मनोरंजनाची शिदोरी घेऊन आलाय नवा चित्रपट 'गर्लफ्रेंड'

मुंबई : एखादा चित्रपट आला कि तो परिवारासोबत पाहायचा कि नाही असा प्रश्न नेहमीच सर्वाना पडतो. कारण हल्ली पारिवारिक चित्रपट फार कमी पाहायला मिळतात. बऱ्याच दिवसांनी मराठीत एक असा चित्रपट आलाय जो तुम्ही मित्रमंडळी किंवा कुटुंबासोबत पाहू शकता. उपेंद्र सिधये लिखित आणि दिग्दर्शित ‘गर्लफ्रेंड’ हा चित्रपट सर्वानाच आपलासा वाटेल असा आहे.
अभिनेता अमेय वाघ आणि अभिनेत्री सई ताम्हणकर हे या चित्रपटात प्रमुख भूमिकेत पाहायला मिळणार आहेत. एका सिंगल मुलाच्या आयुष्याची कथा सांगणारा हा चित्रपट आहे. आजच्या धाकधकीच्या जीवनात कॉलेज संपवून सेटल होत असतानाच मित्र व आपला मैत्रीचा कट्टा देखील सांभाळत असतात हे या चित्रपटात दाखवला आहे. हल्लीची मुलं नोकरी शिक्षण या समवेत कस आपला आयुष्य सावरू पाहतात व त्यात त्यांना कोणत्या गोष्टींचा सामना करावा लागतो त्यांना कोणाकोणाची गरज असते याचा अंदाज मुळातच पालकांना नसतो. आपल्या पाल्याच्या आयुष्यात काय चालू आहे या पासून पालक थोडे अलिप्त असतात. हा चित्रपट आपल्या मुलांना समजून घेण्यासाठी पालकांना नककीच मदत करू शकतो.
मुलांच्या एखाद्या गोष्टीवर पालकांनी कस व्यक्त व्हावं परिस्तिथी कशी हाताळावी हे पालकांना या चित्रपटाद्वारे समजून घेता येईल. सध्याच्या काळात मुलं आपल्या पालकांपासून बहुतांश गोष्टी लपवून ठेवतात. मुलांचे आणि पालकांचे असे स्वतंत्र जग असते. पण या परिस्थितीत पालकांनी मुलांना कश्या प्रकारे समजून घ्यावे विश्वासात घेऊन वागावे हे गर्लफ्रेंड चित्रपटातून तुमच्यापर्यंत येणार आहे. ह्यूज प्रॉडक्शन आणि प्रतिसाद प्रॉडक्शन प्रस्तुत या चित्रपटात अमेय आणि सई सोबत इशा केसरकर, कविता लाड, उदय नेने, तेजस बर्वे, हे देखील आपल्याला पाहायला मिळणार आहेत. २६ जुलै ला हा चित्रपट प्रदर्शित झाला असून लोकांचा कसा प्रतिसाद या चित्रपटाला मिळतो ते आता बघायचे आहे. निखळ मनोरंजन आणि आपल्या प्रत्येकाच्या मनाला भावेल अशी अप्रतिम गोष्ट आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं