Samantha Ruth Prabhu In Bollywood | आयुष्मान खुरानासोबत हॉरर चित्रपटासाठी समंथा ऑन द वे! करणार दिहेरी अभिनय

Samantha Ruth Prabhu In Bollywood | साऊथमधील सुपरस्टार जी नुकतीच पुष्पा चित्रपटातील सेक्सी आयटम डान्स ओ अंतवा गाण्यामंध्ये दिसून आलेली समंथा रुथ प्रभू लवकरच हिंदी चित्रपटामध्ये झळकणार आहे. आयुष्मान खुरानासोबत तिचा आगामी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. हा तिचा पहिला हिंदी चित्रपट असणार आहे ज्याचे दिग्दर्शन स्त्री फेम अमर कौशिक करणार आहेत. आगामी चित्रपटही ‘स्त्री’ चित्रपटाप्रमाणे हा एक भयकथा असणार आहे.
समंथाचे बॉलिवूडमध्ये पदार्पण
अमर कौशिक यांच्या चित्रपटाच्या माध्यमातून समंथा बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. या चित्रपटामध्ये समंथाची दुहेरी भूमिका असणार आहे एक राजकुमारीची असेल तर दुसरी भुताची. या चित्रपटामध्ये आयुष्मान सामंथाच्या प्रियकराच्या भूमिकेत दिसून येणार आहे. दरम्यान, या चित्रपटाची कथा राजस्थानमधील एका लोककथेवर आधारित असणार आहे. समांथाला वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका करायला आवडतात, आणि त्यामुळेच तिने या चित्रपटामध्ये काम करण्यासाठी होकार दर्शवला आहे. कारण याआधी तिने हॉरर चित्रपट आणि त्यात दुहेरी भूमिका साकारली नाहीये. तिच्यासाठी या चित्रपटाचा प्रवास रोमांचक असणार आहे.
तेलुगुमध्ये समंथाचे हॉरर चित्रपट
याआधी समंथाने तेलुगू चित्रपटांमध्ये आपले एक्स- सासरे नागार्जून यांच्या सोबत राजू गरी गधी 2 हॉरर चित्रपटामध्ये काम केले आहे. या चित्रपटाचे शुटींग या वर्षांच्या अखेरीस सुरु होणार आहे. हा चित्रपट 2023 च्या उत्तरार्धात प्रदर्शित होणार असल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, समंथाने आणखी एक चित्रपट साईन केल्याची चर्चा रंगत आहे जो 2023 मध्ये लाँच होणार आहे. तसेच अक्षय कुमारसोबत करण जोहरचा समंथा चित्रपट साइन करणार असल्याच्याही चर्चा आहेत.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title: Samantha Ruth Prabhu will be seen in a new film opposite Ayushmann Khurrana Checks details 9 September 2022.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं