Deepika Padukone Baby | दिपविर झाले आई-बाबा! दिपीकाने दिलाय गोंडस बाळाला जन्म, मुलगी की मुलगा? - Marathi News

Deepika Padukone Baby | बॉलीवूडची मस्तानी अभिनेत्री दीपिका पादुकोण ही दोन दिवसांआधी मुंबईच्या एच एन रिलायन्स फाउंडेशन हॉस्पिटलमध्ये भरती झाली होती. तब्बल दोन दिवसानंतर दीपिकाने एका गोंडस बाळाला जन्म दिला आहे. दीपिका आणि रणवीरच्या घरी छोटी बाहुली आली आहे. दोघांनाही गोंडस अशी मुलगी झाली आहे. दोघेही या दिवसाची अतिशय आतुरतेने वाट पाहत होते.
त्यांच्यासोबत समस्त प्रेक्षक परिवारदेखील दीपवीरच्या पोटी छोटा रणवीर येतोय की छोटी मस्तानी येतेय? अशा चर्चा रंगल्या होत्या. दरम्यान दीपिकाने आपल्याला मुलगी झाली आहे ही घोषणा सोशल मीडियामार्फत करून चहात्यांना आनंदाची गोड बातमी दिली आहे. दीपिकाच्या बाळाचा फोटो पाहण्यासाठी प्रेक्षकवर्ग आतुर झाला आहे.
रणवीर आणि दीपिकाला त्यांच्या तमाम फॅन्सने अभिनंदन करत कौतुकाचा वर्षाव केला आहे. त्याचबरोबर दोघांच्याही पोटात आनंद मावेनासा झाला आहे. विशेष म्हणजे दोन ते तीन दिवसांपूर्वी रणवीर आणि दीपिका सिद्धिविनायकाच्या मंदिरात दर्शन घेण्यासाठी गेले होते. त्यावेळी दीपिकाने साडी नेसली होती आणि पाहता पाहता गणेश चतुर्थीच्या दुसऱ्याच दिवशी दीपिका आई झाली.
View this post on Instagram
दीपिकाच्या फिल्मी गोष्टींबद्दल बोलायचं झालं तर कल्की या चित्रपटामध्ये दीपिका पाहायला मिळाली होती. दरम्यान येत्या दिवाळीमध्ये ‘सिंघम अगेन’ या चित्रपटामध्ये दीपिका दिसणार असल्याची माहिती समोर आली आहे. दीपिकाने आतापर्यंत सिनेसृष्टीला एकशे एक सिनेमे देऊन प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे.
Latest Marathi News | Deepika Padukone Baby 09 September 2024 Marathi News.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं