हॉलिवूड सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीची ऑस्कर ट्रॉफी चोरली...

ऑस्कर पुरस्कार सोहळा संपल्यानंतर हॉलिवूड सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीची ऑस्कर ट्रॉफी चोरली गेली आणि चोरणाऱ्या इसमाने तीच ऑस्कर ट्रॉफी पुन्हा फेसबुकवर शेअर केल्याचा प्रकार घडला.
ऑस्कर पुरस्कार मिळणे हे सिनेसृष्टीतील प्रत्येक कलाकाराचे स्वप्न असतं. परंतु तोच मिळालेला पुरस्कार चोरीला गेल्याची घटना नुकत्याच पार पडलेल्या हॉलिवूड ऑस्कर पुरस्कार संपल्यानंतर घडली आहे.
नुकताच ९० वा ऑस्कर पुरस्कार सोहळा मोठ्या थाटा-माटात पार पडला. त्यातीलच एक पुरस्कार होता सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा जो फ्रान्सेस मॅकडोरमेंड हिला देण्यात आला. फ्रान्सेस मॅकडोरमेंड साठी हा क्षण म्हणजे स्वप्नच होते पण तीच हे स्वप्न लगेचच भंग पावलं. कारण ऑस्कर पुरस्कार सोहळा संपल्यानंतर हॉलिवूड सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीची ऑस्कर ट्रॉफी चोरली गेली आणि चोरणाऱ्या इसमाने तीच ऑस्कर ट्रॉफी पुन्हा फेसबुकवर शेअर केल्याचा प्रकार घडला.
तो इसम इतक्यावरच थांबला नाही तर त्याने फेसबुकवर शेअर करून त्यावर मला सर्वोत्कृष्ट संगीतासाठी ऑस्कर मिळाला असल्याची पोस्ट सुद्धा शेअर केली. त्या इसमा विरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करून त्याच्या पोस्टच्या आधारेच पोलिसांनी त्याच्या शोध घेऊन अटक केलं. त्यानंतर ती ट्रॉफी फ्रान्सेस मॅकडोरमेंडला परत सुपूर्द करण्यात आली. फ्रान्सेस मॅकडोरमेंडचा हा दुसरा ऑस्कर आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं