Ponniyin Selvan 1 | पोन्नियिन सेल्वन पार्ट 1 चित्रपटाचा ट्रेलर रिलीज, भारताच्या महान साम्राज्याची कथा, ऐश्वर्या रायचा शाही अंदाज

Ponniyin Selvan 1 | भारतीय अभिनेत्री आणि मिस वर्ल्ड 1994 स्पर्धेची विजेती ऐश्वर्या राय बच्चन, सत्य घटनेवर आधारित चित्रपट घेऊन येत आहे. 2018 मध्ये फैनी खान चित्रपटामध्ये ऐश्वर्याला शेवट चाहत्यांनी पाहिले होते. दरम्यान, ऐश्वर्याच्या बऱ्याच चित्रपटांना ए. आर. रेहमान यांचे संगीत आहे आणि आत्ता पर्यंतची सर्वांत गाजलेली गाणी आहेत. चाहत्यांसाठी आणखी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. ऐश्वर्याच्या आगामी पोन्नियिन सेल्वन पार्ट 1 चित्रपटामध्ये ए. आर. रेहमान यांचे संगीत असणार आहे.
ऐतिहासिक चित्रपट पोन्नियिन सेल्वन
6 सप्टेंबर रोजी पोन्नियिन सेल्वन पार्ट 1 चित्रपटाचा ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे. या ट्रेलरचा चाहत्यांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे. दरम्यान, हा चित्रपट कल्की कृष्णमूर्ती यांचा ऐतिहासिक चित्रपट आहे. या चित्रपटाची कथा 10 व्या शतकातील आहे तर हा चित्रपट ‘सर्वात महान’ चोल साम्राज्यातील राजांच्या जीवनावर आधारित आहे. दरम्यान, रिलीज झालेल्या ट्रेलरची सुरुवात आकाशातून जाणारा धूमकेतूच्या व्हिज्युअल्सने होते. त्यानंतर साम्राज्याच्या इतिहासाला सुरुवात होते. एका पाठोपाठ एक पात्र आपल्या राजेशाही अंदाजामध्ये दिसून येतात.
ऐश्वर्या रायचा शाही अंदाज
पोन्नियिन सेल्वन पार्ट 1 या चित्रपटामध्ये मिस वर्ल्ड ऐश्वर्या राय बच्चन मुख्य भूमिकेमध्ये दिसून येणार आहे. या चित्रपटामध्ये ऐश्वर्या राणी नंदिनीची भूमिका साकारणार आहे. तसेच चित्रपटामध्ये ऐश्वर्याची दुहेरी भूमिका असणार आहे. ती राणी नंदिनी आणि मंदाकिनी देवीच्या भूमिकेत दिसून येणार आहे.
30 सप्टेंबर रोजी चित्रपट प्रदर्शत होणार
या चित्रपटामध्ये सर्व दिग्गज कलाकार दिसून येणार आहेत. पोन्नियिन सेल्वन पार्ट 1 चित्रपटाचे दिग्दर्शन मणिरत्नम यांनी केले आहे. दरम्यान, ऐश्वर्याचा मणिरत्नम सोबतचा 4 था चित्रपट आहे. इरुवर, गुरु आणि रावण चित्रपटामध्ये ती दिसून आली आहे. पोन्नियिन सेल्वन पार्ट 1 चित्रपट येत्या 30 सप्टेंबर रोजी हिंदी, तमिळ, तेलगू, मल्याळम आणि कन्नड भाषेत प्रदर्शित होणार आहे.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title: Ponniyin Selvan 1 Trailer Checks details 8 September 2022.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं