अमृता खानविलकर व अक्षय बर्दापूरकर सुरु करणार 'प्लॅन-टी' कंपनी

मुंबई : कित्येकदा अनेकांमध्ये अशा कला आणि प्रतिभा असतात ज्या प्रेक्षकांसमोर येणे किंवा त्यांना योग्य असा प्लॅटफॉर्म मिळणे अत्यंत गरजेचे असते. त्यासाठीच अक्षय बर्दापूरकर आणि अमृता खानविलकर ‘प्लॅन टी’ नावाची कंपनी सुरु करणार आहेत. हि कंपनी महाराष्ट्रातल्या छुप्या प्रतिभेला (टॅलेंटला) बाहेर आणण्याचे काम करणार आहे. महाराष्ट्रात असे किती तरी तरुण आहेत ज्यांच्याकडे अभिनय, लेखन, दिग्दर्शन, अशा कला आहेत, परंतु त्यांच्याकडे एक भक्कम असा प्लॅटफॉर्म नाहीये.
हि कंपनी अशा तरुणांना हिंदी आणि मराठी सिनेसृष्टीत येण्यासाठी मदत करणार आहे. कितीतरी तरुणांमध्ये कला असते परंतु ती कला लोकांपासून वंचित असते. त्यांच्या कलेला वाव मिळवून देण्याचा काम आता अक्षय बर्दापूरकर आणि अमृता खानविलकर ‘प्लॅन टि’ या कंपनीमार्फत करणार आहेत. अक्षय बर्दापूरकर हा भारतातील सर्वात मोठा मराठी डिजिटल प्लॅटफॉर्म चालवितो. जेव्हा अमृता अक्षय ला भेटली तेव्हा तिला समजले कि अक्षय सुद्धा अशाच एका कार्यक्रमाच्या व्यवस्थापनासाठी आला आहे.
तेव्हा अमृता आणि अक्षय ने हातमिळवणी करून हि कंपनी सुरु करण्याचे ठरवले. महाराष्ट्रात असे कितीतरी कलाकार आहेत जे प्रेक्षक व निर्मात्यांपर्यंत पोहोचण्याची गरज आहे. मग तो हिंदी असो किंवा मराठी त्यांच्याकडे प्रतिभा आहे. परंतु मार्गदर्शक नाही आणि त्यांची प्रतिभा राष्ट्रीय आणि जागतिक पातळीवर नेण्यासाठी त्यांचे प्रतिनिधित्व करण्याऱ्या एजेन्सी सुद्धा नाहीत. अश्या कलाकारांसाठी अमृता आणि अक्षयने एकत्र येण्याचा निर्णय घेतला. हि कंपनी तरुण पिढीला नक्कीच लाभदायक ठरणार आहे. कारण त्यांच्या प्रतिभेला आता एक भक्कम प्लॅटफॉर्म मिळणार आहे. हि कंपनी करमणूक उद्योगाला देखील एका वेगळ्या शिखरावर नेण्याचे काम करणार आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं