120 Bahadur Movie | वह 3000 थे...और हम? '120 बहादुर' आगामी सिनेमात झळकणार अभिनेता फरहान अख्तर, फोटो व्हायरल

120 Bahadur Movie | बॉलीवूड अभिनेता फरहान अख्तर याने त्याच्या कारकिर्दीत दमदार अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे. ‘भाग मिल्खा भाग’ या सिनेमामधून फरहान घराघरात पोहोचला. त्याचा हा चित्रपट ब्लॉकबस्टर ठरला होता. त्यानंतर बराच काळ फरहान रुपेरी पडद्यावरून गायब झाला होता. परंतु त्याने नुकताच 4 सप्टेंबरला सोशल मीडिया अकाउंटवर त्याच्या आगामी चित्रपटाचा एक पोस्टर पोस्ट केला आहे.
फरहानने पोस्ट केलेल्या या पोस्टरमध्ये त्याची मागील बाजू आणि अर्धाच चेहरा दिसत आहे. विशेष म्हणजे तो सैनिकाच्या वेशामध्ये पाहायला मिळतोय. हातामध्ये बंदूक, डोक्यावर सैनिकांची टोपी आणि समोर भला मोठा बर्फाच्छादित हिमालय प्रदेश असा सीन पोस्टरमध्ये पाहायला मिळतोय. त्याच्या या आगामी चित्रपटाचं नाव ‘120 बहादुर’ असं असून हा चित्रपट चीन आणि भारतामध्ये झालेल्या युद्धावर आधारित असल्याचा समजतोय. भारत आणि चीनदरम्यान 1962 साली झालेल्या रेझांग लाच्या युद्धावर हा चित्रपट आधारित असणार आहे.
फरहान अख्तरने आपल्या X अकाउंटवर पोस्ट शेअर करत लिहिलंय की,”मी मेजर शैतान सिंग पीव्हीसीच्या कुटुंबाचे मनापासून आभार व्यक्त करतो की त्यांनी माझ्यावर त्यांची भूमिका साकारण्यासाठी विश्वास ठेवला. तुमचं प्रेम आणि पाठिंबा असल्याबद्दल खूप खूप धन्यवाद”. अशा पद्धतीचं कॅप्शन अभिनेत्याने लिहिलं आहे.
View this post on Instagram
अभिनेत्याबद्दल सांगायचं झालं तर, फरहानने आतापर्यंत अनेक चित्रपट केले. ज्यामध्ये त्याने दिग्दर्शनापासून ते अभिनयापर्यंत सर्व कामे केली. त्याने आतापर्यंत दिल चाहता है, डॉन, लक बाय चांस, रॉक ऑन यांसारखे अनेक चित्रपट केले आहेत. दरम्यान त्याने एका युद्धावर आधारित ‘लक्ष्य’ हा सिनेमा देखील केला होता. त्यानंतर थेट सैनिकांच्या भूमिकेत फरहान आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्याचं हे पोस्टर पाहून नव्या चित्रपटाबद्दल आणखीन जाणून घेण्यासाठी प्रेक्षकवर्ग आतुर आहे.
News Title : 120 Bahadur Movie Bollywood Actor Farhan Akhtar 05 September 2024.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं