Amitabh Bachchan Birthday | मरीन ड्राईव्हच्या बाकड्यावर काही रात्र झोपून काढल्या, आज आहेत बॉलिवूडचे शहेनशहा - Marathi News

Amitabh Bachchan Birthday | बॉलीवूडचा शहेनशहा आणि दिग्गज कलाकार अभिनेते अमिताभ बच्चन यांचा आज 11 ऑक्टोबरला वाढदिवस आहे. अमिताभ बच्चन त्यांचं वय 82 वर्ष पूर्ण झालं असून, वयाच्या 82 व्या वर्षी देखील ते तितकेच सक्रिय आहेत.
अमिताभ बच्चन यांच्या वडिलांच नाव हरिवंशराय बच्चन असं असून ते एक प्रसिद्ध लेखक होते. लेखकाच्या या मुलाला बॉलीवूडचा बिग बी, शहेनशहा बनण्यासाठी प्रचंड खडतर प्रवास करावा लागला आहे. सिनेमांमध्ये काम करून हिरो बनण्याचं स्वप्न डोळ्यांमध्ये रुजवून थेट मुंबईला आलेल्या अमिताभ यांना चक्क मरीन ड्राइवर उंदरांमध्ये एका बाकड्यावर झोपून दिवस काढायला लागले होते. त्यांनी त्यांच्या जीवनावरील हा खडतर किस्सा एका मुलाखतीत सांगितला होता. हा किस्सा ऐकून तुमच्या अंगावर देखील काटा येईल.
मरीन ड्राईव्हच्या बाकड्यावर आणि उंदरांमध्ये राहून काढले दिवस :
अमिताभ यांनी एका मुलाखतीत सांगितलं की, माझ्याकडे राहण्यासाठी जागा नव्हती. तेव्हा मी मुंबईत आल्याबरोबर मरीन ड्राईव्हच्या बाकड्यावर काही रात्र झोपून काढल्या. तेव्हा तिथे भले मोठे उंदीर देखील होते. एवढे मोठे उंदीर मी पहिल्यांदाच पाहिले’. अशा पद्धतीचा जीवनातील एक थरारक किस्सा अमिताभ यांनी सांगितला होता. अमिताभ नायक बनण्याचं स्वप्न घेऊन 1960 साली मुंबईमध्ये आले होते. त्यांचा तिथपासून ते आत्तापर्यंतचा प्रवास सुरुवातीच्या काळात प्रचंड हालाकीचा होता. त्यानंतर अमिताभ यांना लागोपाठ भरपूर सिनेमे मिळत गेले आणि ते ठरले बॉलीवूडचे शहेनशहा.
या दोन तारखेला बिग बॉस करतात आपला वाढदिवस साजरा :
तुमच्यापैकी अनेकांना ही गोष्ट माहित नसेल की, अमिताभ बच्चन केवळ 11 ऑक्टोबर नाही तर, 2 ऑगस्टला देखील आपला वाढदिवस साजरा करतात. त्याचं कारण असं की, त्यांच्या बहुचर्चित कुली सिनेमाच्या शूटिंग दरम्यान ते प्रचंड जखमी झाले होते. यावेळी ते बंगळुरूमधील सेटवर होते. अमिताभ यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर रुग्णालया बाहेर त्यांच्या चाहत्यांनी प्रचंड प्रमाणात गर्दी केली होती. नंतर 2 ऑगस्टला अमिताभ यांना डिस्चार्ज मिळाला होता. चाहत्यांच्या प्रेमामुळे त्यांना उभारी मिळाली आणि म्हणूनच 2 ऑगस्टला देखील ते आपला वाढदिवस साजरा करतात.
अमिताभ आहेत 1,600 कोटींचे मालक :
मुंबईत आल्यावर फुटपाथवर झोपून दिवस काढणाऱ्या अमिताभ बच्चन यांच्याकडे सध्या 1,600 कोटींची संपत्ती आहे. अभिताभ यांनी त्यांच्या जीवनातील 400 रुपयांच्या कमाईचा देखील किस्सा सांगितला होता. अमिताभ 400 रुपये दरमहा पैसे कमावून एका खोलीमध्ये राहत होते. त्या खोलीत एकूण 8 जण राहत होते. हा किस्सा अमिताभ यांनी केबीसीच्या एका एपिसोडमध्ये सांगितला होता. म्हणजेच काय तर, तुमच्या मनगटात जिद्द आणि ध्येय गाठण्याची स्फूर्ती असेल तर, तुम्ही तुमच्या यशाला गाठू शकता.
Latest Marathi News | Amitabh Bachchan Birthday 11 October 2024 Marathi News.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं