Brahmastra Collection | ब्रह्मास्त्रची 'विक्रमी' कमाई, चौथ्या दिवशीही कोटींचा गल्ला जमवला, बॉलिवूडचा दुष्काळही संपवला

Brahmastra Collection | अयान मुखर्जी दिग्दर्शित आलिया भट्ट आणि रणवीर कपूरचा ब्रह्मास्त्र चित्रपट 9 सप्टेंबर रोजी रिलीज झाला. या चित्रपटाने 2 दिवसांच्या कलेक्शनमध्ये KGF 2 आणि WAR चित्रपटाचे रेकॉर्ड मोडले आहे. दरम्यान, चित्रपटाने तीन दिवसात 100 कोटी क्लबमध्ये प्रवेश केला. चित्रपटाच्या आगाऊ बुकिंगमुळे स्पष्ट झाले होते की, ब्रह्मास्त्र चित्रपट पहिल्याच दिवशी विक्रमी कमाई करणार आणि तेच घडले. ब्रह्मास्त्र चित्रपट या वर्षातील सर्वाधिक ओपनिंग कमाई करणारा चित्रपट ठरला आहे. काही दिवसांपासून बॉयकॉटच्या ट्रेंडमुळे बॉलिवूडमधील दिग्गज चित्रपट करत नव्हते मात्र ब्रह्मास्त्र चित्रपटाने बॉलिवूडचा दुष्काळही संपवला.
चौथ्या दिवसाची कमाई
गेल्या तीन दिवसांच्या कलेक्शनमध्ये चित्रपटाने विक्रमी कमाई केली आहे. दरम्यान, चौथ्या दिवशी सुद्धा या चित्रपटाने चांगलाच गल्ला जमवला आहे त्यामुळे असे म्हणयला हरकत नाही की, हा चित्रपटचा थेअटरमधील मुक्काम वाढणार आहे. हिंदी पट्ट्यातील टक्केवारी थोडी कमी आहे मात्र गल्ला 14 ते 15 कोटींचा झाला आहे. उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशात या चित्रपटाने चांगली पकड ठेवली आहे तसेच सोमवारच्या कलेक्शनचा आकडा 118 कोटींवर पोहोचला आहे.
विकेंडची वाट पाहावी लागणार
9 सप्टेंबर रोजी रिलीज झालेला चित्रपटाने विक्रमी कमाई केली आहे. चित्रपटाच्या गल्ल्यामध्ये कमाई होतच आहे मात्र विकेंडची वाट पाहणे सध्या चालू आहे. विकेंडला चित्रपट कितीचा गल्ला करू शकतो हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title: Brahmastra Fourth Day Collection Checks details 13 September 2022.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं