VIDEO - लालबत्ती : वर्दीच्या मागचा खरा माणूस

मुंबई : २६ जुलै २०१९ रोजी कारगिल दिवसाच्या निमित्तावर रिलिझ झालेल्या लालबत्ती ह्या मराठी चित्रपट द्वारे मंगेश देसाई आणि मनोज जोशी असे दिग्गज अभिनेते मराठी पडद्यावर पुन्हा झळकले. गिरीश मोहिते दिग्दर्शित व संतोष सोनावडेकर निर्मित लालबत्ती ह्या चित्रपटात पोलिसांच्या आयुष्यात घडणाऱ्या दर रोजच्या घडामोडी व त्यांची अडीअडचणी अतिशय सुंदर रित्या दाखवले आहे.
२६/११ च्या भ्याड हल्ल्यानंतर मुंबई पोलिसांनी तय्यार केलेली नवीन टीम, क्विक रिस्पॉन्स टीम बद्दल ची कहाणी ह्या चित्रपटात दाखवली गेली आहे. पोलीस हे जनमानसात राहून सर्वांचे जीवन सुखी राहो म्हणून स्वतः किती बलिदान देत असतात ह्या विषयांवर पडदा उलगडणारी अशी कहाणी ह्या चित्रपटाची आहे. मंगेश देसाई या चित्रपटात प्रमुख भूमिकेत असून त्यांची साथ द्यायला भार्गवी चिरमुले, तेजस, रमेश वाणी, मीरा जोशी आणि अनिल गवस सारखे कलाकार आहेत.
आपल्या रोल बद्दल माहिती देत असताना मंगेश देसाई असे म्हणतात की, प्रत्येक अभिनेत्याला असा एक रोल करायला अभिमान वाटतो ज्या मध्ये त्याला पोलिसांच्या जवळ जाऊन त्यांच्या आयुष्याबद्दल माहिती करता येते. ह्या चित्रपटामध्ये त्यांची भूमिका एका अश्या पोलीस अधिकाऱ्याची आहे जो एकी कडे अतिशय शिस्तबद्ध असतो आणि दुसरी कडे अतिशय निर्मळ व प्रेमळ असतो. ह्या रोल च्या तय्यारी साठी त्यांनी ठाणे येथे क्विक रिस्पॉन्स टीम कडून ट्रेनिंग घेतली व आणखी खूप गोष्टी शिकून घेतल्या. ह्या रोल मधून लोकांना वर्दी च्या मागच्या माणसाची अनुभूती येईल.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं