महत्वाच्या बातम्या
-
तुम्ही अमेरिकेत गेला आहात तर माझ्यासाठी शॉपिंग करा आणि माझ्यासाठी घेऊन या - राखी सावंत
पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या अमेरिकेच्या दौऱ्यावर आहेत. वॉशिंग्टनमध्ये पंतप्रधान मोदी यांनी शुक्रवारी अमेरिकेचे अध्यक्ष जो बिडेन यांच्याशी विशेष बैठक घेतली. या दरम्यान, दोघांनी या बैठकीत अनेक मुद्द्यांवर चर्चा केली. दुसरीकडे राखी सावंतचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चाहत्यांकडून मोठ्या प्रमाणात व्हायरल केला जातं आहे. या व्हिडिओमध्ये अभिनेत्री राखी सावंतने देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अमेरिकेतून स्वतःसाठी काहीतरी आणण्यास सांगितले आहे.
4 वर्षांपूर्वी -
खाडीत कार कोसळून अभिनेत्री ईश्वरी देशपांडे आणि प्रियकर शुभम देगडेचा मृत्यू
कॅलनगुट येथील खाडीत कार कोसळून पुण्यातील अभिनेत्री ईश्वरी देशपांडे व शुभम देडगे या प्रेमिकांचा मृत्यू झाला. सोमवारी पहाटे पाचच्या सुमारास पार्टी करून परतत असताना हा अपघात घडला. भरतीच्या वेळी खाडीत पाणी असल्याने दोघांचाही अपघातानंतर बुडून मृत्यू झाला.
4 वर्षांपूर्वी -
Bigg Boss Marathi 3 | उत्सुकता संपली, जाणून घ्या स्पर्धकांची नावं | इंटरटेन्मेंट अनलॉक
२१ जून रोजी बिग बॉस मराठी सिझन ३ ची घोषणा करण्यात आली. तेव्हापासून प्रेक्षकांमध्ये उत्सुकता लागून राहिली होती की हा सिझन कधी सुरू होणार व त्यातील स्पर्धक कोण असणार आहेत. काल १९ सप्टेंबर रोजी प्रेक्षकांची उत्सुकता संपली. बिग बॉस ३ चा ग्रँड प्रीमिअर सोहळा पार पडला. यामध्ये अधिकृतरीत्या पंधरा स्पर्धकांची नावे आपल्या समोर आली. ‘देवमाणूस’ या लोकप्रिय मालिकेत वकिलाचे पात्र साकारणाऱ्या सोनाली पाटीलचा बिग बॉसच्या घरामध्ये सर्वात आधी प्रवेश झाला.
4 वर्षांपूर्वी -
Javed Akhtar Vs Kangana Ranaut | अटक वॉरंटच्या शक्यतेने कंगना रणौत अंधेरी कोर्टात हजर
गीतकार जावेद अख्तर यांनी अभिनेत्री कंगना रणौत विरोधात मानहाणीचा दावा दाखल केला होता. याप्रकरणी कंगनाला वेळोवेळी नोटीस बजावली होती. त्यानंतरही ती कोर्टात हजर झाली नसल्याने तिला आज २० सप्टेंबरला कोर्टात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले होते. तसेच यावेळी न्यायालयात हजर न राहल्यास अटक वॉरंट काढू, असा सूचक इशारा तिला अंधेरी कोर्टाकडून देण्यात आला होता. त्यामुळे आज कंगना कोर्टात हजर झाली होती. यावेळी न्यायालयाने या प्रकरणाची सुनावणी 15 नोव्हेंबरपर्यंत तहकूब केली आहे.
4 वर्षांपूर्वी -
Kangana Ranaut Vs Javed Akhtar | कंगना आज न्यायालयात हजर न राहिल्यास तिच्या विरोधात अटक वॉरंट निघण्याची शक्यता
गीतकार जावेद अख्तर यांनी अभिनेत्री कंगना रणौत विरोधात मानहाणीचा दावा दाखल केला आहे. या प्रकरणी कंगनाला वेळोवेळी नोटीस बजावली आहे. त्यानंतरही ती कोर्टात हजर झाली नाही. त्यामुळे तिला आज २० सप्टेंबरला कोर्टात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. जर ती आज न्यायालयात हजर राहिली नाही तर आम्ही अटक वॉरंट काढू, असा अंधेरी कोर्टाकडून कंगणाला सूचक इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे आज कंगना कोर्टात हजर न राहिल्यास तिच्या विरोधात कोर्टाकडून अटक वॉरंट काढले जाण्याची शक्यता आहे.
4 वर्षांपूर्वी -
Bigg Boss Marathi 3 | ग्रँड प्रिमिअरला अवघे काही तास शिल्लक | हे आहेत संभाव्य स्पर्धक
बहुचर्चित ‘बिग बॉस मराठी’च्या तिसऱ्या पर्वाचा ग्रँड प्रिमिअर आज (19 सप्टेंबर) संध्याकाळी सात वाजता होणार आहे. आपल्या खास शैलीत ‘बिग बॉस मराठी’च्या घरातील सदस्यांची शाळा घेणारे दिग्गज अभिनेते-दिग्दर्शक महेश मांजरेकरच यंदाही सूत्रसंचालकाच्या भूमिकेत दिसणार आहेत. ‘कलर्स मराठी’वरील या धमाकेदार रिअॅलिटी शोचे शानदार प्रोमो प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेत आहेत. ‘बिग बॉस’च्या ((Bigg Boss Marathi 3)) घरात कोण दिसणार, याची चर्चा सोशल मीडियावर जोर धरु लागली आहे. ग्रँड प्रिमिअरला अवघे काही तास शिल्लक असताना काही संभाव्य स्पर्धकांची नावं समोर आली आहेत.
4 वर्षांपूर्वी -
Pornography Case | कुंद्राने बनवले होते 119 पॉर्न चित्रपट | 8.84 कोटीला विकायचे होते | आरोपपत्रात खुलासा
पॉर्न चित्रपट व्यवसायिक राज कुंद्राने 2 वर्षांत त्याच्या अॅपचे वापरकर्ते 3 पट आणि 8 पट नफा वाढवण्याची योजना आखली होती. राज कुंदाने आतापर्यत 119 पॉर्न चित्रपट बनवले असून त्याला हे चित्रपट 8.84 कोटी रुपयांना विकायचे होते. विशेष म्हणजे याप्रकरणी त्याच्या एका अॅपवर बंदीसुद्धा घालण्यात आली होती. परंतु, त्याने आणखी एक अॅप तयार केले.
4 वर्षांपूर्वी -
थलायवी चित्रपट | सिनेमागृह बंद असल्याने कंगनाने उद्धव ठाकरेंना म्हटले 'जगातील सर्वोत्तम मुख्यमंत्री'
बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. अलीकडेच अभिनेत्रींचा चित्रपट ‘थलायवी’ सिनेमागृहात प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात तिने तामिळनाडूच्या दिवंगत मुख्यमंत्री जयललिता यांची भूमिका साकारली होती. आता कंगना रणौतने मुंबईतील बंद सिनेमागृहांवरून महाराष्ट्र सरकारवर निशाणा साधला आहे.
4 वर्षांपूर्वी -
Pornography Case | पत्नी शिल्पा शेट्टी पती राज कुंद्राच्या विरोधात साक्षीदार | चार्जशीट दाखल
पॉर्नोग्राफी प्रकरणी अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती उद्योगपती राज कुंद्रा याच्या विरोधात मुंबई पोलिसांनी चार्जशीट दाखल केली आहे. या प्रकरणात शिल्पा शेट्टी साक्षीदार आहे. तसेच पोर्नोग्राफीबाबत वापरल्या जाणाऱ्या हॉटशॉट्स अॅपचा सूत्रधार राज कुंद्रा हाच असल्याचे आढळून आले आहे. यामुळे राज कुंद्राच्या अडचणी वाढल्या आहेत. दरम्यान या प्रकरणावर आज (16 सप्टेंबर) सुनावणी होण्याची शक्यता आहे.
4 वर्षांपूर्वी -
अभिनेता सोनू सूद आणि अरविंद केजरीवाल यांच्या भेटीनंतर सोनू सूद आयकर विभागाच्या रडारवर? | कार्यालयाची पाहणी
बॉलिवूड अभिनेता सोनू सूद याच्या मुंबई येथील कार्यालयाचे आयकर विभागाने सर्वेक्षण केले. सूदशी संबंधित खात्यांच्या पुस्तकांसोबत छेडछाड केल्याचा दावा आहे तेव्हापासून आयकर विभाग सोनूच्या मालमत्तांचे सर्वेक्षण करत आहे, अशी सुत्रांची माहिती आहे. आयकर विभागाने सोनू आणि त्याच्या कंपनीशी संबंध असलेल्या 6 जागांचे सर्वेक्षण केले आहे.
4 वर्षांपूर्वी -
Javed Akhtar Talked on Hindu | जगात सगळ्यांत सभ्य आणि सहिष्णू फक्त हिंदूच | हिंदुस्थान कधीच अफगाणिस्तान होऊ शकत नाही
प्रख्यात गीतकार जावेद अख्तर यांच्यावर राष्ट्रीय स्वयं सेवक संघाची तुलना तालिबान्यांशी केली असल्याचा आरोप करत देशभरातून जोरदार टीका करण्यात आली. मात्र जगात सगळय़ांत ‘सभ्य’ आणि सहिष्णू फक्त हिंदूच! हिंदुस्थान कधीच अफगाणिस्तान होऊ शकत नाही. कारण हिंदुस्थानी हे निसर्गतः कट्टरवादी नाहीत; नेमस्त असणे, मध्यममार्गी भूमिका घेणे हे त्यांच्या डीएनएमध्ये असल्याचे मत अख्तर यांनी व्यक्त केले आहे. यावेळी त्यांनी कोणत्याही धर्मात, जगातील कोपऱ्यात तालिबानी प्रवृत्तीचे लोक असू नयेत, असे परखड मतही मांडले आहे.
4 वर्षांपूर्वी -
BREAKING | कंगना रणौतला अटक वॉरंट जारी करण्याचा न्यायाधिशांचा इशारा
गीतकार जावेद अख्तर यांनी कंगनाच्या विरोधात मानहानी याचिका दाखल केली आहे. या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने कंगनाला न्यायालयात हजर राहण्याचा सल्ला दिला होता. मात्र आजही ती न्यायालयात दाखल झाली नाही. कंगना जर पुढील तारखेस हजर राहिली नाही तर तिला अटक वॉरंट जारी करण्यात येईल असा इशारा न्यायालयाने दिला आहे.
4 वर्षांपूर्वी -
मानहानी प्रकरण | कंगनाला धक्का | जावेद अख्तर यांच्याविरोधातील याचिका कोर्टाने फेटाळली
अभिनेत्री कंगना रणौतला मुंबई उच्च न्यायालयाकडून दिलासा मिळाला नाही. गीतकार जावेद अख्तर यांच्याविरोधात दाखल केलेली याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळली आहे. वकिल रिझवान सिद्दीकी यांनी न्यायालयात कंगनाची तर वकिल जय के भारद्वाज यांनी जावेद अख्तर यांची बाजू मांडली. मुंबई उच्च न्यायालयात न्यायमूर्ती रेवती डेरे यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली.
4 वर्षांपूर्वी -
संघाची तालिबानशी तुलना, जाहीर चर्चा करा नाही तर माफी मागा | नितेश राणेंचं जावेद अख्तरांना पत्रं
प्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची तुलना तालिबानशी केली होती. त्यावरून वादंग निर्माण झालं आहे. भाजपचे आमदार नितेश राणे यांनी अख्तर यांना पत्रं लिहून या मुद्द्यावर जाहीर चर्चा करा नाही तर जाहिररित्या माफी मागा, असं आव्हानच दिलं आहे. त्यामुळे जावेद अख्तर त्याला काय उत्तर देतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.नितेश राणे यांनी जावेद अख्तर यांना दोन पानी पत्रं पाठवलं आहे. त्यात त्यांनी अख्तर यांच्या संघाच्या तालिबानशी युती करण्याच्या मुद्द्याला आक्षेप घेतला आहे.
4 वर्षांपूर्वी -
अमृता फडणवीस यांचे नवे गाणे प्रेक्षकांच्या भेटीला | गणेशोत्सवानिमित्त गणेश वंदनेतून सामाजिक संदेश
भारतीय जनता पक्षाचे नेते आणि विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांचे नवीन गाणे प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. खास गणेशोत्सवानिमित्त अमृता फडणवीस यांनी हे गाणे गायले आहे . गाण्याचे नाव गणेश वंदना, असे आहे.
4 वर्षांपूर्वी -
आरएसएस, विहिंप आणि बजरंग दल सारख्या संघटनांचेही तालिबान सारखेच उद्दिष्ट - जावेद अख्तर
प्रसिद्ध कवी आणि गीतकार जावेद अख्तर (Javed Akhtar) यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची तुलना तालिबानशी केली असून, त्याचे समर्थन करणाऱ्यांनी आत्मपरीक्षण केले पाहिजे, असे म्हटले आहे. एका इंग्रजी वृत्तवाहिनीशी संभाषण करताना अख्तर म्हणाले की, आरएसएस, विहिंप आणि बजरंग दल सारख्या संघटनांचेही तालिबान सारखेच उद्दिष्ट आहे. ते म्हणाले की, भारतीय संविधान त्याच्या ध्येयाच्या मार्गात येत आहे, परंतु जर संधी मिळाली तर ते या सीमा देखील ओलांडतील.
4 वर्षांपूर्वी -
भाईजान'ला अडवणाऱ्या ASI वर CISF'कडून प्रोटोकॉल उल्लंघनाचा आरोप | मोबाईलही जप्त
अभिनेता सलमान खान नुकताच त्याच्या आगामी ‘टायगर 3’ या चित्रपटाच्या शूटिंगसाठी मुंबईहून रशियाला रवाना झाला. या दरम्यान मुंबई विमानतळावरून सलमानची काही छायाचित्रे आणि व्हिडिओ समोर आले होते, ज्यात सलमान खानला विमानतळावर सीआयएसएफच्या एका जवानाने चौकशीशिवाय आत जाण्यापासून रोखलेले दिसले. हा व्हिडीओ समोर आल्यानंतर सोशल मीडियावर प्रत्येकाने या सीआयएसएफच्या जवानाचे कौतुक केले. या CISF जवानाचे नाव सोमनाथ मोहंती आहे.
4 वर्षांपूर्वी -
महेश मांजरेकर मूत्राशयाच्या कर्करोगाने होते पीडित | यशस्वी शस्त्रक्रियेनंतर घरी परतले
मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते महेश मांजरेकर यांना काही दिवसांपूर्वी कर्करोग झाल्याचे निदान झाले होते. आता बातमी आहे की, अलीकडेच त्यांच्यावर यशस्वी शस्त्रक्रिया पार पडली. महेश मूत्राशयाच्या कर्करोगाने ग्रस्त होते. त्यानंतर डॉक्टरांनी त्यांच्यावर शस्त्रक्रिया केली. यशस्वी शस्त्रक्रियेनंतर महेश आता घरी परतले असून हळूहळू त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे.
4 वर्षांपूर्वी -
दरमहा 5 लाख कमवण्याचे अमीष देऊन 1.36 कोटी हडपले | शिल्पा शेट्टी व तिच्या आई विरुद्ध FIR दाखल
अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि तिची आई सुनंदा यांच्या विरोधात उत्तर प्रदेशच्या एका महिला उद्योजकाने फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. ज्योत्सना चौहान असे त्या महिलेचे नाव असून तिने दिव्य मराठीशी बोलताना आपबिती मांडली आहे. शिल्पा शेट्टी आणि आईन सुनंदा यांच्या कंपनीने आपली फसवणूक केल्याचा दावा तिने केला. ज्योत्सना सांगते, तिने शिल्पाच्या कंपनीत 1.36 कोटींची गुंतवणूक करून लखनऊ येथे वेलनेस सेंटर सुरू केले होते.
4 वर्षांपूर्वी -
पॉर्नोग्राफी प्रकरण | शर्लिन चोप्राच्या ८ तास चौकशीनंतर राज कुंद्रा अधिकच अडचणीत
पोर्नोग्राफी प्रकरणी क्राइम ब्रांचच्या विशेष पथगकाने मॉडेल शर्लीन चोप्राची 8 तास चौकशी केली. शर्लीन चौकशीसाठी क्राइम ब्रांचमध्ये शुक्रवारी दुपारी 12 च्या सुमारास पोहोचली होती. त्यानंतर रात्री 8 वाजता ती कार्यालयातून बाहेर पडली. या दरम्यान तिने राज कुंद्रा आणि पोर्नोग्राफी संदर्भात अनेक खुलासे केले आहेत. तिने राजच्या विरोधात काही गंभीर आरोप सुद्धा केले आहेत.
4 वर्षांपूर्वी