फोर्ब्स इंडिया: दीपिका पदुकोण ठरली जगातली सुंदर महिला

मुंबई : फोर्ब्स इंडियाने नुकतीच १०० ग्लॅमरस आणि सुंदर सेलिब्रिटींची यादी जाहीर केली. या यादीमध्ये पहिल्या ५ अभिनेत्रींनमध्ये दीपिकाने स्थान मिळवले आहे. दीपिका पदुकोण हि बॉलिवुडमधल्या महागड्या अभिनेत्रीनपैकी एक आहे. तिच्या अभिनयाबरोबरच तिचे सौंदर्य सुद्धा वाखाणण्याजोगे आहे. दीपिकाने वर्ल्ड मोस्ट गॉरजियास वुमन २०१९ हा किताब आपल्या नावावर केला आहे.
नुकतच दीपिकाने छपाक या आपल्या आगामी चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण केले आहे. या चित्रपटाद्वारे दीपिका निर्मिती क्षेत्रात देखील पदार्पण करणार आहे. या चित्रपटात अँसीड हल्ल्यातुन बचावलेल्या लक्ष्मी अग्रवाल ची भूमिका दीपिका साकारणार आहे. या निमित्ताने दीपिका एका वेगळ्या रूपात प्रेक्षकांसमोर येणार आहे. हा चित्रपट १० जानेवारी २०२० ला प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. चेहरेपट्टी, वर्ण, रूप, उंची, अभिनय या सर्वच गोष्टीने परिपूर्ण अशी दीपिका वेगळ्या रूपात कशी प्रेक्षकांसमोर येते ते आता पाहायला मिळणार आहे. या तिच्या सौंदर्याचे रहस्य ती नियमित व्यायाम करणे असे सांगते.
याशिवाय दीपिका लग्नानंतर पती रणवीर सिंगसोबत ‘८३’ या चित्रपटात पाहिल्यांदा दिसणार आहे. हा चित्रपट भारतीय विश्वचषक विजयची कथा सांगणारा असून, १९८३ मध्ये कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली भारतीय क्रिकेट टीमने कसा जिंकला होता याबाबत आहे. यात रणवीर सिंग कपिल देव यांच्या मुख्य भूमिकेत असून दीपिका त्याला कशी साथ देते हे आता बघायचे आहे. याशिवाय आपल्या मिळलेल्या किताबांच्या जोरावर दीपिका आगामी किती प्रकल्प स्वीकारणार हे देखील बघायचे आहे. मात्र या किताबांच्या आधारे दीपिकाला सौंदर्य प्रसाधनांच्या आणखी जाहिराती नक्कीच करायला मिळणार आहेत.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं