महत्वाच्या बातम्या
-
CBSE Board दहावीचा निकाल, टॉप ५ विभागांमध्ये पुणे चौथ्या स्थानी
CBSE बोर्डानं सोमवारी बारावीचे निकाल जाहीर केल्यानंतर आता आज दहावीचेही निकाल जाहीर केले आहेत. लॉकडाऊन आणि कोरोनामुळे उर्वरित परीक्षा रद्द केल्यानंतर CBSE बोर्डानं आज अखेर निकाल जाहीर केले आहेत. विद्यार्थी आपले निकाल CBSEच्या अधिकृत वेबसाइट cbse.nic.in, cbseresults.nic.in आणि results.nic.in वर पाहू शकतात.
5 वर्षांपूर्वी -
CBSE Board- उद्या दहावीचा निकाल जाहीर होणार
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ अर्थात सीबीएसई बोर्डाचा इयत्ता बारावीचा निकाल सोमवारी जाहीर झाला आहे. त्यानंतर आता सीबीएसई बोर्डाचा दहावीचा निकाल उद्या जाहीर होणार असल्याची माहिती मिळत आहे. मानव संसाधन विकास मंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी CBSE बोर्डाचा दहावीचा निकाल बुधवारी (15 जुलै) जाहीर होणार असल्याची माहिती दिली आहे. आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून त्यांनी याबाबतचे ट्विट केले आहे. cbse.nic.in, www.results.nic.in आणि www.cbseresults.nic.in या वेबसाईट्सवर विद्यार्थी निकाल पाहू शकतात.
5 वर्षांपूर्वी -
ICSE Board - १०वी आणि १२वी परीक्षांचे निकाल उद्याच जाहीर होणार
ICSE बोर्डाने दहावी आणि बारावी परीक्षांचे निकाल उद्याच घोषित होणार, असं जाहीर केलं आहे. द कौन्सिल फॉर इंडियन स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशन (CISCE) ने शुक्रवार १० जुलैला त्यांच्या वेबसाईटवर निकाल जाहीर होतील, असं सांगितलं आहे. result.cisce.org या बोर्डाच्या अधिकृत वेबसाईटवर उद्या दुपारी 3 वाजता निकाल जाहीर होईल, असं प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे.
5 वर्षांपूर्वी -
कुलगुरू, युसीजीसोबत चर्चा करूनच परीक्षा रद्द केल्या, ATKT'च्या विद्यार्थ्यांनीही दिलासा - उदय सामंत
विद्यापीठ अनुदान आयोगाने (युजीसी) अंतिम वर्षाच्या सप्टेंबर अखेरपर्यंत घेण्याचा आदेश काढला आहे. मात्र, युजीसीने दिलेल्या निर्णयानुसार महाराष्ट्रात सप्टेंबरपर्यंत परीक्षा घेणं अशक्य असल्याचं राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं.
5 वर्षांपूर्वी -
३० टक्के अभ्यासक्रम कमी करणार ; CBSE बोर्डाचा मोठा निर्णय
सीबीएसईने 2020-2021 सत्राच्या 9 वी आणि 12 वीच्या अभ्यासक्रमामध्ये जवळपास 30 टक्के अभ्यासक्रम कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. विविध शाळा व्यवस्थापन, पालक, राज्य, शैक्षणिक आणि शिक्षकांच्या सूचनांच्या आधारे हा निर्णय घेण्यात आला आहे. एनसीईआरटी आणि सीबीएसई बोर्डाच्या तज्ज्ञांच्या समितीने हा कोर्स तयार केला आहे. या वेळी पुनरावृत्ती झालेल्या विषयांना आणि इतर अध्यायांत समाविष्ट केलेले विषय दूर ठेवण्याची काळजी समितीने घेतली आहे. केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी ट्विट करुन याबाबत माहिती दिली.
5 वर्षांपूर्वी -
पालकांसाठी बुरे दिन! यावर्षी स्कूल बसचे दर १० ते १५ टक्क्यांनी वाढणार
स्कूल बस मालक संघटनेने वाढलेल्या महागाईचे कारण पुढे करत स्कूल बसच्या दरात आगामी शैक्षणिक वर्षापासून दहा ते पंधरा टक्के दरवाढीची घोषणा केली आहे. २०१९-२० या शैक्षणिक वर्षासाठी मालक संघटनेने जाहीर केलेल्या धोरणातून ही माहिती पुढे आली आहे. दरम्यान, संघटनेचे अध्यक्ष अनिल गर्ग यांनी सांगितले की, डिझेलसह बसचा विमा, कर्मचाऱ्यांचे वेतन, बसचा देखभाल खर्च वाढला आहे असं स्पष्ट केलं. याशिवाय मुंबईतील वाढत्या वाहतूक कोंडीमुळे बस मालकांच्या खर्चात वाढ झाली आहे. तसेच महाराष्ट्र शासनाने सुरक्षेच्या नावाखाली आणलेल्या नव्या नियमावलीमुळेही बस मालकांचे बजेट कोलमडले आहे. परिणामी, २०१९-२० या येत्या शैक्षणिक वर्षापासून स्कूल बससाठी दहा ते पंधरा टक्के दरवाढ केली जाईल.
6 वर्षांपूर्वी -
काय स्टाईलमध्ये! महाराष्ट्राच्या सांस्कृतिक मंत्र्यांची निवेदन स्वीकारण्याची नवी संस्कृती
राज्याच्या जवाबदार मंत्र्यांची अनेक असंस्कृत प्रकरणं समोर आल्याचे पहिले आहे. परंतु, विषय तेव्हाच गंभीर होतं जेव्हा राज्याचे सांस्कृतिक मंत्री स्वतःच्या असंस्कृत वागण्याचं सार्वजनिकरित्या प्रदर्शन मांडतात. सामान्य माणूस देखील एखाद्याची हात मिळवताना सुद्धा उभा राहून सभ्यतेचे दर्शन घडवतो.
6 वर्षांपूर्वी -
सुरतमध्ये खासगी शिकवणीच्या बसला भीषण अपघात, १० विद्यार्थ्यांचा मृत्यू
शाळेच्या सहलीवर गेलेल्या बसला भीषण अपघात झाला असून एकूण १० विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर या अपघातात तब्बल ६० विद्यार्थी जखमी झाले आहेत. जखमींना ताबडतोब जवळच्या इस्पितळात दाखल करण्यात आले आहे. महाराष्टाच्या सीमेलगत असलेल्या गुजरातच्या डांग जिल्ह्यातील ही घटना असल्याचे वृत्त आहे. डांग येथे तब्बल ३०० फूट दरीत ही शाळेची बस कोसळली आहे.
6 वर्षांपूर्वी -
पाढे शिकण्याची वेगळी पद्धत, सुंदर कल्पना - पढेगा इंडिया तो बढेगा इंडिया
पाढे शिकण्याची वेगळी पद्धत, सुंदर कल्पना – पढेगा इंडिया तो बढेगा इंडिया
7 वर्षांपूर्वी