Ketaki Chitale | पोलिसांना पत्र पाठवून एखाद्यावर कोणती कलमं लावावी असं सांगता येतं? होय केतकीने तो प्रकार केला आहे

Ketaki Chitale | जितेंद्र आव्हाड आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी ठाण्याच्या विवियाना मॉलमध्ये हर हर महादेव या चित्रपटाचा शो बंद पाडला. यावेळी काही कार्यकर्त्यांनी चित्रपट बघायला आलेल्या प्रेक्षकाला मारहाणही केली होती. यानंतर जितेंद्र आव्हाड यांच्यासह कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी जितेंद्र आव्हाड, आनंद परांजपे यांच्यासह एकूण 12 जणांना अटक करण्यात आली. जितेंद्र आव्हाड यांना अटक झाल्यानंतर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी ठाण्यामध्ये आंदोलन केलं.
हर हर महादेव चित्रपटाविरुद्ध आंदोलन
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड हर हर महादेव चित्रपटाविरुद्ध केलेल्या आंदोलनामुळे चांगलेच अडचणीत आले आहेत. ठाण्याच्या वर्तकनगर पोलिसांनी जितेंद्र आव्हाड यांना आज दुपारी अटक केली, यानंतर आता त्यांना आजची रात्र पोलीस स्टेशनमध्येच घालवावी लागणार आहे. पोलीस सूत्रांनी याबाबतची माहिती दिली आहे. जितेंद्र आव्हाड यांना आज ठाणे न्यायालयात आणणार नाहीत, त्याऐवजी त्यांना उद्या न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. जितेंद्र आव्हाड यांना आज न्यायालयात हजर करण्याची शक्यता निर्माण झाल्यानंतर न्यायालयाच्या परिसरात पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला होता, पण आता हा बंदोबस्त कमी करण्यात आला आहे.
वादात केतकी चितळेने देखील उडी
आव्हाडांसह अनेकांवर या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय. या वादात आता अभिनेत्री केतकी चितळेने देखील उडी घेतलीय. केतकीच्या वकिलांनी पोलिसांना तसं पत्रदेखील पाठवलं आहे. सामूहिकरित्या हा हल्ला झालाय. त्यामुळे एक कट रचला गेल्याची शक्यता आहे. त्यामुळे विनयभंगाचं कलम पोलिसांनी का लावलं नाही?”, असं केतकीच्या वकिलांनी पोलिसांना पत्राद्वारे विचारलं आहे.
जितेंद्र आव्हाड यांच्यावर मारहाण प्रकरणी जे कलम लावण्यात आले आहेत ते लगेच जामीन मिळतील असे कलम लावण्यात आले आहेत. पण त्यामध्ये विनयभंगाचं कलम लावण्यात आलेलं नाही. विवियाना मॉलमध्ये चित्रपटगृहात ज्या प्रेक्षकाला मारहाण झाली त्यांच्या पत्नीसोबत जितेंद्र आव्हाडांच्या कार्यकर्त्यांनी गैरवर्तन केलं”, असा आरोप केतकी चितळेने केला आहे. त्यामुळे आव्हाडांविरोधात विनयभंगाचं कलम लावावं, अशी मागणी केतकी चितळेने केली आहे.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title: Ketki Chitale wrote a letter to police over arrest of NCP leader Jitendra Awhad check details on 11 November 2022.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं