Bhediya Box Office Collection | बॉक्स ऑफिसवर 'भेडिया'ची दमदार ओपनिंग, 1 दिवसात किती कोटींचा गल्ला?

Bhediya Box Office Collection | अभिनेता वरुण धवन आणि कृती सेनन यांच्या ‘भेडिया’ या सिनेमाने पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर 12 कोटींचा गल्ला जमवला असून शानदार ओपनिंग केली आहे. ट्रेलर रिलीज झाल्यापासून हा चित्रपट चर्चेत आहे. 25 नोव्हेंबर रोजी देशासह जगभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला लोकांचा सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. हा सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर त्याचं ओपनिंग बॉक्स ऑफिस कलेक्शन जाणून घेण्याची इच्छा सगळ्यांनाच असते. आज आम्ही तुम्हाला या चित्रपटाच्या कलेक्शनबद्दल सांगणार आहोत.
फर्स्ट डे कलेक्शन
वरुण धवन आणि कृती सॅनॉन हे दोघे बऱ्याच दिवसांनी एकत्र काम करताना प्रेक्षकांना दिसणार आहेत. हे दोघे शेवटचे २०१५ मध्ये शाहरुख खान आणि काजोलच्या दिलवालेमध्ये एकत्र दिसले होते. या दोघांव्यतिरिक्त अभिषेक बॅनर्जी आणि दीपक डोबरियाल यांनी या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. काही मीडिया रिपोर्टनुसार,’भेडिया’च्या अॅडव्हान्स बुकिंगच्या पहिल्याच दिवशी 30 हजार तिकिटांची विक्री झाली आहे. ‘भेडिया’ चित्रपटाचा टीझर, ट्रेलर आणि गाणी प्रेक्षकांना खूप आवडली.
चित्रपटाचे दिग्दर्शन
या चित्रपटाचे दिग्दर्शन अमर कौशिक यांनी केले आहे. कौशिक यांनी याआधी ‘स्त्री’ या कॉमेडी हॉरर सिनेमाचं दिग्दर्शन केलं होतं, ज्याला प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळालं आहे. सुमारे 60-70 कोटींच्या बजेटवर बनलेल्या स्त्री चित्रपटाचे पहिल्या दिवसाचे कलेक्शन जवळपास 7.48 कोटी होते. बजेटनुसार या सिनेमाचं ओपनिंग कलेक्शन चांगलं झालंय.
दृश्यम २ चीही क्रेझ
वरुण धवनचा भेडिया हा चित्रपट अशा वेळी प्रदर्शित झाला आहे जेव्हा अजय देवगणचा दृश्यम २ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर आधीच आपली छाप पाडत आहे. अशा परिस्थितीत वीकेंड म्हणजेच शनिवार आणि रविवारच्या कलेक्शननंतरच वरुणच्या सिनेमाचं भविष्य ठरणार आहे.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title: Bhediya Box Office Collection in focus check details on 26 November 2022.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं