवारी (२३ डिसेंबर) दुपारी एक वाजता ऑनलाइन जाहीर करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना www.mahresult.nic.in या संकेतस्थळाद्वारे निकाल पाहता येईल, अशी माहिती राज्य मंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली.
4 वर्षांपूर्वी