मराठी नाटकांची 'फोर्ब्ज' या जगप्रसिद्ध मासिकाने सुद्धा दखल घेतली

मुंबई : मराठी नाट्य श्रुष्टीसाठी एक अभिमानास्पद गोष्ट घडली आहे. कारण मराठी नाटकांची ‘फोर्ब्ज’ या जगप्रसिद्ध मासिकाने सुद्धा दखल घेतली असून त्यात भारतातील सर्वाधिक लोकप्रिय मराठी नाटकांची नावं ‘फोर्ब्ज’च्या यादीत झळकली आहेत.
संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांची पत्नी अवली तसेच विठ्ठलाची सहचारिणी रुक्मिणी यांच्यामधला भावपूर्ण संवाद रसिकांसमोर मांडणाऱ्या संगीत ‘देवबाभळी’ या नाटकांच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. ‘देवबाभळी’ या नाटकाची ‘फोर्ब्ज’ या जगप्रसिद्ध मासिकाने दखल घेतली आहे. भारतामध्ये सर्वाधिक लोकप्रिय होत असलेल्या नाटकांपैकी एक असा या मासिकात संगीत ‘देवबाभळीचा’ गौरव करण्यात आला असल्याने हा मराठी नाट्य श्रुष्टीसाठी अभिमानास्पद विषय ठरला आहे.
इतकंच नाही तर निपुण धर्माधिकारी दिग्दर्शित ‘अमर फोटो स्टुडिओ’ तसेच ‘इंदिरा’, ‘शिवाजी अंडरग्राउंड इन भीमनगर मोहल्ला’, ‘वाडा चिरेबंदी’ या नाटकांचेही ‘फोर्ब्ज’द्वारे कौतुक करण्यात आले आहे. विशेष म्हणजे तरुण नाटककार प्राजक्त देशमुख लिखित आणि दिग्दर्शित संगीत देवबाभळी या संगीत एकांकिकेने सुरुवातीला एका स्पर्धेच्या माध्यमातून रंगमंचावर पाऊल ठेवले होते. त्यानंतर स्पर्धेचे विजेतेपद पटकावल्यानंतर या नाटकाने काही महिन्यांपूर्वीच व्यावसायिक रंगभूमीवर सुद्धा पदार्पण केले होते. त्यानंतर अवघ्या काही महिन्यांतच या नाटकाने तब्बल १२५ प्रयोगांचा टप्पा पूर्ण केला. त्याची लोकप्रियता आणि विषयाचे सादरीकरण लक्षात घेऊन फोर्ब्जच्या मासिकाने जागतिक नाट्यकलेवर आधारित असलेल्या लेखामध्ये देवबाभळीची दखल घेतली आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं