HSC निकाल | बारावीसाठी 20:40:40 फॉर्म्युला | 3 वर्षांच्या गुणांवर निकाल | २ दिवसांत अंतिम निर्णय

मुंबई, २९ जून | राज्यातील इयत्ता १२ वीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा न घेता गुण देण्याचे सूत्र शिक्षण विभागाने निश्चित केले आहे. १० वी, ११ वी आणि १२ वीच्या अंतर्गत परीक्षा व प्रॅक्टिकलच्या आधारे हे गुण दिले जाणार असून त्यासाठी २०: ४०: ४० असा फॉर्म्युला निश्चित केल्याची माहिती आहे. कोरोनामुळे राज्यात यंदाच्या शैक्षणिक सत्रात परीक्षा होऊ शकलेल्या नाहीत. १० वी इयत्ता १२ वीच्या परीक्षा महाराष्ट्राने रद्द केल्याची घोषणा ३ जून रोजी केली होती.
त्यामुळे राज्याच्या शिक्षण विभागाने राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेला इयत्ता १२ वीच्या विद्यार्थ्यांना गुण देण्याबाबतचे सूत्र निश्चित करण्यास अभ्यास करण्यास सांगितले होते. त्यावर तज्ज्ञांच्या अनेक बैठका होऊन फाॅर्म्युला निश्चित झाल्याचे शिक्षण विभागातील सूत्रांनी सांगितले. इयत्ता १० वीचे २० टक्के गुण, इयत्ता १२ वीचे ४० टक्के गुण आणि इयत्ता १२ मधील अंतर्गत परीक्षा व प्रॅक्टिकल असे ४० टक्के गुण विचार घेतले जाणार आहेत.
या सूत्रानुसार महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळ निकाल जाहीर करेल. यासंदर्भातली शिक्षण विभागाची तयारी पूर्ण झाली आहे. मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून दोन दिवसांत शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड अंतिम निर्णय जाहीर करतील, अशी सूत्रांची माहिती आहे. राज्यात यंदा १२ वीचे १४ लाख विद्यार्थी आहेत. इयत्ता १० वी परीक्षा यंदा झालेली नाही. मात्र ११ वी प्रवेशासाठी स्वतंत्रपणे परीक्षा घेतली जाणार आहे. त्या परीक्षेसंदर्भात राज्याचे शिक्षण आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती काम करते आहे. त्याची माहिती आठवड्यात जाहीर केली जाणार आहे.
सीबीएसईच्या धर्तीवरच सूत्र:
राज्य सरकारने सीबीएसईच्या सूत्रात थोडा बदल करून नवे सूत्र निश्चित केले. केंद्रीय बोर्डाने त्यांच्या १२ वीच्या विद्यार्थ्यांसाठी १० वी (३०%, २४ थिअरी, २४ प्रॅक्टिकल गुण) ११ वी (३०%, २४ थिअरी, २४ प्रॅक्टिकल गुण) १२ वी (४०%, ३२ थिअरी, प्रॅक्टिकल ५२ गुण) असे सूत्र तयार केले.
महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा.
News Title: State education minister Varsha Gaikwad will announce the formula of passing of HSC exam news updates.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं