Bigg Boss Marathi Finale | 'आज की रात मजा हुस्न का', जानवी आणि बाईईईच्या मादक अंदाजामुळे बिबींचं घर पेटलं - Marathi News

Bigg Boss Marathi Finale | बिग बॉसच्या ग्रँड फिनालेला काही तास उरले आहेत. एकूण 70 दिवसांपर्यंत स्वतःचं स्थान टिकवून ठेवणारे बिग बॉसच्या घरातील टॉप 6 सदस्य अंकिता वालावलकर, सुरज चव्हाण, निक्की तांबोळी, अभिजीत सावंत आणि धनंजय पोवार या 6 फायनलीस्टने बिग बॉसच्या इतिहासात स्वतःचं नाव सुवर्ण अक्षरात प्रत्येकाच्या मनामनात कोरल आहे. आज रविवारी दिनांक ६ ऑक्टोबर २०२४ ला ‘बिग बॉस मराठीच्या पाचव्या पर्वाचा ग्रँड फिनाले पार पडणार आहे.
निक्की आणि जानवीचा मादक अंदाज :
बिग बॉसच्या ग्रँड फिनालेचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून. व्हिडिओ पाहूनच समजतंय की, यंदाचा बिग बॉसचा ग्रँड फिनाले साधासुधा नसणार आहे. निकी आणि जानवी या दोन स्वप्नसुंदरींनी ‘आज की रात मजा हुस्न का’ या नव्या गाण्यावर ताल धरला आहे. दोघींचाही हा मादक अंदाज पाहून प्रेक्षक भारावून गेले आहेत. जानवी डान्सची क्वीन आहे तिने बिग बॉसच्या घरात आत्तापर्यंत तिच्या डान्समधून अनेकांचे मनोरंजन केलं आहे.
सुरज आणि अभिजीतचा देखील परफॉर्मन्स :
केवळ निक्की आणि जानवीच नाही तर, अभिजीत आणि सुरज या दोघांचा देखील ग्रँड फिनालेला मोठा जल्लोष होताना पाहायला मिळणार आहे. दरम्यान आज रात्रीच्या भागात आपल्याला हा ग्रँड सोहळा पाहता येणार आहे. त्याचबरोबर बिग बॉसची ट्रॉफी घरी कोण घेऊन जाणार हे देखील आपल्याला आज रात्री समजणार आहे. गेल्या काही दिवसांपासूनच काउंटडाऊन सुरू झालं असून प्रेक्षक कोणत्या सदस्याला ट्रॉफीचा मान पटकावून देणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेलो आहे.
ग्रँड फिनालेला एका सदस्याला सोडून बाकी सर्वांना घरात एन्ट्री :
ग्रँड फिनालेचा आठवडा सुरू असताना कालच्या भागात घरातून बाहेर गेलेले सर्व सदस्य घरातील उर्वरित सदस्यांना भेटण्यासाठी आले होते. परंतु बिग बॉस यांनी आर्या जाधव यांना घरामध्ये बोलावलं नाही. आर्या सगळ्यांसोबत दिसली नाही त्यामुळे आर्य ची शिक्षा तिला चांगलीच भोवली अशा चर्चांना देखील उधाण आलं होतं. परंतु आज रात्रीच्या ग्रँड फिनालेच्या कार्यक्रमात आर्या जाधव हिला एन्ट्री मिळणार की नाही याकडे देखील अनेकांचे लक्ष लागलेलं आहे.
Latest Marathi News | Bigg Boss Marathi Finale 06 October 2024 Marathi News.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं