Dhananjay Powar | बिग बॉस फेम धनंजय पोवार देतोय बिग बॉसमध्ये जाण्यासाठी ट्रेनिंग, गमतीशीर व्हिडिओ झालाय व्हायरल

Dhananjay Powar | बिग बॉसचे यंदाचे पर्व गाजवणारा रील स्टार धनंजय पोवार हा बिग बॉसमध्ये येण्याआधी देखील गमतीशीर रील व्हिडिओ बनवायचा. आता बाहेर आल्यानंतरही त्याने त्याचं मनोरंजित काम सुरू केलं आहे. त्याच्या आतापर्यंत अनेक व्हिडिओज सोशल मीडियावर वायरल झाल्या असून सध्याच्या घडीला आणखीन एक व्हिडिओ वायरल होत आहे. ज्यामध्ये तो सुप्रसिद्ध रील स्टार विष्णुप्रिया हिला बिग बॉसमध्ये जाण्यासाठी काय काय यावं लागतं याची ट्रेनिंग देत आहे.
विष्णुप्रिया ही एक tiktok एक्ट्रेस आहे. ‘खुदा की नायत है’ या गाण्यावर रील करून ती प्रचंड फेमस झाली. अनेक तरुण-तरुणी हुबेहूब तिच्यासारखीच रील बनवू लागले. अशा पद्धतीने फार कमी वेळात विष्णूप्रिया प्रचंड फेमस झाली. विष्णुप्रिया हीच लग्न देखील झालेलं आहे. आता ती धनंजय पोवार यांच्याबरोबर एक मजेशीर रील बनवताना दिसली आहे. या दोघांना सोबत पाहून अनेकांना आता प्रश्न पडला आहे की, हे दोघे एकमेकांना कसे काय ओळखतात.
दोघांनी केली मजेशीर रिल :
व्हिडिओमध्ये विष्णुप्रिया धनंजयला म्हणते की,’ दादा मला बिग बॉसमध्ये जायचंय. त्यानंतर धनंजय तिला म्हणतो हा हात बघितला का, सणकण कानाखाली देईल खाता येणार नाही एवढे दहाड दुखतील. त्यानंतर विष्णुप्रिया अतिशय बारीक तोंड करून म्हणते नको जाऊ. तर, धनंजय तिला म्हणतो असं बारीक तोंड करून गेलीस तर लोक एक्सेप्ट करतील का. विष्णुप्रिया विचारते मग, तर धनंजय म्हणतो अगं तिथं भांडायला लागतं. तितक्यात विष्णुप्रिया लगेचच पदर कमरेला खोचून नवऱ्याबरोबर कशी भांडते त्याचबरोबर फक्त जिभेने चराचरा कशी कापते हे सांगितलं आहे’. तर अशा पद्धतीचा हा गमतीशीर व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान वायरल झाला आहे.
दोघांचा व्हिडिओला चाहत्यांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे आणि मजेशीर कमेंट देखील केल्या आहेत.
View this post on Instagram
Latest Marathi News | Bigg Boss Marathi Dhananjay Powar 24 October 2024 Marathi News.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं