Leo Movie Box Office | 'लिओ' चित्रपटाचा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ, प्रेक्षकांची तुफान गर्दी, 5 दिवसात 400 कोटींचा गल्ला

Leo Movie Box Office | ‘लिओ’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सातत्याने धुमाकूळ घालत आहे. या चित्रपटाने अवघ्या 5 दिवसात 400 कोटींचा गल्ला जमवला आहे. तसेच जगभरात खूप चांगले कलेक्शन करत आहे. हा चित्रपट १९ ऑक्टोबररोजी प्रदर्शित झाला होता.
2023 मधील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट
विजय तलापती यांच्या लिओ या चित्रपटाने आतापर्यंत जगभरात ४०० चा गल्ला जमवला आहे. त्यानुसार हा चित्रपट या वर्षातील आतापर्यंतचा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे. प्रदर्शनाच्या चौथ्या दिवशी या चित्रपटाने २०० कोटींची कमाई केली होती.
जाणून घ्या रोजचे कलेक्शन
लिओ हा या वर्षातील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे. अवघ्या 4 दिवसात या चित्रपटाने जगभरात 200 कोटींचा आकडा पार केला आहे. पहिल्या दिवशी चित्रपटाची कमाई गदर २ पेक्षा जास्त होती. पहिल्या वीकेंडमध्ये लिओने 181 कोटींपर्यंत बिझनेस केला आहे. यावर्षी ऑगस्टमध्ये प्रदर्शित झालेल्या ‘गदर २’ने पहिल्या वीकेंडमध्ये १३४.८८ कोटी रुपयांची कमाई केली होती. या अर्थाने विजय तलापथी यांच्या लिओ या चित्रपटाने ‘गदर २’ला मागे टाकले आहे.
#Leo hits 400 Cr Gross Worldwide in Flat 5 Days.
Eying lifetime biz in the range of ₹ 600 cr.
BLOCKBUSTER #ThalapathyVijay pic.twitter.com/9Ovh8TAefI
— Sumit Kadel (@SumitkadeI) October 24, 2023
या चित्रपटाचा बजेट?
250 ते 300 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये लिओ बनवण्यात आला आहे.
लिओ हा या चित्रपटाचा रिमेक आहे
लिओ हा ‘अ हिस्ट्री ऑफ व्हायलेन्स’चा भारतीय रिमेक आहे.
हा चित्रपट अनेक भाषांमध्ये प्रदर्शित झाला आहे
हा चित्रपट जगभरातील 20 हजारांहून अधिक स्क्रीन्सवर प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट तामिळ, तेलुगू, कन्नड आणि हिंदी मध्ये एकाच वेळी प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात तृषा, संजय दत्त, अर्जुन सर्जा, गौतम मेनन, प्रिया आनंद, मॅथ्यू थॉमस, मन्सूर अली खान यांच्या प्रमुख भूमिका आहेत.
News Title : Leo Movie Box Office 400 crore collection in 5 days 24 October 2023.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं