गुदगुल्या केल्या म्हणून मी त्या अभिनेत्याच्या थोबाडीत मारली : राधिका

मुंबई : एका तामिळ अभिनेत्याने शूटिंग दरम्यान माझ्या पायाला गुदगुल्या करायला सुरुवात केल्याने मी त्याच्या थोबाडीत लगावली होती अशी एका प्रसंगाची आठवण प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेत्री राधिका आपटे हिने एका कार्यक्रमात बोलून दाखवली.
नेहा धुपियाच्या ‘बीबीएफ्ज विद वोग’ या चॅट शो दरम्यान तिने त्या प्रसंगाचा उल्लेख केला. कार्यक्रमातील चर्चेदरम्यान तिने तामिळ सिनेमाच्या शूटिंग दरम्यान घडलेल्या एका वाईट अनुभवाची आठवण शेअर केली.
तामिळ सिनेमाच्या शूटिंग दरम्यान त्या सेटवर माझा पहिलाच दिवस होता. त्या शूटिंग दरम्यानच एका तामिळ अभिनेत्याने माझ्या पायाला गुदगुल्या करण्यास सुरुवात केली आणि मी अभिनेत्याला त्यापूर्वी कधीच भेटली नव्हते. पण तरीही एका अनोळखी व्यक्तीबरोबर एखादी व्यक्ती असं कस करू शकते हे बघूनच मला धक्का बसला. मला शेवटी सहन न झाल्याने मी तामिळ अभिनेत्याच्या थोबाडीत मारली असं राधिकाने शो मधील चर्चेदरम्यान सांगितलं.
राधिका आपटे सोशल मीडियावर एक प्रसिद्ध अभिनेत्री म्हणून सर्वांना ज्ञात आहे. सोशल मीडियावर तिने एकदा तिचा समुद्रकिनाऱ्यावरील बिकनी घालून शूट केलेला फोटो अपलोड केल्याने तिला ट्रोल केलं होतं. त्यावर तिने ट्रोल करणाऱ्यांना बीचवर बिकनी नाही तर साडी नेसणार का असं थेट उत्तर दिलं होतं. राधिका आपटे तिच्या ह्या रोखठोक स्वभावासाठी सुद्धा चाहत्यांमध्ये ओळखली जाते.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं