भाजपाकडून सैन्यदलाच्या शौर्याचा निवडणुकीसाठी गैरवापर: सिने दिग्दर्शकांचा आरोप

मुंबई: देशातल्या तब्बल शंभरपेक्षा अधिक सिनेमेकर्सनी भारतीय जनता पक्षाविरोधात मतदान करण्याचं आवाहन सामान्यांना केलं आहे. सदर विषयाला अनुसरून त्यांनी एक जाहीर निवेदन देखील प्रसिद्ध केलं आहे. आर्टिस्ट युनायटेड इंडिया अंतर्गत हे सर्व फिल्ममेकर्स एकत्र आलेत. प्रसिद्ध डॉक्युमेन्ट्री मेकर्स आनंद पटवर्धन यांच्यापासून जुजे फिल्मचा दिग्दर्शक मिरांशा नाईकपर्यंत जवळपास १११ लोकांनी भाजपा विरोधात मतदान करण्याच्या पत्रकावर स्वाक्षऱ्या केल्या आहेत.
भारतीय जनता पक्षाचे सरकार आल्यानंतर अभिव्यक्ती स्वातंत्र्याची जास्तीत जास्त गळचेपी व्हायला लागली असा खळबळजनक आरोप या सर्वांनी केला आहे. तसेच समाजात आणि विशेष करून हिंदू-मुस्लिमांमध्ये प्रचंड तेढ वाढवणे, मागासवर्गीयांवर होणारा अन्याय, शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे होणारे दुर्लक्ष आणि सेन्सॉरशीपच्या नावाखाली उगाच होणारी गळचेपी ही या आमच्या विरोधाची प्रमुख कारणं आहेत. सरकारच्या अशा अघोरी धोरणाविरोधात आवाज उठवणे हा गुन्हा ठरत आहे. असा आवाज उठवणाऱ्यांना देशद्रोही ठरवलं जातंय असं या कलाकारांचं म्हणणं आहे. भारतीय जनता पक्षाला रोखण्यासाठी लोकसभा निवडणूक ही अखेरची संधी आहे. त्यामुळे लोकांमध्ये जागृती करण्याची गरज असल्याचं आर्टिस्ट युनायटेड इंडियाचं म्हणणं आहे.
सर्वात महत्वाचं म्हणजे संबंधित पत्रकात भाजपा सरकारकडून सैन्यदलाच्या शौर्याचा केला जात असलेला गैरवापर यावर चिंता व्यक्त करण्यात आलीय. देशात उगाच युद्धाचं वातावरण तयार करणं, सांस्कृतिक आणि वैज्ञानिक संस्था नेस्तनाबूत करणे, देशात विज्ञानविरोधी वातावरण तयार करणे, ज्या व्यक्तींचा कला, संस्कृती आणि विज्ञानाशी काहीही संबंध नाही अशा लोकांना महत्त्वाच्या पदावर बसवणे आणि देशाचं हसू करुन घेणं.
कलात्मकतेवर खासकरुन सिनेमा आणि पुस्तकांवर बंदी किंवा सेन्सॉरशीप आणणं, जेणेकरुन लोकांना चांगल्या विचारांपासून परावृत्त करणे हे सर्व भारतीय जनता पक्षाचं सरकार आल्यापासून जाणीवपूर्वक होतंय असं या पत्रकात म्हटलं आहे. त्यामुळे भाजपाला रोखण्यासाठी लोकसभा निवडणूक ही अखेरची संधी आहे, असं आर्टिस्ट युनायटेड इंडियाचं म्हणणं आहे. त्यामुळे लोकांमध्ये जास्तीत जास्त जणजागृती करण्याची नितांत गरज आहे. याविरोधात आता आवाज उठवला नाही तर देश असंभवाच्या गर्तेत लोटला जाईल आणि होणारं नुकसान पिढ्यानपिढ्या भरु शकणार नाही असं आर्टिस्ट युनाएटेड इंडियाचं म्हणणं आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं