सारेगमप लिटिल चॅम्प्स सोबत रंगणार जागर लोकसंगीताचा | स्वरा जोशी सगळ्यांची लाडकी

मुंबई, २८ जून | सारेगमप लिटिल चॅम्प्सचे १४ दमदार स्पर्धक नुकतेच प्रेक्षकांच्या भेटीस आले आणि पहिल्याच आठवड्यात त्यांच्या टॅलेंटने सर्वांना थक्क केलं. छोटे गायक तसंच अतिशय उत्तम छोटे वादक देखील आपल्याला या पर्वात पाहायला मिळत आहेत. त्यांच्या सुरेख गाण्यांनी एक वेगळाच माहोल या लिटिल चॅम्प्सनी तयार केला. पहिल्याच आठवड्यात या स्पर्धकांच्या टॅलेंटची झलक पाहून या कार्यक्रमातील ज्युरी म्हणजेच रोहित राऊत, आर्या आंबेकर, मुग्धा वैशंपायन, प्रथमेश लघाटे आणि कार्तिकी गायकवाड या यांच्यासाठी परीक्षण करणं हे खूप अवघड असणार आहे हे मात्र नक्की.
पहिल्या आठवड्यातील या लिटिल चॅम्प्सच्या दमदार परफॉर्मन्सेस नंतर या आठवड्यात या मंचावर लोकसंगीताचा जागर होणार आहे. मुंबईची स्वरा जोशी म्हणजेच परीक्षकांचा लाडका रव्याचा लाडू हि आपल्या धमाकेदार परफॉर्मन्सने सगळ्यांना क्लीन बोल्ड करणार आहे. तिच्या ‘शेजारणीने बरं नाही केलं ग बया’ या गाण्याने सर्वांना मंचावर ताल धरायला भाग पाडलं. परीक्षक देखील तिच्या या गाण्याने खूपच प्रभावित झाले. स्वरासोबत बाकी स्पर्धकसुद्धा परीक्षक आणि प्रेक्षकांनादेखील येत्या आठवड्यात लोकसंगीताने मंत्रमुग्ध करून टाकण्यासाठी सज्ज आहेत.
महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा.
News Title: Folk music will be performed along with Saregampa little 2021 news updates.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं