Brahmāstra Movie Leaked | रिलीज झाल्याच्या काही तासांनंतरच 'ब्रह्मास्त्र' चित्रपट ऑनलाइन लीक, पहिल्या दिवशी 30 कोटींचा गल्ला

Brahmāstra Movie Leaked | रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांचा नुकताच आलेला ब्रह्मास्त्र चित्रपट जास्त वेळ सनेमागृहांमध्ये राहिला नाही. आता असं म्हणण्यामागील कारण काय असा तुम्हाला प्रश्न पडेल, याचं करण म्हणजे संपुर्ण काळजी घेऊनही चित्रपट लीक झाला आहे. सोशल मीडियावर रणबीर आणि आलियाच्या चित्रपटाचे चाहते भरभरून कौतुक करत आहेत. बीग बजेट चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहत होते, मात्र रिलीज झाल्याच्या काही तासांनंतरच चित्रपट ऑनलाइन लीक झाला. याबाबत माध्यमांमधून माहिती समोर येत आहे.
ब्रह्मास्त्र चित्रपटाची पुरेशी तयारी
दिल्ली उच्च न्यायालयाने कॉपीराइट उल्लंघनाबाबत स्टार इंडियाने दाखल केलेल्या दाव्याला परवानगी दिल्यानंतर 18 वेबसाइट्सना बेकायदेशीरपणे ‘ब्रह्मास्त्र’ स्ट्रीम करण्यापासून प्रतिबंधित करण्यात आले होते. ब्रह्मास्त्र बीग बजेट चित्रपटाची संपुर्ण तयारी करण्यात आली होती मात्र चित्रपट ऑनलाइन लीक झाला. आता याचा बॉक्स ऑफिसवर परिणाम होऊ नये याची निर्मात्यांना चिंता लागून राहिली आहे.
पहिल्या दिवशी किती कमाई केली
ब्रह्मास्त्र चित्रपटाने पहिल्या दिवशी 30 कोटींचा गल्ला जमवला आहे. दरम्यान, बॉलीवूड चित्रपटांना बॉक्स ऑफिसवर ज्या वाईट स्थितीचा सामना करावा लागला आहे, तो या चित्रपटामुळे दूर होऊ शकतो, असेही व्यापार विश्लेषकांचे म्हणणे आहे. ब्रह्मास्त्र चित्रपट हिंदी व्यतिरिक्त तामिळ, तेलगू, कन्नड आणि मल्याळम भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे.
चित्रपटामध्ये दिग्गज कलाकार
दरम्यान, बॉलिवूडच्या या बीग बजेट चित्रपटांमध्ये आपल्याला अनेक दिग्गज एकत्र दिसून येत आहेत. रणबीर, आलियाशिवाय अमिताभ बच्चन, मौनी रॉय आणि नागार्जुन यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. तसेच या चित्रपटामध्ये शाहरुख खानचा कॅमिओ पहायला मिळणार आहे.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title: Brahmastra movie leaked online on first day Checks details 11 September 2022.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं